टीम मंगळवेढा टाईम्स ।
मंगळवेढा शहरातील तहसील कार्यालयातून व बोराळे येथून ७० हजार रुपये किमतीच्या दोन मोटार सायकली चोरटयांनी पळविल्या असून याप्रकरणी अज्ञात चोरटयाविरूध्द गुन्हा दाखल झाला आहे.
दरम्यान , दिवसेंदिवस मोटर सायकली चोरीचे प्रमाण वाढत असल्याने मोटर सायकलस्वार या घटनेमुळे धास्तावले आहेत.
पोलिस सुत्रांनी दिलेली माहिती अशी, पहिल्या घटनेत यातील फिर्यादी तानाजी बंडगर (रा.खडकी) हे दि.७ रोजी दुपारी १२.०० वा.काळया रंगाची व लाल पट्टा असलेली हिरो होंडा कंपनीची ३० हजार रुपये किमतीची
एम एच १३ बी.यु. ३२८५ ही दुचाकी तहसील कार्यालयाच्या आवारात लावून कार्यालयात कामानिमित्त गेले होते.
काम उरकून बाहेर आले असता त्यांच्या निदर्शनास लावलेल्या ठिकाणी मोटर सायकल दिसून आली नाही.
दुसऱ्या घटनेत बोराळे येथील फिर्यादी रामेश्वर सगेलकर हे दि. ५ रोजी रात्री १०.३० वा . ४० हजार रुपये किमतीची एम एच १३ , डी . एल .३९७३ ही काळया रंगाची स्प्लेंडर प्लस मोटर सायकल घराच्या बाहेर असलेल्या पत्र्याच्या शेडमध्ये लावली होती.
सकाळी ६.०० वा.उठल्यावर पाहिले असता सदर ठिकाणी मोटर सायकल दिसून आली नाही. याचा तपास पोलिस नाईक कृष्णा जाधव हे करीत आहेत.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज