मंगळवेढा टाईम्स न्युज नेटवर्क ।
राज्यात स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीच्या दुसऱ्या टप्प्यातील २९ महापालिका निवडणुकीची रणधुमाळी सुरू झाली आहे. सर्वाेच्च न्यायालयाने सर्वच स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका ३१ जानेवारीपूर्वी घेण्याचे निर्देश राज्य निवडणूक आयोगाने दिले होते.
त्यानुसार आता जिल्हा परिषद निवडणुकांसदर्भात एक मोठी अपडेट समोर आली आहे. महापालिका निवडणुकीच्या प्रचारा दरम्यानच जिल्हा परिषद निवडणुकीची घोषणा होण्याची शक्यता आहे.

नगरपरिषद निवडणुकीच्या निकालानंतर राज्यातील महापालिका निवडणुकांचे बिगुल वाजले असून, राजकीय पक्षांनी जोरदार मोर्चेबांधणीला सुरुवात केली आहे.

या निवडणुकीसाठी ३० डिसेंबर उमेदवारी अर्ज भरण्याची शेवटची तारीख असून, उमेदवारी अर्ज उमेदवारांकडून दाखल करण्यासाठी लगभग सुरू झाली आहे.

या सगळ्या घडामोडीत जिल्हा परिषद निवडणुकीचा धुरळा उडणार असल्याची महत्वाची माहिती आहे. याबाबत अधिकृत राज्य निवडणूक आयोगाने घोषणा केल्यानंतर अंतिम शिक्कामोर्तेब होणार आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, जिल्हा परिषद निवडणूक दोन टप्प्यात पार पडणार असल्याचे निश्चित मानले जात आहे. पहिल्या टप्प्यात १२ जिल्हा परिषद आणि १२५ पंचायत समित्यांच्या निवडणुका अवघ्या २१ दिवसांत घेतल्या जातील, अशी माहिती आहे.

त्यामुळे जानेवारीच्या दुसऱ्या आठवड्यात जिल्हा परिषद निवडणुकीची घोषणा होऊन ८ जानेवारीपूर्वी आचारसंहिता लागण्याची शक्यता आहे.
आता प्रश्न आहे ज्या २० जिल्हा परिषदांमध्ये आणि २११ पंचायत समित्यांमध्ये ५० टक्क्यांची आरक्षण मर्यादा ओलांडली आहे. या निवडणुकांना सर्वोच्च न्यायालयाने स्थगिती दिली आहे.

दरम्यान, जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकांच्या घोषणेकडे राजकीय पक्षांसह सर्वांचेच लक्ष लागले आहे. ज्या ठिकाणी स्थगिती देण्यात आली आहे, त्या जिल्हा परिषदांच्या निवडणुका घेण्यासाठी ३१ जानेवारीची मर्यादा ओलांडली जाऊ शकते, अशी शक्यता आहे.
मात्र, सुप्रीम कोर्टात आरक्षण मर्यादा ओलांडल्या प्रकरणी २१ जानेवारी रोजी काय निर्णय अंतिम केला जाणार हे सुनावनीनंतरच स्पष्ट होणार आहे. त्यामुळे सुनावणीनंतरच राज्य निवडणूक आयोग या निवडणुका जाहीर करण्याची शक्यता आहे.
अशी आहे शक्यता
जानेवारीच्या दुसऱ्या आठवड्यात निवडणुकीची घोषणा झाल्यास १० ते १७ जानेवारी दरम्यान उमेदवारी अर्ज भरण्याची प्रक्रिया सुरू होईल.
१८ ते २० जानेवारी अर्जाची छाननी आणि माघार घेता येईल.
२१ जानेवारी रोजी चिन्ह वाटप.
३० जानेवारी रोजी मतदान होईल.
३१ जानेवारी रोजी मतमोजणी होण्याची शक्यता.
अशाच महत्वपूर्ण बातम्या आणि माहीती मनोरंजन मिळवा तुमच्या व्हॉट्सअँप ग्रूपमध्ये, त्यासाठी पुढील नंबर तुमच्या ग्रुपमध्ये समाविष्ट करा – 9970766262
“मंगळवेढा टाईम्स”च्या बातम्या मिळविण्यासाठी 9970766262 हा नंबर तुमच्या व्हॉट्सऍपवर ग्रुपवर ऍड करून फक्त एक मेसेज करा.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी Mangalwedha Times वर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट मंगळवेढा टाईम्स.



बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज














