मंगळवेढा टाईम्स न्युज।
मंगळवेढा येथील नगरपरिषद निवडणुकीत नगराध्यक्षपदाच्या उमेदवारी अर्जावर परस्पर तीन अपील दाखल झाल्यामुळे निकाल वेळेत न आल्याने जिल्हाधिकारी यांनी पाठवलेल्या माहितीमुळे राज्य निवडणूक आयोगाने स्थगिती दिल्याचे जाहीर केले होते.

परंतु आता राज्य निवडणूक आयोगाकडून नगराध्यक्ष व नगरसेवक पदासाठी नव्याने निवडणुका कार्यक्रम जाहीर केला असून, दि. २० डिसेंबर रोजी मतदान होणार आणि २१ डिसेंबर रोजी मतमोजणी होणार असल्याचे राज्य निवडणूक आयोगाचे सचिव सुरेश काकाणी यांनी जाहीर केले आहे.

पूर्ण झालेल्या टप्प्यापासून पुढील प्रक्रिया नव्याने निश्चित वेळापत्रकानुसार राबवली जाणार
मंगळवेढा नगरपालिका निवडणुकीत न्यायालयीन अपिलांमुळे निर्माण झालेल्या पेचप्रसंगाला अखेर पूर्णविराम मिळाला आहे. राज्य निवडणूक आयोगाने नवा सुधारित कार्यक्रम जाहीर केला आहे. त्यानुसार २० डिसेंबर २०२५ रोजी मतदान होणार असून,
सध्या पूर्ण झालेल्या टप्प्यापासून पुढील प्रक्रिया नव्याने निश्चित वेळापत्रकानुसार राबवली जाणार आहे. त्यानुसार मंगळवेढा नगराध्यक्ष व सर्व नगरसेवक पदासाठी आणि तसेच मोहोळ, पंढरपूर, सांगोला येथील प्रत्येकी एका नगरसेवकपदासाठी नव्याने प्रक्रिया राबविण्यात येणार आहे.
मंगळवेढा नगराध्यक्षपदाच्या तीन उमेदवारी अर्जाबाबत पंढरपूर येथील जिल्हा न्यायालयात दाखल अपिलांवर २७ नोव्हेंबर २०२५ पर्यंत निर्णय न झाल्याने नगराध्यक्षपदाची निवडणूक जिल्हाधिकाऱ्यांनी निवडणूक आयोगाच्या सुधारित आदेशानुसार नगराध्यक्षपदाची निवडणूक प्रक्रिया स्थगित केल्याचे सांगितले होते.
परंतु त्यावेळी निवडणुकीचा निश्चित कालावधी सांगितला नव्हता. यापूर्वीच्या निवडणूक कार्यक्रमानुसार दि. २ डिसेंबर रोजी मतदान होऊन ३ डिसेंबरला निकाल जाहीर केला जाणार होता.

येथील नगराध्यक्षपदाची निवडणूक स्थगित झाल्यानंतर निर्माण झालेल्या गोंधळलेल्या परिस्थितीत जिल्हा सहआयुक्त नगरपालिका प्रशासनाने शुक्रवारी राज्य निवडणूक आयोगाकडे तातडीचे मार्गदर्शन मागवले होते. यासंदर्भातील सर्व न्यायालयीन कागदपत्रे व माहिती राज्य आयोगाला पाठवण्यात आली होती. परंतु शुक्रवारी व शनिवारी असून, शनिवारी रात्री ८ पर्यंत निवडणूक आयोगाकडून कोणताही आदेश आला नव्हता.

मंगळवेढा नगरपालिका नगराध्यक्षपदाची निवडणूक केंव्हा होणार आहे, निवडणूक लांबली तर केवळ नगराध्यक्ष पदाची होणार की, नगरसेवक पदाचीही एकत्रित होणार, याबाबत निवडणूक आयोगाकडून कोणतेही स्पष्टीकरण आले नसल्याने निवडणूक प्रक्रियेबाबत संभ्रम निर्माण झाला होता.

परंतु राज्य निवडणूक आयोगाने मंगळवेढा नगरपालिका निवडणुकीसंदर्भात नगराध्यक्ष व नगरसेवक पदाच्या निवडणुकीबाबत पूर्वीच्या निवडणूक कार्यक्रम स्थगिती देऊन नव्याने निवडणूक कार्यक्रम जाहीर केला आहे.
याप्रमाणे पुढील कार्यवाही केली जाणार
मंगळवेढा नगरपालिका नगराध्यक्ष व नगरसेवक निवडणुकीसंदर्भातील स्थगित केलेली निवडणूक प्रक्रियेसंदर्भात राज्य निवडणूक आयोगाने नव्याने निवडणुक कार्यक्रम जाहीर केला असून, त्याप्रमाणे पुढील कार्यवाही केली जाणार आहे.- योगेश डोके, सहआयुक्त, जिल्हा नगरपालिका, प्रशासन

असा आहे निवडणुक कार्यकम
सुधारित निवडणूक वेळापत्रक असे
जिल्हाधिकारी निवडणूक कार्यक्रम जारी करणार – दि.४ डिसेंबर
अर्ज मागे घेण्याची अंतिम तारीख – दि.१० डिसेंबर, दुपारी ३
निवडणूक चिन्ह नेमून देणे व अंतिम यादी प्रसिद्धी – दि.११ डिसेंबर
मतदान दि.२० डिसेंबर,
मतमोजणी – दि.२१ डिसेंबर २०२५
अर्ज नव्याने दाखल करता येणार नाहीत.
आता नव्या आदेशानुसार, ज्या ठिकाणी नगराध्यक्ष उमेदवाराच्या अपीलावर उशिरा निर्णय आला असेल तिथे संपूर्ण नगर परिषदेची निवडणूकच २० डिसेंबरला होईल. व जिथे फक्त नगरसेवकपदाच्या अपिलावर निर्णय आला असेल तिथे फक्त संबंधित सदस्य पदासाठीच मतदान होईल. त्यासाठी यापूर्वीचेच वैध अर्जच ग्राह्य धरले जातील. नव्याने निवडणूक प्रक्रिया जाहीर होणार असली तरी अर्ज मात्र नव्याने दाखल करता येणार नाहीत.
अशाच महत्वपूर्ण बातम्या आणि माहीती मनोरंजन मिळवा तुमच्या व्हॉट्सअँप ग्रूपमध्ये, त्यासाठी पुढील नंबर तुमच्या ग्रुपमध्ये समाविष्ट करा – 9970766262
“मंगळवेढा टाईम्स”च्या बातम्या मिळविण्यासाठी 9970766262 हा नंबर तुमच्या व्हॉट्सऍपवर ग्रुपवर ऍड करून फक्त एक मेसेज करा.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी Mangalwedha Times वर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट मंगळवेढा टाईम्स



बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज













