mangalwedhatimes.in
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • सोलापूर
  • मंगळवेढा
  • राजकारण
  • क्राईम
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • सोलापूर
  • मंगळवेढा
  • राजकारण
  • क्राईम
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
No Result
View All Result
Mangalwedha Times
No Result
View All Result

सत्तांतराबाबत अजितदादांचा गौप्यस्फोट : मी उद्धवजींना सावध केलं होतं, ते म्हणाले..

टीम 'मंगळवेढा टाईम्स' by टीम 'मंगळवेढा टाईम्स'
February 4, 2023
in राजकारण, राज्य
MPSC भरतीची कधी निघणार जाहिरात; उपमुख्यमंत्री अजित पवारांनी दिली माहिती

टीम मंगळवेढा टाईम्स। 

राज्यात सहा महिन्यापूर्वी सत्तातर झाले. शिवसेनेतून ४० आमदार शिंदे गटात गेल्याने ठाकरे सरकार कोसळले. शिवसेनेत फूट पडणार, अशी कुणकुण काही राजकीय नेत्यांना लागली होती.

यावर विरोधी पक्ष नेते अजित पवार यांनी गौप्यस्फोट केला आहे. ते एका मुलाखतीत बोलत होते.

अजित पवार म्हणाले, “आमदार फुटणार ही महिती उद्धव ठाकरेंना दोन,तीन वेळा दिली होती. राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनीही फोन करुन बैठक घेतली होती. पण ‘माझ्या आमदारावर माझा विश्वास आहे,’ असे उद्धव ठाकरे म्हणाले होते. पण स्वत: पक्षनेतृत्वाने आपल्या आमदारांवर डोळे झाकून विश्वास टाकला तिथेच खरी गफलत झाली,”

“या सगळ्या गोष्टी घडून दिल्या गेल्या आहेत. आमदारांना खुशाल जाऊ दिलं गेलं. तिकडे हे व्हायला नको होतं. मी स्वतः उद्धवजींना सावध केलं होतं पण ते बोलले की मी बोलेन, एकनाथ शिंदे यांच्याशी तो आमचा पक्षांतर्गंत मामला आहे, असं उत्तर त्यांनी दिलं,” असे अजित पवार यांनी सांगितले

अडीच वर्षांपूर्वी राजभवनात भल्या पहाटे शपथविधी झाला होता, यावेळी देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्री पदाची तर अजित पवार यांनी उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली होती.

यावरुन अजित पवार यांना नेहमीच प्रश्न विचारण्यात येतो. यावर ” सारखं सारखं भल्या भल्या पहाटे नका म्हणत जाऊ, सकाळी 8 वाजता तो शपथविधी झाला होता. त्यावर मी जास्त बोलणार नाही,” असे म्हणत अजित पवार यांनी या विषयावर बोलणं टाळलं.

नाशिक पदवीधर मतदारसंघातून अपक्ष उमेदवार सत्यजीत तांबे विजयी झाले. तर महाविकास आघाडीच्या उमेदवार शुभांगी पाटील यांचा २९ हजारांनी पराभव झाला आहे. सत्यजीत तांबे यांना तब्बल 68 हजार 999 मतं मिळाली आहेत. त्यांचा तब्बल 29 हजार 465 मतांनी विजय झाला.

सत्यजीत तांबे यांच्या विजयावर प्रतिक्रिया देतांना अजित पवार यांनी तांबेंना राष्ट्रवादी काँग्रेसने मदत केली होती, असे विधान केले आहे. “मविआतल्याही काहींनी सत्यजीतला मदत केली”त्या मतदारसंघात त्याला एवढी मतं मिळाल्यामुळे महाविकास आघाडीतील इतरांनीही त्याला मदत केलेली दिसते.

त्याचे निवडणुकीचे आडाखे आणि मविआतल्या लोकांनी, मतदारांनी त्याला दिलेली साथ यामुळेच एवढं दैदिप्यमान यश मिळालं आहे,” असे अजित पवार यांनी म्हटलं आहे.

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.

ताज्या बातम्या थेट मोबाईलवर मिळवण्यासाठी आजच जॉईन व्हा

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज

Tags: अजित पवार

संबंधित बातम्या

माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना कोरोनाची लागण

मंगळवेढ्यात भाजप महिला मोर्चाचे रणशिंग; तालुका कार्यकारिणी जाहीर; पक्ष बळकटीकरणाचा निर्धार; आशा पाटील यांनी केली निवडीची अधिकृत घोषणा

April 1, 2026
मास्क वापरा अन्यथा भरा ‘एवढा’ दंड! सोलापूर जिल्हा प्रशासनानं जारी केला नवा आदेश

कामाची बातमी! SIR म्हणजे काय? SIR यादीत नाव आहे की नाही? कसं चेक करायचं?

April 1, 2026
बाबो..! अशोक खरातच्या मोबाइलमधील डेटा पाहून पोलीसही चक्रावले, धक्कादायक माहिती समोर; पुन्हा गूढ वाढले

बाबो..! अशोक खरातच्या मोबाइलमधील डेटा पाहून पोलीसही चक्रावले, धक्कादायक माहिती समोर; पुन्हा गूढ वाढले

March 30, 2026
‘मी देवेंद्र फडणवीस शपथ घेतो की.’, महाराष्ट्रात ‘देवेंद्र’ पर्वाला सुरुवात; आजपासूनच फडणवीस यांच्यापुढे असतील ‘हे’ 5 आव्हान

नागरिकांनो! देशात इंधनाचा तुटवडा नाही, लॉकडाऊनच्या अफवा पसरवणाऱ्यांवर कारवाई करणार; मुख्यमंत्री फडणवीसांचा कडक इशारा

March 29, 2026
शेतरस्ते बंद करणाऱ्यांवर फौजदारी गुन्हे दाखल करा; पोलीस संरक्षणासह ‘ही’ फी बंद करणार; महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांचे आदेश

शेतकऱ्यांनो! शेतरस्ता अडवाल तर महागात पडेल, ५ वर्ष शासनाचा कोणताही लाभ मिळणार नाही; नवा निर्णय काय?

March 28, 2026
नागरिकांनो! शासकीय योजनेंची कामे प्रलंबित आहेत तर तुमच्या समस्या लेखी स्वरूपात आज द्या; आमदार समाधान आवताडे यांनी उद्या बोलावली आढावा बैठक

पुण्यातील मंगळवेढेकर बांधवांसाठी सुवर्णसंधी! आमदार समाधान आवताडे साधणार थेट ‘संवाद’; अडीअचणी जाणून घेण्यासाठी विशेष बैठक

March 28, 2026
मोठी बातमी! वर्षाला ‘इतके’ गॅस सिलिंडर मोफत देणार; युती सरकार आणा, पुढील 5 वर्षे वीज मोफत.; भरसभेत अजित पवारांची मोठी घोषणा

मोठी बातमी! बारामतीत अपघात, बंगळुरूत तक्रार; अजित पवार अपघात प्रकरणी दाखल झालेली झिरो FIR नेमकी आहे तरी काय?

March 27, 2026
अभिमानास्पद लढा! मंगळवेढ्याचा महेंद्र गायकवाड ठरला महाराष्ट्र केसरीचा उपविजेता; मिळाली ‘ही’ बक्षिसे

महाराष्ट्र केसरी: महेंद्रची झुंज ठरली थरारक; मंगळवेढ्याचा ‘मान’ थोडक्यात हुकला; मैदानात काय घडलं?

March 23, 2026
खळबळ! मंगळवेढा तालुक्यात पंतप्रधान किसान सन्मान योजनेत तब्बल २ हजार ६०० बोगस लाभार्थी

सावधान! इम्पोर्ट-एक्सपोर्ट व्यवसायाचे आमिष दाखवून शेतकऱ्याला १४ लाखांचा गंडा; पुण्यातील तिघांविरुद्ध पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल

March 24, 2026
Next Post

सोलापूर विद्यापीठ व्यवस्थापन परिषदेच्या तीन जागांसाठी निवडणूक; मंगळवेढ्यातून यांना मिळाली संधी

ताज्या बातम्या

Breaking! मंगळवेढ्याच्या दोन ‘नायब तहसीलदारां’ची तहसीलदार पदावर पदोन्नती

खड्डा खोदून पूजाविधीचा प्रकार; मंगळवेढ्यात भीतीचे वातावरण; नरबळीच्या अफवेने परिसरात खळबळ; पोलिसांचा मोठा खुलासा

April 1, 2026
माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना कोरोनाची लागण

मंगळवेढ्यात भाजप महिला मोर्चाचे रणशिंग; तालुका कार्यकारिणी जाहीर; पक्ष बळकटीकरणाचा निर्धार; आशा पाटील यांनी केली निवडीची अधिकृत घोषणा

April 1, 2026
मंगळवेढ्यात विद्यार्थ्यांसाठी ‘सुवर्णसंधी’! एका कोर्सच्या फीमध्ये दुसरा कोर्स मोफत; ACTI कॉम्प्युटर इन्स्टिट्यूटची ऑफर; महिला दिनानिमित्त मुलींना विशेष सवलत

बांधकाम कामगारच्या मुलांना कॉप्युटर कोर्स नंतर मिळणार, ‘एवढे’ रुपये; आम्ही फक्त AI वापरण्यापुरते शिकवत नाही; AI तयार करायला शिकवतो; आता मंगळवेढा व नंदेश्वर मध्ये ACTI

April 1, 2026
महिलांनो! बसने प्रवास करताय तर सावधान, मंगळवेढा बसस्थानकावरून महिला प्रवाशाचे १० लाख किंमतीचे सोन्याचे दागिने चोरट्याने हातोहात पळविले; स्थानिक गुन्हे शाखेचे पथक दाखल

भरदिवसा धाडसी चोरी! ​मंगळवेढा एसटी स्टँडवर गर्दीचा फायदा; बसमध्ये चढताना महिलेचे ६० हजारांचे गंठण चोरीला

April 1, 2026
मरवडे-चडचण रोडवर अपघात; एका कामगाराचा मृत्यू,महिला गंभीर जखमी

धक्कादायक! लग्नाच्या गाठी बांधण्यापूर्वीच काळाचा घाला; देवदर्शनाला निघालेल्या तरुणीचा मंगळवेढ्यात अपघातात अंत; होणारा पती जखमी

March 31, 2026
​’साप्ताहिक रणयुग टाईम्स’चा १४ वा वर्धापन दिन: मंगळवेढ्यात कर्तृत्ववानांचा होणार सन्मान; संपादक प्रमोद बिनवडे यांची माहिती

​हार-तुरे नकोत, वही-पेन हवे! अनाथ व गरजूंच्या शिक्षणासाठी संपादक प्रमोद बिनवडे यांचे भावनिक आवाहन

March 31, 2026
mangalwedhatimes.in

प्रिंट,टीव्ही मीडियानंतर सध्या डिजिटल मीडियाचं महत्व प्रचंड वाढलंय. येणाऱ्या काळात या माध्यमाचं महत्व आणि व्याप्ती आणखी वाढणार असल्यानं . आम्ही हा नवीन बदल स्वीकारून 'मंगळवेढा टाईम्स' या सोशल मीडियाच्या फेसबुक पेजचे रूपांतर वेब मीडिया मध्ये करून 'मंगळवेढा टाईम्स' या नावाने न्युजचे वेब पोर्टल आपल्या सेवेत दाखल झालय. येथे आपण आपल्या स्मार्टफोन, कॉम्पुटर वरून देश विदेशातील घडामोडी तसेच स्थानिक, व्यापार, ग्रामीण, सांस्कृतिक, उद्योग, कृषी, मनोरंजन, तंत्रज्ञान, शिक्षण अश्या विविध श्येत्रांतील बातम्या घरबसल्या वाचू शकता. स्मार्टफोन, सोशल मीडियाच्या माध्यमातून बातम्या पाहण्यात लोकांचा कल वाढतोय, म्हणूनच आम्ही बदलतोय.

© 2020 Website Maintained by Tushar Bhambare..

No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • सोलापूर
  • मंगळवेढा
  • राजकारण
  • क्राईम
  • मनोरंजन
  • शैक्षणिक

© 2020 Website Maintained by Tushar Bhambare..

ताज्या बातम्या थेट मोबाईलवर मिळवण्यासाठी आजच जॉईन व्हा