मंगळवेढा टाईम्स न्युज ।
सावकारकीच्या त्रासला कंटाळून वाखरीतील एका व्यापाऱ्याने आत्महत्या केली. खाजगी सावकारांच्या त्रासाला कंटाळून आपण आत्महत्या करीत असल्याची चिठ्ठी खिशात सापडल्यानंतर
पंढरपूर ग्रामीण पोलिस ठाण्यात सात संशयिताविरोधात गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे. अॅट्रॉसिटी, खाजगी सावकारी अधिनियम आणि इतर कलमानुसार गुन्हा दाखल झालेला आहे.
सुरेश कांबळे असे आत्महत्या केलेल्या चप्पल दुकानदाराचे नाव आहे. शुक्रवारी सकाळी त्यांनी राहत्या घराच्या पहिल्या मजल्यावर असलेल्या बेडरूम मध्ये लुंगीच्या सहाय्याने गळफास घेतला.
पत्नी शकुंतला यांना वाटले ते नेहमी प्रमाणे गावात गेले असतील. पत्नीसह घरातील सर्वांनी फोन करूनही सुरेश कांबळे यांनी फोन घेतला नाही. शेवटी त्यांनी जवळच्या एका मुलास बोलावून वरच्या खोलीत बघायला पाठवले तेव्हा सुरेश कांबळे यांनी लुंगीच्या सहाय्याने छताच्या हुकाला गळफास घेतल्याचे दिसून आले.
मृत सुरेश यांच्या शर्टाच्या वरील खिशात हाताने लिहिलेली चिठ्ठी सापडली. त्यामध्ये सात जणांची नावे आहेत. या लोकांकडून ६ ते २० टक्के व्याज दराने पैसे व्यवसायासाठी पैसे घेतले होते.
मुद्दलापेक्षा अधिक व्याज देऊनही सावकाराकडून वसुलीसाठी मानसिक त्रास दिला जातो. चार चौघात वसुलीसाठी अवमानित केले जाते, जातीवरून अवमानित केले जाते, या सर्व मानसिक छळाला, ताण, तणावास कंटाळून आत्महत्या करीत असल्याचे चिठ्ठीत लिहिले आहे.
यांच्यावर झाला गुन्हा दाखल
याप्रकरणी सौ शकुंतला कांबळे यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार भारत हिलाल (रा. पंढरपूर) पूर्ण नाव पत्ता माहित नाही. अंभगराव (विकी) पूर्ण नाव पत्ता माहित नाही. शिवाजी गाजरे (रा. वाखरी ता. पंढरपूर) बंडू भोसले पूर्ण नाव पत्ता माहित नाही. काशी जेवलर्स (बापूगायकवाड) रा. वाखरी ता. पंढरपूर पूर्ण नाव माहित नाही. संजय व्यवहारे पूर्ण नाव पत्ता माहित नाही. इकबाल पटेल पूर्ण नाव माहित नाही
मंगळवेढा येथील खाजगी सावकारांच्या जाचाला कंटाळलेल्या व्यक्तीची पोलीस अधीक्षकांकडे तक्रार
अनेक वर्षांपासून गोरगरीब व छोट्या मोठ्या व्यवसायिकांना आवाच्या सव्वा दराने व्याज आकारणाऱ्या खाजगी सावकारांविरोधात अनेक वेळा वृत्तपत्रात बातम्या येऊनही त्यांच्यावरती वेळीच कारवाई न झाल्याने तालुक्यातील खाजगी सावकारी अधिक बोकाळल्याचे समोर आले असून
मंगळवेढा येथील पिढीत धनंजय संजय गोपाळकर , व्यवसाय-लॉन्ड्री, या तरुणाने मंगळवेढा येथील २१ खाजगी सावकारांच्या त्रासाला कंटाळून सोलापूर जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी यांच्याकडे मला वाचवा अशी आर्त हाक दिली आहे.
सदरच्या २१ सावकारांच्या नावानिशी लेखी तक्रार दिल्यामुळे खाजगी सावकारांचे धाबे दणाणले आहेत सदरचे खाजगी सावकार हे गुंड प्रवृत्तीचे असल्यामुळे सदरचा तक्रारदार भीतीचे छायेखाली जीवन जगत आहे. तरी या खाजगी सावकारांवरती कोणती कारवाई होणार याकडे संपूर्ण तालुक्याचे लक्ष लागलेले आहे.
अशाच महत्वपूर्ण बातम्या आणि माहीती मनोरंजन मिळवा तुमच्या व्हॉट्सअँप ग्रूपमध्ये, त्यासाठी पुढील नंबर तुमच्या ग्रुपमध्ये समाविष्ट करा – 9970766262
“मंगळवेढा टाईम्स”च्या बातम्या मिळविण्यासाठी 9970766262 हा नंबर तुमच्या व्हॉट्सऍपवर ग्रुपवर ऍड करून फक्त एक मेसेज करा.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी Mangalwedha Times वर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट मंगळवेढा टाईम्स.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज