टीम मंगळवेढा टाईम्स ।
थम्स अपमधून गुंगी येणारे द्रव्य पाजून एका कृषी पुरस्कार प्राप्त शेतकऱ्यास मंगळवेढा – बठाण रस्त्यावर चोरटयाने त्याच्या ताब्यातील २० हजार रुपये किमतीची सोन्याची अंगठी व रोख रक्कम असा २० हजार ७०० रुपये किमतीचा मुद्देमाल लुटल्याचा प्रकार भर दिवसा घडला असून या प्रकरणी अज्ञात चोरटयाविरूध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
दरम्यान भरदिवसा लुटीच्या या घटनेमुळे नागरिकांमधून दहशतीचे वातावरण पसरले आहे.
पोलिस सुत्रांनी दिलेली माहिती अशी की , यातील फिर्यादी कृषी पुरस्कार प्राप्त शेतकरी गौतम दाजी जगताप ( वय ७१ ) हे दि .१२ रोजी महाराष्ट्र बँकेतून घरी जात असताना एका अनोळखी अंदाजे ४० ते ४५ वयाच्या व्यक्तीने
फिर्यादीस मंगळवेढा ते बठाण जाणाऱ्या मार्गावरील रघुनाथ नेने यांचे शेतातील विहिरीजवळ असलेल्या लिंबाच्या झाडाखाली नेवून त्यांना थम्सअपमधून गुंगी येणारे द्रव्य पिण्यास देवून
२० हजार रुपये किमतीची ५ ग्रॅम सोन्याची पिळयाची अंगठी व ७०० रुपये रोख रक्कम असा एकूण २० हजार ७०० रुपयांचा मुद्देमाल घेवून पोबारा केला आहे.
या प्रकरणी अज्ञात चोरटयाविरूध्द गुन्हा दाखल केला असून अधिक तपास पोलिस हेडकॉन्स्टेबल कोळी हे करीत आहेत.
राज्यातील व देशातील ब्रेकिंग बातम्या आणि माहिती सर्वात प्रथम तुमच्या पर्यंत .आजच Add करा तुमच्या Whatsapp ग्रुपवर 99 70 76 6262 हा आमचा नंबर.
ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 99 70 76 6262 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Mangalwedha Times News”
विश्वसनीय ऑनलाईन पोर्टल ‘मंगळवेढा टाईम्स’ला बातम्या व जाहिरात देण्यासाठी आजच संपर्क करा : 75 88 214 814
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज