टीम मंगळवेढा टाईम्स । क्वारंटाईन करुन विलगीकरण कक्षामध्ये ठेवलेल्या कुटुंबाचे बंद घर फोडून चोरट्यांनी त्यातील सुमारे ५७ हजार रुपयांचा ऐवज पळवून नेल्याची घटना बार्शी तालुक्यातील भोयरे येथे घडली आहे. याबाबत घरमालक विक्रांत सुर्यकांत पवार यांनी दिलेल्या फिर्यादीवरुन तालुका पोलिस ठाण्यात अज्ञात चोरट्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
फिर्यादी आणि त्यांचे कुटुंबिय कोरोनाबाधित झालेल्या एका नातेवाईकाच्या संपर्कात आल्यामुळे त्यांना बार्शी येथे विलगीकरण कक्षामध्ये राहण्यास सांगण्यात आले होते. त्यामुळे घराला कुलुप लावून ते सर्वजण विलगीकरण कक्षामध्ये दाखल झाले होते. त्यांच्या घरातच किराणा दुकान आहे.
या दुकानात असलेल्या टेबलाच्या कप्प्यात रोख ४० हजार रुपये ठेवलेले होते. तसेच गल्ल्यात १६०० रुपये होते. घरातील लोखंडी कपाटात सोन्याची अंगठी होती. ते विलगीकरण कक्षात असताना त्यांचा भाऊ युवराज सुर्यकांत पवार याने सकाळी फोन करुन घराचा दरवाजा उघडा असल्याचे सांगितले. त्यामुळे विलगीकरण कक्षातून परवानगी घेवून ते गावी गेले असता त्यांना बाथरूमची सिमेंट खिडकी फोडलेली दिसली व घराचा दरवाजा उघडा दिसला.
घरामध्ये जावुन पाहिले असता घरातील कपडे , भांडी , अस्ताव्यस्त पडलेली दिसली . दुकानातील टेबलाचा कप्पा उघडुन पाहिला असता त्यात ठेवण्यात आलेले ४० हजार रूपये तसेच गल्ल्यातील १६०० रूपये व लोखंडी कपाटातील पाच ग्रॅम वजनाची सोन्याची अंगठी गायब झाली होती. त्यावरुन बंद घर पाहून चोरट्यांनी आपला कार्यभाग साधल्याचे दिसून आले.
Thieves broke into the locked home of a quarantined family
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज