टीम मंगळवेढा टाईम्स ।
मंगळवेढा तालुक्यातील हुलजंती येथे भर दुपारी बंद घराचे कुलूप तोडून चोरटयांनी घरात प्रवेश करून
कपाटात ठेवलेले चोन्याचे दागिने व रोख रक्कम असा एकूण ५३ हजाराचा मुद्देमाल चोरून नेल्याप्रकरणी अज्ञात चोरटयाविरूध्द गुन्हा दाखल झाला आहे.
पोलिस सुत्रांनी दिलेली माहिती अशी, यातील फिर्यादी जमादार महिबूब उंब्रजकर हे दुपारी १२.०० वा. गावात आठवडा बाजारनिमित्त बाजार करण्यास घराला कुलूप लावून गेले होते.
तर घरातील इतर मंडळी शेतावर कामासाठी गेले होते. दरम्यान दुपारी १.०० वा. फिर्यादीच्या शेजारी राहणारे माधवराव खानविलकर हे बाजारात भेटले व त्यांनी तुमच्या घरी चोरी झाली आहे.
लगेच जावा असे सांगितले असता फिर्यादी हे घरी परतले असता त्यांना दरवाजाचे लावलेले कुलूप खाली पडलेले दिसले.
तसेच घरात दक्षिण बाजूस असलेले कपाटाकडे पाहिल्यानंतर सामान अस्ताव्यस्त पडलेले दिसले.
या कपाटात ठेवलेले सोन्याची अर्धा तोळ्याची बोरमाळ, रोख रक्कम असा एकूण ५३ हजाराचा मुद्देमाल चोरीस गेल्याचे दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे. याचा अधिक तपास पोलिस करीत आहेत.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज