टीम मंगळवेढा टाईम्स।
सोलापूर-मंगळवेढा रस्त्यावर ऊस वाहतूक करणाऱ्या ट्रॅक्टरला ट्रकने मागून धडक दिली. त्यात ट्रॅक्टर चालक ठार झाला. बुधवारी हॉटेल सुगरणजवळ हा अपघात घडला.
यात अनिल शिवराम सावंत असे मृत्यू झालेल्या ट्रॅक्टरचालकाचे नाव आहे. ट्रक चालक शंभू आत्माराम गळवे (रा.सोमेवाडी, ता. सांगोला) याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला.
फिर्याद अरुण नामदेव सावंत (रा.बहुरवाडी, ता.जामखेड जि.अहमदनगर) यांनी दिली. अपघात बुधवारी पहाटे दोनच्या सुमारास घडला आहे.
याबाबत सविस्तर माहिती अशी, अनिल सावंत हे ऊस वाहतुकीचा ट्रॅक्टर घेऊन लंवगी येथील भैरवनाथ कारखान्याकडे जात होते.
ट्रॅक्टरला पाठीमागून भरधाव वेगाने आलेल्या ट्रक (जी-जे १६ एयू ४५३०) ने धडक दिली. यात अनिल सावंत गंभीर जखमी झाले. अधिक तपास पोलिस हेडकॉन्स्टेबल तुकाराम कोळी करीत आहेत.
अशाच महत्वपूर्ण बातम्या आणि माहीती मनोरंजन मिळवा तुमच्या व्हॉट्सअँप ग्रूपमध्ये, त्यासाठी पुढील नंबर तुमच्या ग्रुपमध्ये समाविष्ट करा – 9970766262
“मंगळवेढा टाईम्स”च्या बातम्या मिळविण्यासाठी 9970766262 हा नंबर तुमच्या व्हॉट्सऍपवर ग्रुपवर ऍड करून फक्त एक मेसेज करा.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज