टीम मंगळवेढा टाईम्स ।
मंगळवेढा तालुक्यातील लक्ष्मी दहिवडी येथे पैशाच्या कारणावरून एकास शिवीगाळ करीत तुझी जीरवतो असे म्हणून
काठीने बेदम मारहाण करण्याचा प्रकार घडला असून या प्रकरणी धनंजय सुर्यकांत पाटील, मोहन शिवदास पाटील यांच्याविरूध्द गुन्हा दाखल झाला आहे.
यातील फिर्यादी दत्तात्रय लक्ष्मण कडलासकर (वय ४९) हे चालक असून दि.३० च्या रात्री ८.३० च्या दरम्यान लक्ष्मी दहिवडी येथील
लक्ष्मीदेवी पतसंस्थेसमोर वरील आरोपीनी पैशाच्या कारणावरून फिर्यादीस शिवीगाळ करीत तुला पैसे देत नाही, काय करायचे ते कर,
तुझी जीरवतो असे म्हणून फिर्यादीच्या डाव्या पायाच्या मांडीवर, डाव्या हातावर व पाठीवर काठीने मारहाण केल्याचे दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे. अधिक तपास पोलिस हवालदार मोरे हे करीत आहेत.
अशाच महत्वपूर्ण बातम्या आणि माहीती मनोरंजन मिळवा तुमच्या व्हॉट्सअँप ग्रूपमध्ये, त्यासाठी पुढील नंबर तुमच्या ग्रुपमध्ये समाविष्ट करा – 9970766262
“मंगळवेढा टाईम्स”च्या बातम्या मिळविण्यासाठी 9970766262 हा नंबर तुमच्या व्हॉट्सऍपवर ग्रुपवर ऍड करून फक्त एक मेसेज करा.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज