टीम मंगळवेढा टाईम्स । सौम्य लक्षणे आहेत म्हणून त्यांच्याकडे दुर्लक्ष करून चालणार नाही. त्यांच्याकडून कोरोना पसरण्याची जास्त शक्यता असते. कोरोनाशी लढा देत असताना कोरोनापासून दूर राहणं गरजेचं आहे, असं आवाहन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केलं आहे.
कल्याण-डोंबिवली महापालिकेच्या वतीने डोंबिवली जिमखान्यातील बास्केटबॉल हॉलच्या जागेत उभारण्यात आलेल्या कोविड रुग्णालयाचे आॅनलाइन लोकार्पण मुख्यमंत्र्यांच्या हस्ते करण्यात आलं. यावेळी ते बोलत होते.
कोरोनाचे रुग्ण सुरुवातीला सापडत असताना राज्यात केवळ दोन लॅब होत्या. आता गेल्या चार महिन्यांत राज्यभरातील कोरोना टेस्टिंग लॅबची संख्या 285 झाली आहे, असं उद्धव ठाकरेंनी सांगितलं आहे.
दरम्यान, कोविड रुग्ण बरे होण्यात ठाणे शहराचा देशात दुसरा, तर राज्यात पहिला क्रमांक आहे. कल्याण-डोंबिवली महापालिकेचा रुग्ण बरे होण्याचा दर हा राज्यात दुसरा आहे, असं एकनाथ शिंदे यांनी सांगितलं आहे.
Those with mild symptoms of corona are more likely to spread corona- Uddhav Thackeray
राज्यातील व देशातील ब्रेकिंग बातम्या आणि माहिती सर्वात प्रथम तुमच्या पर्यंत .आजच Add करा तुमच्या Whatsapp ग्रुपवर 9561617373 हा आमचा नंबर.
ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 9561617373 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Mangalwedha Times News”
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज