मंगळवेढा टाईम्स वृत्तसेवा:-
मंगळवेढा तालुक्यातील बोराळे येथील सिध्देश्वर मल्लिकार्जुन कवचाळे ( वय 38 ) या तरूणाने अज्ञात चिंचेच्या झाडाला सुती दोरीने गळफास घेवून आत्महत्या केली.
जाहिरातीसाठी संपर्क:7588214814
ही घटना दि . 22 च्या पहाटे 4 . 00 च्या पुर्वी घडली असून आत्महत्येचे कारण अदयाप स्पष्ट झाले नसून पोलिस त्याचा शोध घेत आहेत .
या घटनेची हकिकत अशी , यातील मयत सिध्देश्वर कवचाळे याने अज्ञात कारणासाठी दि . 22 रोजी पहाटे 4 . 00 च्या पुर्वी बोराळे गावातील सोमलिंग मंदिरासमोर असलेल्या चिंचेच्या झाडास गळफास घेवून आत्महत्या केल्याची खबर माणिक कवचाळे यांनी पोलिसांत दिल्यानंतर आकस्मित नोंद अशी करण्यात आली आहे .
आत्महत्येचे कारण स्पष्ट नसल्यामुळे मयताचे व्हिसेरा राखून ठेवला आहे . अधिक तपास पोलिस नाईक सलगर करीत आहेत .
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज