मंगळवेढा टाईम्स वृत्तसेवा । राज्यातल्या कोरोनाबाधितांचा आकडा ४२३ वर जाऊन ठेपला असताना एकट्या मुंबईत २३२ रुग्ण आढळले आहेत.त्याखालोखाल पुणे, पिंपरी चिंचवड, सांगलीचं इस्लामपूर, नवी मुंबई, ठाणे, कल्याण, बुलढाणा अशा राज्याच्या इतर भागांमध्ये देखील कोरोनाग्रस्त रुग्ण सापडले आहेत. त्यामुळे कोरोनाने जवळपास संपूर्ण राज्यामध्ये आपले हातपाय पसरले आहेत.
या पार्श्वभूमीवर कम्युनिटी स्प्रेडमध्ये जाण्यापासून वाचण्यासाठी लॉकडाऊन आणि संचारबंदी लागू करण्यात आली आहे. पण तरीदेखील याचं गांभीर्य अद्याप लोकांना नसल्याचं दिसून येत आहे.सोलापुरात अद्याप कोरोनाचा फैलाव झाल्याचं दिसून आलेलं नाही. मात्र, या बैलगाडी शर्यतीमुळे मोठ्या संख्येने लोक कोणतेही सोशल डिस्टन्सिंग न पाळता एकत्र आले होते. त्यामुळे आता सोलापुरातही कोरोनाचा धोका वाढला आहे.
अजूनही लोकांना शहाणपण येईना!
याआधी देखील मुंबईच्या धारावी परिसरामध्ये संचारबंदी असूनदेखील बाहेर फिरणाऱ्या पोलिसांवरच स्थानिकांनी दगडफेक केल्याचा प्रकार घडला आहे. तर, पिंपरी-चिचंचवडमध्ये वाढदिवसाची पार्टी करण्यासाठी दोन तरुणी बाहेर फिरत असल्याचं निदर्शनास आलं होतं. नगरमध्ये तर आरोग्य सर्वेक्षण करायला गेलेल्या आरोग्य पथकालाच धक्काबुक्की केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे.
जगभरात कोरोनाग्रस्तांची संख्या १० लाखांहून अधिक!
आतापर्यंत जगभरात कोरोनाग्रस्तांची संख्या १० लाख २२ हजार १६३वर पोहोचली आहे.त्यापैकी ५३ हजार ४२४ जणांचा मृत्यू झाला आहे. तसंच २ लाख ९ हजार ८५२ कोरोनाग्रस्त रुग्ण रिकव्हर झाले आहेत. जगभरात सर्वाधिका कोरोनाचे रुग्ण अमेरिकेत आढळले असून त्यापाठोपाठ इटली आणि स्पेन मध्ये आढळले आहेत.
आतापर्यंत देशभरातील कोरोनाची आकडेवारी
महाराष्ट्र – ४२३
तमिळनाडू – ३०९
दिल्ली – २९३
केरळ – २८६
तेलंगणा – १५४
आंध्रप्रदेश – १४९
राजस्थान – १३३
उत्तर प्रदेश – १२६
कर्नाटक – १२४
मध्यप्रदेश – १०७
गुजरात – ८८
जम्मू-काश्मीर – ७०
पश्चिम बंगाल – ५३
हरयाणा – ४९
पंजाब – ४७
बिहार – २९
चंदीगढ – १८
आसाम – १६
लडाख – १३
अंदमान-निकोबार – १०
उत्तराखंड – १०
छत्तीसगड – ९
हिमाचल प्रदेश – ६
गोवा – ५
ओडिसा – ५
पाँड्युचेरी – ५
झारखंड – २
मनिपुर – २
मिझोरमा – १
अरुणाचल प्रदेश – १
एकूण – २५४३

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज