टीम मंगळवेढा टाईम्स ।
राखी पौर्णिमा अर्थात राखी बहिणीने भावाच्या हाताला बांधणे. याकरिता भद्रा वर्ज्य नाही आणि राखी बांधण्यासाठी कोणत्याही वेगळ्या मुहूर्ताची आवश्यकता नाही.
त्यामुळे भद्राचा विचार न करता आज ११ ऑगस्ट या दिवशी नेहमीप्रमाणे राखीपौर्णिमा साजरी करावी , असे पंचांगकर्ते दाते यांनी सांगितले आहे.
पूर्वीच्या काळी रक्षाबंधनाचा अर्थ बहिणीने भावाला राखी बांधणे एवढाच अभिप्रेत नव्हता,
त्याकाळी रक्षाहोम करून रक्षासूत्र तयार करून ते राजाला बांधले जायचे, अशा पद्धतीने रक्षाबंधन विधी करणाऱ्यांसाठी भद्राकाल वर्ज्य सांगितला आहे.
रक्षाबंधन हे मुंज , विवाह , वास्तूप्रमाणे मंगल कार्यासारखे नसून सामाजिक उत्सव आहे, असेही पंचांगकर्ते दाते यांनी सांगितले.(स्रोत:लोकमत)
असे करता येईल विधिवत रक्षाबंधन
ज्यांना रक्षाबंधन विधिवत करावयाचे आहे. त्यांनी खालील प्रमाणे विधी करावा व त्यासाठी भद्राकाल आवश्य वर्ज्य करावा. रक्षाबंधन विधी सूर्योदयी स्नान करावे. उपाकर्म व ऋषींचे तर्पण करावे.
अपराहनकाली रक्षा – व पांढऱ्या मोहय एकत्र करून त्यांची पुरचुंडी बांधल्याने रक्षा अर्थात् राखी तयार होते. मग तिची पूजा करावी.
अशाच महत्वपूर्ण बातम्या आणि माहीती मनोरंजन मिळवा तुमच्या व्हॉट्सअँप ग्रूपमध्ये, त्यासाठी पुढील नंबर तुमच्या ग्रुपमध्ये समाविष्ट करा – 9970766262
“मंगळवेढा टाईम्स”च्या बातम्या मिळविण्यासाठी 9970766262 हा नंबर तुमच्या व्हॉट्सऍपवर ग्रुपवर ऍड करून फक्त एक मेसेज करा.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज