टीम मंगळवेढा टाईम्स ।
आंतरराष्ट्रीय दर्जाच्या सोलापुरातील इंदिरा गांधी स्टेडियमवर आजपासून महाराष्ट्र विरुद्ध मणिपूर यांच्यात रणजी सामना होत आहे. सकाळी १० वाजता या सामन्यास सुरुवात होणार आहे. हा सामना पाहण्यासाठी मोफत असणार आहे.
सोलापूर महानगरपालिका व स्मार्ट सिटी योजनेअंतर्गत शहरातील इंदिरा गांधी स्टेडियमची अत्याधुनिक करण्यात आले या मैदानावर मागील एक वर्षापासुन अनेक मोठे सामने झाले.
या सामन्यामध्ये करण्यात आलेली उत्कृष्ट नियोजनाच्या धर्तीवर महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनने सोलापूर जिल्हा क्रिकेट असोसिएशनला ५ ते ८ जानेवारी २०२४ या कालावाधीत रणजी सामन्याचे यजमानपद दिले. तब्बल २९ वर्षानंतर सोलापुरात रणजी सामना होत आहे.
हा सामना सर्वांसाठी मोफत असून सोलापूर शहर व जिल्ह्यातील क्रिकेट प्रेमी, खेळाडू व समस्त सोलापूरकरांनी सामना पाहण्यास इंदिरा गांधी स्टेडियमवर उपस्थित रहावे, असे आवाहन जिल्हा असोसिएशनने केले आहे.
शाळांसह मान्यवरांना दिले निमंत्रण
सोलापूर जिल्हा क्रिकेट असोसिएशनने जिल्हाधिकारी, महापालिका आयुक्त, जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी, कुलगुरु, पोलिस आयुक्त, पोलिस अधीक्षक यांच्यासह अन्य महत्त्वाच्या मान्यवरांना सामना पाहण्यास येण्यासाठी निमंत्रण दिले आहे, याशिवाय सर्व शाळांना पत्राद्वारे सामना पाहण्यास येण्यास कळविले आहे.
आंतरराष्ट्रीय खेळाडू
महाराष्ट्र रणजी क्रिकेट संघांमध्ये केदार जाधव यासह आंतरराष्ट्रीय क्रिकेट सामने खेळलेले खेळाडूंचा समावेश आहे. मणिपूरचा संघही तगडा असल्याचे सांगण्यात आले.
जिल्हा क्रीडा विभाग, जिल्हा क्रिकेट असोसिएशन तसेच महापालिका प्रशासनाकडून मणिपूरच्या टीमची बालाजी सरोवर या हॉटेलमध्ये राहण्याची व्यवस्था करण्यात आली आहे. तसेच खेळाडूंसाठी बसची सोय असणार आहे.
रणजी सामना हा सामना सकाळी 10 ते सायंकाळी पाच वाजेपर्यंत असणार आहे. सामना सोलापूरकरांना पाहण्यासाठी मोफत असून त्याकरिता सोयी करण्यात आली आहे. इंदिरा गांधी पार्क स्टेडियममध्ये वीस हजार प्रेक्षक बसण्याची क्षमता आहे. त्यामुळे सामना पाहण्यासाठी क्रीडाप्रेमींना संधी प्राप्त झाली आहे.
खेळाडूंवर फुलांची उधळण
महाराष्ट्र विरुद्ध मणिपूर असा रणजी सामना खेळला जाणार आहे. या सामन्याच्या प्रारंभी इंदिरा गांधी पार्क स्टेडियम येथे मणिपूरच्या खेळाडूंवर ज्ञान प्रबोधिनी वसतिगृहाच्या विद्याथ्यांनी गुलाबाच्या फुलांची उधळण करत त्यांचे स्वागत केले. व सामन्यासाठी शुभेच्छाही देण्यात आल्या.
महाराष्ट्राचे खेळाडू
केदार जाधव (क), सिद्धेश वीर, नौशाद शेख, अंकित बावणे, निखिल नाईक, अझीम काझी, आशय पालकर, ओंकार खटप्या, रामकृष्ण घोष, प्रशांत सोळंकी, हितेश वाळुंज, प्रदीप दधे, ओम भोसले, विकी ओस्तवाल, धनराज शिदि, विशांत मोरे
मणिपूरचे खेळाडू
मीतकिशंगबम लगलोन्यंब सिंह, नगारियानवम जॉन्सन सिंग, लाँगजैम रोनाल्ड मिटेल, मो. बसीर रहमान, युम्नाम कर्णजित सिंग, पुक्रंवम प्रफुल्लमणी सिंह, नरसिंग यादव, बिकाश सिंग, कंगाबम प्रियाजित सिंग, राजकुमार रेक्स सिंग, एल. किशन सिंगा, नीतेश सेडाई, लमाबम अजय सिंग, विश्वरजित कॉथौजम, ठोकचोम किशन सिंग
यापूर्वी सोलापुरात झालेले रणजी सामने
■ महाराष्ट्र विरुद्ध मुंबई – १८ ते २० डिसेंबर १९५२
■ महाराष्ट्र विरुद्ध मुंबई – ४ते ५ फेब्रुवारी १९५६
■ महाराष्ट्र विरुद्ध मुंबई – ९ ते ११ नोव्हेंबर १९६९ ■ महाराष्ट्र विरुद्ध गुजरात – ९ ते १९ डिसेंबर १९७८
■ महाराष्ट्र विरुद्ध बडोदा – ४ ते ६ डिसेंबर १९८१
■ महाराष्ट्र विरुद्ध मुंबई – २६ते २८ डिसेंबर १९८६ महाराष्ट्र विरुद्ध मुंबई २२ ते २६ डिसेंबर १९९४
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज