mangalwedhatimes.in
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • सोलापूर
  • मंगळवेढा
  • राजकारण
  • क्राईम
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • सोलापूर
  • मंगळवेढा
  • राजकारण
  • क्राईम
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
No Result
View All Result
Mangalwedha Times
No Result
View All Result

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर मंगळवेढा-पंढरपूरची पोटनिवडणुक ‘या’ पद्धतीने होणार!

टीम 'मंगळवेढा टाईम्स' by टीम 'मंगळवेढा टाईम्स'
March 16, 2021
in सोलापूर, मंगळवेढा
महाराष्ट्रातील मतदारांना मतपत्रिकेचा पर्याय मिळणार? विधानसभेच्या अध्यक्षांनी दिल्या महत्वाच्या सूचना

टीम मंगळवेढा टाईम्स ।

मंगळवेढा-पंढरपूर विधानसभा मतदार संघाच्या पोटनिवडणुकीसाठी ५२४ मतदान केंद्रावर मतदान घेतले जाणार आहे. पंढरपूर विधानसभा मतदार संघात ३२८ मतदान केंद्रावर मतदान घेतले जात होते.

मतदारांची संख्या वाढल्याने तसेच कोरोनाच्या पार्श्वभूमीवर १००० पेक्षा जास्त मतदान असणाऱ्या मतदान केंद्रासाठी १९६ सहायक मतदान केंद्रे स्थापन करण्यात आली असल्याची माहिती उपविभागीय अधिकारी गजानन गुरव यांनी दिली.

२५२ पंढरपूर विधानसभा मतदार संघाच्या पोट निवडणुकीसाठी भारत निवडणूक आयोगाकडून लवकरच निवडणूकीचा कार्यक्रम जाहीर होण्याची शक्यता असल्याने सांस्कृतिक भवन प्रांत कार्यालय पंढरपूर येथे बैठकीचे आयोजन करण्यात आले होते.

या बैठकीस उपविभागीय पोलिस अधिकारी विक्रम कदम, तहसिलदार सुशिल बेल्हेकर, स्वप्निल रावडे, तालुका आरोग्य अधिकारी डॉ.एकनाथ बोधले, निवडणूक नायब तहसिलदार सुरेश तिटकारे तसेच विविध राजकीय पक्षाचे पदाधिकारी उपस्थित होते.

यावेळी उपविभागीय अधिकारी गुरव म्हणाले, २५२-पंढरपूर विधानसभा मतदार संघ पोट निवडणूकीसाठी कोरोना आजाराच्या पार्श्वभूमीवर मतदान केंद्रावर आवश्यकती काळजी घेतली जाणार आहे.

मतदान केंद्राच्या नावात बदल, पुर्वीच्या मतदान केंद्राची इमारत मोडकळीस आल्याने मूळ मतदान केंद्राच्या ठिकाणी नवीन इमारत प्रस्तावित करण्यात आल्या आहेत.

त्याचबरोबर सहाय्यकारी मतदान केंद्राच्या ठिकाणी झालेला बदल नावात झालेला बदल याबाबतची सर्व माहिती राजकीय पक्षांच्या प्रतिनिधीना देण्यात येणार आहे.

यामध्ये काही बदल सुचवायचे असतील तर तात्काळ बदल सुचवावेत असेही गुरव यांनी सांगितले.

२५२ मंगळवेढा-पंढरपूर विधानसभा मतदार संघ पोट निवडणूकीसाठी एकूण ४२ मतदान केंद्राच्या नावांमध्ये बदल झालेला असून पंढरपूर शहर २२, ग्रामीण २ तसेच मंगळवेढा येथील २८ केंद्राच्या नावात बदल झाले आहे.

मतदार यादीत छायाचित्र नसलेल्या मतदारांचे फोटो संकलित करण्याबाबत संबधितांनी बीएलए नेमून बीएलओनां सहकार्य करावे. तसेच ज्यांचे वय ०१.०१.२०२१ रोजी १८ वर्षे पुर्ण झाले आहे त्यांनी मतदार नोंदणी करावी. निवडणूक कार्यक्रम जाहीर झाल्यात कोणालाही मतदार नोंदणी करता येणार नाही. असेही गुरव यांनी सांगितले.

२५२ मंगळवेढा-पंढरपूर विधानसभा मतदार संघ पोटनिवडणूक निपक्ष, निर्भिड वातावरणात पार पाडण्यासाठी पोलीस प्रशासनाच्या वतीने योग्यती तयारी केली आहे.

या निवडणुकीत मतदान केंद्राची संख्या वाढल्याने आवश्यक पोलीस बदोबस्त उपलब्ध केला जाणार असल्याचे उपविभागीय पोलिस अधिकारी विक्रम कदम यांनी सांगितले.

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.

ताज्या बातम्या थेट मोबाईलवर मिळवण्यासाठी आजच जॉईन व्हा

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज

Tags: तयारीपोटनिवडणुकमंगळवेढा पंढरपूर मतदारसंघ

संबंधित बातम्या

जनता संभ्रमात! भगीरथ भालकेंचे नेमकं चाललंय तरी काय, दोन दिवसात दोन वेगवेगळ्या पक्षाकडून भरले अर्ज; पंढरपूर-मंगळवेढ्याच्या जागेबाबत सस्पेन्स आणखी वाढला?

भगीरथदादा आता प्रवास पुरे! ‘पक्षांतराचा प्रवास आता थांबवा’; सिद्धाराम म्हेत्रेंचा भगीरथ भालकेंना रोखठोक सल्ला

April 13, 2026
दुर्दैवी घटना! सांगोल्यातील ‘या’ गावात दोन बहिणींचा शेततळ्यात बुडून मृत्यू

काळीज पिळवटून टाकणारी घटना! शेततळ्यात बुडून बहीण-भावाचा अंत; आजीसमोरच काळाचा घाला; सोलापूर जिल्ह्यातील धक्कादायक घटना

April 13, 2026
नागरिकांनो! शासकीय योजनेंची कामे प्रलंबित आहेत तर तुमच्या समस्या लेखी स्वरूपात आज द्या; आमदार समाधान आवताडे यांनी उद्या बोलावली आढावा बैठक

मंगळवेढेकरांची प्रतीक्षा आता संपणार ! महात्मा बसवेश्वर स्मारकाची जागा निश्चित; निधी कमी पडू देणार नाही; आमदार समाधान आवताडेंची ग्वाही

April 13, 2026
Breaking! मंगळवेढ्याच्या दोन ‘नायब तहसीलदारां’ची तहसीलदार पदावर पदोन्नती

संतापजनक! घरजागा नावावर करण्यास नकार; पोटच्या मुलानेच वृद्ध आईला घराबाहेर हाकलले; न्यायासाठी वृद्धेची पोलिस अधीक्षकांकडे धाव

April 12, 2026
न्यूरोसर्जन डॉ.शिरीष वळसंगकर प्रकरणाला वेगळं वळण; आरोपी महिलेच्या वकिलाचा मोठा खुलासा

बापरे..! सोलापुरातील वकिलास जीएसटीची १२१ कोटी दंडाची नोटीस; काय आहे नेमके प्रकरण?

April 12, 2026
सोलापूर जिल्ह्यातील प्रत्येक तालुक्यातील एका गावाची निवड, १० लाख रुपयांचे बक्षीस; मंगळवेढा तालुक्यातील ‘या’ ग्रामपंचायतीचा होणार सन्मान

Breaking! मंगळवेढ्यात शासकीय नियमांची ऐशीतैशी; दालनात वाढदिवस साजरा करणे पडणार महागात; गटविकास अधिकारी यांचा अहवाल सादर करण्याचे पुण्यातून फर्मान

April 12, 2026
तगडा उमेदवार! पंढरपूर-मंगळवेढा विधानसभा मतदारसंघावर शिंदे गटाचा दावा; भैरवनाथ शुगरचे व्हा.चेअरमन अनिल सावंत निवडणूक लढवणार?

अनिल सावंत ‘स्वगृही’ तर भालके ‘नाथांच्या’ चरणी; मंगळवेढा-पंढरपूरच्या राजकारणात ‘विठ्ठल’ कोणाला पावणार?

April 12, 2026
प्रियकराच्या सांगण्यावरूनच जन्मदात्या आईने 9 महिन्याच्या बाळाचा गळा घोटला

मोठी बातमी! मंगळवेढ्यात सख्खा भाऊच बनला ‘यमदूत’; कुऱ्हाडीच्या एका वाराने होत्याचे नव्हते झाले; खुनामागचं खरं कारण वाचून अंगावर येईल काटा

April 11, 2026
एकाच छताखाली २५ स्टॉल्स, सेवांचा पाऊस; एकाच दिवशी तब्बल ‘इतके’ हजार लाभार्थ्यांच्या चेहऱ्यावर समाधानाचे हास्य उमटले; पाटकळ महसूल विभागात विक्रमी कामकाज

एकाच छताखाली २५ स्टॉल्स, सेवांचा पाऊस; एकाच दिवशी तब्बल ‘इतके’ हजार लाभार्थ्यांच्या चेहऱ्यावर समाधानाचे हास्य उमटले; पाटकळ महसूल विभागात विक्रमी कामकाज

April 11, 2026
Next Post
खा.शरद पवारांच्या आजच्या सरकोली दौऱ्याकडे जिल्ह्याचे लक्ष, असा असेल दौरा

राष्ट्रवादी कॉंग्रेसचे सर्वेसर्वा खा.शरद पवार यांना 'हे' विद्यापीठ देणार डी.लिट.पदवी, सिनेट सभेत बहुमताने ठराव मंजूर

ताज्या बातम्या

जनता संभ्रमात! भगीरथ भालकेंचे नेमकं चाललंय तरी काय, दोन दिवसात दोन वेगवेगळ्या पक्षाकडून भरले अर्ज; पंढरपूर-मंगळवेढ्याच्या जागेबाबत सस्पेन्स आणखी वाढला?

भगीरथदादा आता प्रवास पुरे! ‘पक्षांतराचा प्रवास आता थांबवा’; सिद्धाराम म्हेत्रेंचा भगीरथ भालकेंना रोखठोक सल्ला

April 13, 2026
दुर्दैवी घटना! सांगोल्यातील ‘या’ गावात दोन बहिणींचा शेततळ्यात बुडून मृत्यू

काळीज पिळवटून टाकणारी घटना! शेततळ्यात बुडून बहीण-भावाचा अंत; आजीसमोरच काळाचा घाला; सोलापूर जिल्ह्यातील धक्कादायक घटना

April 13, 2026
नागरिकांनो! शासकीय योजनेंची कामे प्रलंबित आहेत तर तुमच्या समस्या लेखी स्वरूपात आज द्या; आमदार समाधान आवताडे यांनी उद्या बोलावली आढावा बैठक

मंगळवेढेकरांची प्रतीक्षा आता संपणार ! महात्मा बसवेश्वर स्मारकाची जागा निश्चित; निधी कमी पडू देणार नाही; आमदार समाधान आवताडेंची ग्वाही

April 13, 2026
Breaking! मंगळवेढ्याच्या दोन ‘नायब तहसीलदारां’ची तहसीलदार पदावर पदोन्नती

संतापजनक! घरजागा नावावर करण्यास नकार; पोटच्या मुलानेच वृद्ध आईला घराबाहेर हाकलले; न्यायासाठी वृद्धेची पोलिस अधीक्षकांकडे धाव

April 12, 2026
न्यूरोसर्जन डॉ.शिरीष वळसंगकर प्रकरणाला वेगळं वळण; आरोपी महिलेच्या वकिलाचा मोठा खुलासा

बापरे..! सोलापुरातील वकिलास जीएसटीची १२१ कोटी दंडाची नोटीस; काय आहे नेमके प्रकरण?

April 12, 2026
सोलापूर जिल्ह्यातील प्रत्येक तालुक्यातील एका गावाची निवड, १० लाख रुपयांचे बक्षीस; मंगळवेढा तालुक्यातील ‘या’ ग्रामपंचायतीचा होणार सन्मान

Breaking! मंगळवेढ्यात शासकीय नियमांची ऐशीतैशी; दालनात वाढदिवस साजरा करणे पडणार महागात; गटविकास अधिकारी यांचा अहवाल सादर करण्याचे पुण्यातून फर्मान

April 12, 2026
mangalwedhatimes.in

प्रिंट,टीव्ही मीडियानंतर सध्या डिजिटल मीडियाचं महत्व प्रचंड वाढलंय. येणाऱ्या काळात या माध्यमाचं महत्व आणि व्याप्ती आणखी वाढणार असल्यानं . आम्ही हा नवीन बदल स्वीकारून 'मंगळवेढा टाईम्स' या सोशल मीडियाच्या फेसबुक पेजचे रूपांतर वेब मीडिया मध्ये करून 'मंगळवेढा टाईम्स' या नावाने न्युजचे वेब पोर्टल आपल्या सेवेत दाखल झालय. येथे आपण आपल्या स्मार्टफोन, कॉम्पुटर वरून देश विदेशातील घडामोडी तसेच स्थानिक, व्यापार, ग्रामीण, सांस्कृतिक, उद्योग, कृषी, मनोरंजन, तंत्रज्ञान, शिक्षण अश्या विविध श्येत्रांतील बातम्या घरबसल्या वाचू शकता. स्मार्टफोन, सोशल मीडियाच्या माध्यमातून बातम्या पाहण्यात लोकांचा कल वाढतोय, म्हणूनच आम्ही बदलतोय.

© 2020 Website Maintained by Tushar Bhambare..