मंगळवेढा टाईम्स वृत्तसेवा । लग्नाचे आमिष दाखवून अल्पवयीन व मंदबुद्धी असलेल्या मुलीवर शारीरिक अत्याचार केल्याची घटना सांगोला तालुक्यात घडली आहे. तसेच झालेला प्रकार कोणाला सांगितल्यास बदनामी करण्याची व जिवे ठार मारण्याची धमकी दिली.
याबाबत मिळालेली माहिती अशी गेल्या सहा – सात महिन्यापासून अल्पवयीन व मंदबुद्धी असलेल्या मुलीला संशयित आरोपीने लग्नाचे आमिष दाखवले.तुला मी सुखी ठेवतो,मोटारसायकलवरून फिरवतो असे म्हणून तिच्यासोबत आठ ते नऊ वेळा घराच्या पाठीमागील बाजूस गुरे चारण्यासाठी असलेल्या शेताच्या वगळीमध्ये शारीरिक अत्याचार केला.
तसेच झालेल्या प्रकाराबाबत कोणास सांगितले तर बदनामी करण्याची व जीवे ठार मारण्याची धमकी दिली.याबाबत पीडित मुलीच्या आईने दिलेल्या फिर्यादीवरून संशयित आरोपीविरुद्ध सांगोला पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.अधिक तपास उपविभागीय पोलिस अधिकारी दत्तात्रय पाटील करीत आहेत.
जाहिरात
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज