mangalwedhatimes.in
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • सोलापूर
  • मंगळवेढा
  • राजकारण
  • क्राईम
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • सोलापूर
  • मंगळवेढा
  • राजकारण
  • क्राईम
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
No Result
View All Result
Mangalwedha Times
No Result
View All Result

वारकऱ्यांनो! टोलमाफी, विम्याचा लाभ, नोडल अधिकारीही नेमणार; ICU सुविधा सुसज्ज रुग्णवाहिका; आषाढीनिमित्त एकनाथ शिंदेंची घोषणा

टीम 'मंगळवेढा टाईम्स' by टीम 'मंगळवेढा टाईम्स'
May 30, 2025
in राज्य
मोठी बातमी! मुख्यमंत्री शिंदेंनी बोलावली तातडीची बैठक, विशेष अधिवेशनापूर्वी महत्वाची घडामोड; किती टक्के आरक्षण मिळणार?

मंगळवेढा टाईम्स न्युज नेटवर्क ।

आषाढी वारीनिमित्त वारीत सहभागी होणाऱ्या वारकऱ्यांना संरक्षण देण्यासाठी त्यांचा समूह विमा काढण्यात येईल, तसेच त्यांना दरवर्षीप्रमाणे यावर्षीही वैद्यकीय सेवा पुरवण्यात येतील असे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी स्पष्ट केले.

आषाढी वारीनिमित्त केलेल्या उपाययोजना आणि वारकऱ्यांना भेडसावणाऱ्या विविध समस्यांचा आढावा घेण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली सह्याद्री अतिथीगृहात विशेष बैठक पार पडली होती. त्याविषयीची अधिक माहिती प्रसार माध्यमांना देतांना उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे बोलत होते.

नुकत्याच झालेल्या मुसळधार पावसामुळे वारी मार्ग कुठेही खराब झाला असल्यास मुरूम, खडी आणि डांबरीकरण करून त्याची तातडीने डागडुजी करावी, वारकऱ्यांना मुबलक पाणी, विजेची जोडणी, पालखी तळावर वॉटरप्रूफ तंबू उपलब्ध करून घ्यावे.

तसेच वारीसाठी जाणाऱ्या गाड्यांना दरवर्षीप्रमाणे टोलमध्ये सवलत दिली जाईल असेही उपमुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केले.

दरम्यान, गतवर्षी वारीसाठी येणाऱ्या भाविकांना टोलमाफी करण्यात आली होती. त्यामुळे, यंदाही वाहनाने येणाऱ्या वारकऱ्यांना टोलमाफी मिळणार असल्याचे स्पष्ट झाले.

आरोग्य तपासणी

गतवर्षीप्रमाणे याहीवर्षी आषाढी वारीनिमित्त राज्याच्या आरोग्य विभागाकडून भव्य आरोग्य शिबिरे आयोजित केली जातील, वारकऱ्यांसाठी कार्डीएक रुग्णवाहिकेची सोय उपलब्ध करून दिली जाईल, पंढरपुरात तात्पुरती आयसीयू सुविधा उपलब्ध करून दिली जाईल, या सर्व सोयी उपलब्ध करून देण्यासाठी आरोग्य मंत्री प्रकाश अबिटकर यांनी स्वतः पंढरपूरला जाऊन आढावा घ्यावा असे निर्देश शिंदे यांनी यावेळी त्याना दिले.

तसेच प्रत्येक जिल्ह्यातून निघणाऱ्या मोठ्या दिड्यांना वारीच्या काळात पूर्णवेळ सुसज्ज रुग्णवाहिका उपलब्ध करून द्यावी असेही उपमुख्यमंत्र्यांनी सांगितले.

नोडल अधिकारी नेमणार

यासोबतच गतवर्षी वारीदरम्यान झालेल्या अपघातात मृत्युमुखी पडलेल्या वारकऱ्यांना शासनाद्वारे मदत केली जाईल, पोलिसांशी व्यवस्थित समन्वय व्हावा यासाठी नोडल ऑफिसर नेमण्यात येईल. वारकऱ्यांचे भोजन आणि इतर प्रथा परंपरा वेळच्या वेळी पार पाडाव्यात यासाठी वारी कुठे जास्त वेळ खोळंबणार नाही यासाठी प्रयत्न केला जाईल,

यंदाची वारीही स्वच्छ वारी, निर्मल वारी हरित वारी म्हणून आपल्याला पार पाडायची असल्याने त्यासाठी लागेल ते सर्व सहकार्य शासनाकडून केले जाईल असेही उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले.

अशाच महत्वपूर्ण बातम्या आणि माहीती मनोरंजन मिळवा तुमच्या व्हॉट्सअँप ग्रूपमध्ये, त्यासाठी पुढील नंबर तुमच्या ग्रुपमध्ये समाविष्ट करा – 9970766262

“मंगळवेढा टाईम्स“च्या बातम्या मिळविण्यासाठी 9970766262 हा नंबर तुमच्या व्हॉट्सऍपवर ग्रुपवर ऍड करून फक्त एक मेसेज करा.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी Mangalwedha Times वर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट मंगळवेढा टाईम्स

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.

ताज्या बातम्या थेट मोबाईलवर मिळवण्यासाठी आजच जॉईन व्हा

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज

Tags: उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे

संबंधित बातम्या

शासकीय कार्यालयाप्रमाणे ‘या’ विभागाला पाच दिवसांचा आठवडा करण्यासाठी राज्य सरकारची हालचाली सुरू

सरकारी कर्मचाऱ्यांनो! सोशल मीडिया वापरताना जरा जपून; अन्यथा कारवाई, नवी नियमावली आली; नेमका काय आहे निर्णय?

July 28, 2025
Big Breaking! तुमच्यावर मनी लॉन्ड्रींगचा गुन्हा दाखल झाला आहे, डिजिटल अरेस्टची भीती दाखवत मंगळवेढ्यातील युवकाकडून उकळले तब्बल साडेसहा लाख रुपये

सावधान! व्हॉट्सअ‍ॅपवर आलेली Apk फाईल डाउनलोड केली अन क्षणात 9 लाख गमावले; APK म्हणजे काय? कसा होतो हा स्कॅम?

July 28, 2025
माझ्या मरणास प्रशासन कारणीभूत! बठाण, उचेठाण अवैध वाळू उपसा प्रशासनाच्या नाकावर टिचून सुरू; ठेक्यावर कारवाई का होत नाही?; सामाजिक कार्यकर्तेने दिला आत्मदहनाचा इशारा

वाळू तस्करांना पकडण्यासाठी तहसीलदारांनी नदीत उडी मारली, पोहत जाऊन केला पाठलाग; जीव धोक्यात घालून केली कारवाई

July 27, 2025
मोठी बातमी! ‘त्या ‘लाडक्या बहिणी’ची रक्कम पुन्हा सरकारजमा, कारवाई सुरू; ‘या’ जिल्ह्यात जे झालं…

बापरे..! लाडकीच्या पैशांवर पुरुषांचा ‘डल्ला’; ‘इतक्या’ हजार पुरुषांनी लाटले 21 कोटी; डल्ला मारला कसा, शोध सुरू; लाटलेले पैसे सरकार परत घेणार

July 26, 2025
Breaking! मंगळवेढा तालुक्यातील वृद्धाने चिठ्ठी लिहून संपविले जीवन; मुलाविरोधात गुन्हा दाखल धक्कादायक कारण आले समोर..?

मन हेलावून टाकणारी घटना! अवघ्या 20 दिवसांच्या तान्हुलीला दूध पाजताना काळाने घात केला; आईचा आकस्मिक मृत्यू

July 25, 2025
वीस दिवसांपूर्वी लग्न झालेल्या तरुणीची एकविसाव्या दिवशी प्रियकरासह आत्महत्या

एकीकडं पावसाची सर, दुसरीकडं शेतकरी दाम्पत्यानं गळ्यात अडकवला दोर; गावकरीही शॉक; मन सुन्न करणारी घटना…

July 26, 2025
महाराष्ट्रातील ‘या’ भागात पुन्हा मुसळधार पावसाचा इशारा; प्रशासनाला सतर्क राहण्याचं आवाहन

शेतकऱ्यांनो सावधान! पुढील ‘इतके’ दिवस राज्यातील ‘या’ भागात मुसळधार पाऊस पडणार; पंजाबराव डखांचा अंदाज जाहीर

July 24, 2025

धक्कादायक! राज्य सरकारकडून कामाचे बिल वेळेवर न मिळाल्याने, कंत्राटदाराने टोकाचं पाऊल उचललं; सगळेच हादरले

July 24, 2025
‘मी देवेंद्र फडणवीस शपथ घेतो की.’, महाराष्ट्रात ‘देवेंद्र’ पर्वाला सुरुवात; आजपासूनच फडणवीस यांच्यापुढे असतील ‘हे’ 5 आव्हान

मोठी बातमी! मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आज पंढरपुरात; ‘या’ महत्त्वाच्या घोषणा करणार?

July 23, 2025
Next Post

नशा! अवैध उत्तेजक औषधाची विक्री; एकास अटक : अवैधरित्या साठा केलेल्या ५५ बाटल्या प्रतिबंधित इंजेक्शन जप्त

ताज्या बातम्या

शासकीय कार्यालयाप्रमाणे ‘या’ विभागाला पाच दिवसांचा आठवडा करण्यासाठी राज्य सरकारची हालचाली सुरू

सरकारी कर्मचाऱ्यांनो! सोशल मीडिया वापरताना जरा जपून; अन्यथा कारवाई, नवी नियमावली आली; नेमका काय आहे निर्णय?

July 28, 2025
Big Breaking! तुमच्यावर मनी लॉन्ड्रींगचा गुन्हा दाखल झाला आहे, डिजिटल अरेस्टची भीती दाखवत मंगळवेढ्यातील युवकाकडून उकळले तब्बल साडेसहा लाख रुपये

सावधान! व्हॉट्सअ‍ॅपवर आलेली Apk फाईल डाउनलोड केली अन क्षणात 9 लाख गमावले; APK म्हणजे काय? कसा होतो हा स्कॅम?

July 28, 2025
मॉर्निंग वॉकला जाताना अनोळखी वाहनाची धडक; मंगळवेढ्यातील वृध्दाचा मृत्यू

धक्कादायक! आई-वडिलांच्या विरोधाला न जुमानता सज्जनगड चढली; दहावीच्या मुलीचा दुर्दैवी अंत

July 28, 2025
खळबळ! मंगळवेढा तालुक्यात पंतप्रधान किसान सन्मान योजनेत तब्बल २ हजार ६०० बोगस लाभार्थी

खळबळ! ज्वेलर्स व्यवसायिकाला मंगळवेढ्यात बोलावून स्वस्तात सोने देण्याचे आमिष दाखवले; १० लाख रुपये घेवून बनावट सोने देवून केली आर्थिक फसवणूक; सहा जणांविरूध्द गुन्हा दाखल

July 28, 2025
प्रियकराच्या मदतीने विवाहितेचा आत्महत्येचा बनाव, खरे वाटण्यासाठी तिसऱ्याच महिलेची हत्या करुन जिवंत जाळले; मंगळवेढ्यातील खुनाची सस्पेन्स स्टोरी पोलिसांनी उलगडली; हिंदी सस्पेन्स चित्रपटाला शोभेल अशी घटना

मोठी बातमी! पाठखळ प्रकरणातील दोघा प्रेमीयुगूलांना मंगळवेढा जेल मधून ‘या’ कारागृहात केले वर्ग; नेमके काय आहे कारण?

July 28, 2025
सर्वात मोठी बातमी! लोकसभा निवडणुकीच्या तारखा ‘या’ दिवशी जाहीर होणार?; निवडणूक आयोगाच्या हालचाली सुरु

रतनचंद शहा सहकारी बँकेच्या निवडणुकीमध्ये ३० टक्के मतदान; ‘इतक्या’ हजार सभासदांनी बजावला मतदानाचा हक्क; आज मतमोजणी

July 28, 2025
mangalwedhatimes.in

प्रिंट,टीव्ही मीडियानंतर सध्या डिजिटल मीडियाचं महत्व प्रचंड वाढलंय. येणाऱ्या काळात या माध्यमाचं महत्व आणि व्याप्ती आणखी वाढणार असल्यानं . आम्ही हा नवीन बदल स्वीकारून 'मंगळवेढा टाईम्स' या सोशल मीडियाच्या फेसबुक पेजचे रूपांतर वेब मीडिया मध्ये करून 'मंगळवेढा टाईम्स' या नावाने न्युजचे वेब पोर्टल आपल्या सेवेत दाखल झालय. येथे आपण आपल्या स्मार्टफोन, कॉम्पुटर वरून देश विदेशातील घडामोडी तसेच स्थानिक, व्यापार, ग्रामीण, सांस्कृतिक, उद्योग, कृषी, मनोरंजन, तंत्रज्ञान, शिक्षण अश्या विविध श्येत्रांतील बातम्या घरबसल्या वाचू शकता. स्मार्टफोन, सोशल मीडियाच्या माध्यमातून बातम्या पाहण्यात लोकांचा कल वाढतोय, म्हणूनच आम्ही बदलतोय.

© 2020 Website Maintained by Tushar Bhambare..

No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • सोलापूर
  • मंगळवेढा
  • राजकारण
  • क्राईम
  • मनोरंजन
  • शैक्षणिक

© 2020 Website Maintained by Tushar Bhambare..

ताज्या बातम्या थेट मोबाईलवर मिळवण्यासाठी आजच जॉईन व्हा