टीम मंगळवेढा टाईम्स।
सोलापूर जिल्ह्यात आजपासून टोलच्या दरात ५ रुपयांची वाढ होणार असून, चारचाकी वाहनाला कमीत कमी ६५ रुपये तर जास्तीत जास्त ८५ रुपये टोल आकारला जाणार आहे.
चारचाकी वाहनाला विजयपूर महामार्गावर सर्वाधिक म्हणजे ८५ रुपये टोल आकारणी होणार आहे. पुणे महामार्गावर धावणाऱ्या ट्रक तसेच बसेसना २६० रुपये टोल लागणार आहे. तर, विजयपूर हायवेवर २८० रुपये टोल लागणार आहे.
राष्ट्रीय राजमार्ग प्राधिकरणाने १ एप्रिलपासून नवीन टोल दर जाहीर केले आहे. नवीन दरानुसार टोल आकारणी करावी, असे आदेश प्राधिकरणाने दिले आहेत.
अक्कलकोट हायवेवर पूर्वी ६० रुपये टोल लागायचा. मंगळवार, १ एप्रिलपासून ६५ रुपये टोल लागणार आहे. २४ तासांकरिता ११५ रुपये लागणार आहे. पुणे हायवेवर चारचाकी वाहनांना पूर्वी ७० रुपये होता.
मंगळवारपासून यात ५ रुपयांची वाढ होणार आहे. तुळजापूर महामार्गावर चारचाकी वाहनांना पूर्वी ७० रुपये टोल लागायचा. आता ७५ रुपये लागणार आहे.
सोलापूर जिल्ह्यात एकूण सहा टोलनाके
जिल्ह्यातील ६ टोलनाक्यांवर वर्षाकाठी ३९० कोटी १२ लाखांची टोलवसुली केली जाते. रोज सरासरी दीड लाखाहून अधिक वाहने या टोलनाक्यांवरून धावतात. पुणे हायवेवरील सावळेश्वर तसेच वरवडे या दोन टोलनाक्यावर वर्षाकाठी २१५ कोटींची टोल आकारणी केली जाते.
सर्वांत कमी टोल सोलापूर-सांगली महामार्गावरील इंचगाव टोलनाक्यावर वार्षिक ३० कोटी रुपये टोल जमा होतो. अक्कलकोट हायवेवरील वळसंग ३१.२ कोटी रुपये, सोलापूर सांगली महामार्गावरील अनकढाळ वार्षिक ३७ कोटी ८ लाख रुपये टोल जमा होतो.
अशाच महत्वपूर्ण बातम्या आणि माहीती मनोरंजन मिळवा तुमच्या व्हॉट्सअँप ग्रूपमध्ये, त्यासाठी पुढील नंबर तुमच्या ग्रुपमध्ये समाविष्ट करा – 9970766262
“मंगळवेढा टाईम्स“च्या बातम्या मिळविण्यासाठी 9970766262 हा नंबर तुमच्या व्हॉट्सऍपवर ग्रुपवर ऍड करून फक्त एक मेसेज करा.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी Mangalwedha Times वर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट मंगळवेढा टाईम्स
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज