मंगळवेढा टाईम्स ऑनलाईन । संतोष श्रीराम यांना व्याजाने पैसे देऊन जास्त पैसे मागितल्याप्रकरणी खासगी सावकार सिद्धाराम बिराजदार, दिनेशकुमार बिराजदार व दशरथ कसबे या तिघांना न्यायाधीश शेख यांनी 2 दिवसांची पोलिस कोठडी सुनावली. सिद्धाराम बिराजदार व दशरथ कसबे या दोघांविरुद्ध सावकारीचा आणखी एक गुन्हा दाखल झाला आहे.
संतोष श्रीराम यांनी फौजदार चावडी पोलिस ठाण्यात फिर्याद दाखल केली होती. यात म्हटले आहे की, खासगी सावकार सिद्धाराम बिराजदार याने डिसेंबर 2018 मध्ये संतोष श्रीराम यांना 2 लाख 40 हजार रुपये दरमहा 5 टक्के व्याजाने दिले होतेे. श्रीराम यांनी सिद्धाराम याला 1 लाख 20 हजार रुपये परत दिले होते.परंतु, व्याज व मुद्दल असे 3 लाख 60 हजार रुपयांची मागणी सिद्धाराम करत होता. तसेच, शिवीगाळ करून ठार मारण्याची धमकी देत होता.
दिनेशकुमार बिराजदार याने मार्च 2019 मध्ये संतोष श्रीराम यांना 5 लाख रुपये दरमहा 10 टक्के व्याजाने दिले होते. त्यापैकी श्रीराम यांनी दिनेशकुमार याला 6 लाख रूपये परत दिले होते. तरीसुध्दा दिनेशकुमार हा श्रीराम यांना आणखी साडेसात लाख रूपये मागत होता व फोनवर शिवीगाळ करून ठार मारण्याची धमकी देत होता.
दशरथ कसबे याने कोरे धनादेश व कोरे बाँड घेऊन श्रीराम यांना जुलै 2018 मध्ये 5 लाख रूपये 5 टक्के व्याजाने दिले होते. त्याबदल्यात श्रीराम यांनी दशरथ कसबे याला व्याजासह 6 लाख 50 हजार रूपये परत दिले होते.
या फिर्यादीवरून सिध्दाराम बिराजदार, दिनेशकुमार बिराजदार व दशरथ कसबे या तिघांविरूध्द खासगी सावकारीचा गुन्हा दाखल झाला होता. याप्रकरणी पोलिसांनी तिन्ही खासगी सावकारांना अटक केली. तिघांना 5 ऑगस्ट रोजी न्यायालयात उभे केले असता न्यायाधीश शेख यांनी दोन्ही बाजूंच्या वकिलांचा युक्तिवाद ऐकून खासगी सावकार सिध्दाराम बिराजदार, दिनेशकुमार बिराजदार व दशरथ कसबे या तिघांना 2 दिवसांची पोलिस कोठडी सुनावली आहे.
यात सरकारच्यावतीने अॅड. करवते यांनी, तर आरोपीच्यावतीने अॅड. मिलिंद थोबडे, अॅड. विनोद सूर्यवंशी यांनी काम पाहिले.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज