mangalwedhatimes.in
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • सोलापूर
  • मंगळवेढा
  • राजकारण
  • क्राईम
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • सोलापूर
  • मंगळवेढा
  • राजकारण
  • क्राईम
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
No Result
View All Result
Mangalwedha Times
No Result
View All Result

गुन्हे दाखल झाले तरी बेहत्तर पण आज सोलापुरातील मराठा समाजाचा आक्रोश मोर्चा निघणारच

टीम 'मंगळवेढा टाईम्स' by टीम 'मंगळवेढा टाईम्स'
July 4, 2021
in सोलापूर
अखेर ठाकरे सरकार नमलं! मराठा समाजासाठीचा सवलतींचा जीआर निघाला

टीम मंगळवेढा टाईम्स ।

मराठा आरक्षणाबाबत राज्य शासनाने केंद्राकडे तात्काळ प्रस्ताव पाठवावा. त्यासाठी राज्यशासनाने पावसाळी अधिवेशनाचा एक दिवस वाढवावा पण मराठा आरक्षणाचा प्रश्न निकालात काढावा अशी मागणी माढा लोकसभा मतदारसंघाचे खासदार रणजितसिंह नाईक-निंबाळकर यांनी केली आहे.

पोलीस मराठा आक्रोश मोर्चा दडपण्याचा प्रयत्न करतेय : खासदार नाईक-निंबाळकर

आज सोलापुरात होणाऱ्या मराठा आक्रोश मोर्चावेळी ग्रामीण भागातून येणाऱ्या मराठा तरुणांची अडवणूक किंवा दडपशाही केल्यास त्यामुळे होणाऱ्या उद्रेकास राज्य सरकार आणि पोलीस प्रशासन जबाबदार असेल. आम्ही नेहमीप्रमाणे शांततेत मोर्चा काढणार आहोत त्यामुळे पोलीस प्रशासनाने आम्हाला सहकार्य करावे.

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर आक्रोश मोर्चात होणाऱ्या गर्दीबाबत विचारले असता खासदार नाईक-निंबाळकर म्हणाले की, राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या कार्यक्रमात हजारोंची गर्दी चालते मग आमच्या का नाही? आम्हीही सॅनिटायझर, मास्कचा वापर करणार आहोत. सर्व नियम आणि अटींना आधीन राहून आम्ही मोर्चा काढणार आहोत. सदरचा मोर्चा हा कोरोनाचा प्रादुर्भाव कमी झाल्यामुळे आम्ही आत्ता हा मोर्चा काढत आहोत.

सोलापुरातील ठिणगीचा राज्यभर वनवा पसरणार : खासदार नाईक-निंबाळकर

मराठा आरक्षणासंदर्भात राज्यातील पहिला मराठा आक्रोश मोर्चाची सुरुवात ही सोलापुरातून होत आहे. या सोलापुरात पडलेल्या ठिणगीचा वनवा राज्यभर पसरेल. त्यामुळे सरकारने तात्काळ या मोर्चाची दखल घेऊन मराठा आरक्षणाचा प्रश्न मार्गी लावावा.(स्रोत:लोकमत)

मराठा आरक्षणासाठी आज सोलापुरात एल्गार


मराठा आरक्षणासाठी पुन्हा क्रांती मोर्चाच्या वतीने एल्गार पुकारण्यात आला आहे. त्याअंतर्गत कोल्हापुरातून पहिले मोर्चाचे वादळ उठले.

आता दुसरा मोर्चा आज सोलापुरात आहे. यानिमित्ताने जय्यत तयारी करण्यात आली असून आज सकाळी 11 वाजता हा मोर्चा काढण्यात येणार आहे. त्यासाठी शहर व जिल्ह्यातून सुमारे 25 ते 30 हजार मराठा मावळे सहभाग होणार असल्याचा अंदाज संयोजकांकडून व्यक्‍त केला आहे.

मराठा समाजाच्या या मोर्चाला पोलिस प्रशासनाने कोरोना व डेल्टा प्लसमुळे परवानगी नाकारली आहे. मोर्चा काढू नये, अशा नोटिसा देखील देण्यात आल्या आहेत.

परंतु, हा मोर्चा काढून यशस्वी करणार असल्याचा निर्धार आर्थिक विकास महामंडळाचे अध्यक्ष तथा मोर्चाचे नेतृत्व करणारे नरेंद्र पाटील यांनी केला आहे.

या पार्श्‍वभूमीवर शहर व जिल्ह्यात पोलिसांचा मोठा बंदोबस्त राहणार आहे. तसेच आंदोलकावर गुन्हा दाखल करण्याचा इशारा पोलिसांकडून देण्यात आला आहे.

हा मोर्चा भव्य आणि उग्र स्वरूपाचा निघणार आहे. मराठा समाजाला आरक्षण मिळवून देण्यासाठी हा मोर्चा बोलका असणार आहे. कोल्हापूरनंतर सोलापुरात मोठा मोर्चा आज निघणार आहे.

या मोर्चामध्ये जिल्ह्यातील खासदार, आमदार, नगरसेवक, गटनेते आदी राजकीय नेते सहभागी होणार आहे. याबरोबर युवक, महिला, वयोवृध्द, लहान मुलांचा सहभाग असणार आहे. या मोर्चाला माकप, लोहार समाज, तौफिक शेख, यांनी पाठिंबा दिला आहे. या मोर्चाची सुरूवात छत्रपती संभाजी महाराज पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून करण्यात येणार आहे.

त्यानंतर पुढे जिल्हाधिकारी कार्यालयावर हा मोर्चा धडकणार आहे. दरम्यान या मोर्चाला पोलिस प्रशासनाने परवानगी नाकारल्याने पोलिस आणि मराठा समाजाच्या प्रमुख नेत्यामध्ये धरपकड होण्याची शक्यता आहे.

एकीकडे कोरोना असून कलम 144 लागू आहे. विशेषतः ग्रामीण भागातून मराठा समाज मोठ्या संख्येने येणार आहे.संयोजकांकडून देखील हा मोर्चा यशस्वी करण्यासाठी नियोजन करण्यात आले असल्याचे सांगितले आहे.

ऐनवेळी मोर्चाच्या सभेचे ठिकाण बदलले

मराठा क्रांती मोर्चाच्या वतीने रविवारी आक्रोश मोर्चा आयोजित केला आहे. परंतु, पोलिसांनी मोर्चाला परवानगी नाकारली आहे. चोख बंदोबस्त ठेवला आहे. त्यामुळे आयोजकांनी पोलिस दडपशाही करीत असल्याचा आरोप केला आहे. त्यामुळे पूनम गेट येथे होणार्‍या मोर्चा सभेचे पूर्वनियोजित ठिकाण ऐनवेळी शनिवारी रात्री बदलण्यात आले. आता या मोर्चाची सभा पार्क चौक येथील चार पुतळा येथे होणार आहे.

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.

ताज्या बातम्या थेट मोबाईलवर मिळवण्यासाठी आजच जॉईन व्हा

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज

Tags: आक्रोश मोर्चामराठा आरक्षणसोलापूर

संबंधित बातम्या

गालबोट! मंगळवेढ्यात वर्ग वाटपावरून शिक्षक-मुख्याध्यापकात हमरीतुमरी, ‘या’ शाळेतील प्रकार; कारवाईसाठी ‘प्रहार’ संघटना आक्रमक

अद्भूत धाडस! विषारी ‘कोब्रा’ चावला, ब्लेडने रक्त काढले अन् सापाला सोबत घेऊन गाठला दवाखाना; मंगळवेढ्याच्या प्राचार्यांचा काळजाचा ठोका चुकवणारा थरार; अखेर मृत्यूवर मात

October 12, 2026
विद्यार्थ्यांच्या ऑनलाइन परीक्षांसाठी वीजपुरवठा सुरळीत ठेवा

दुहेरी संकट! दुष्काळात ‘करंट’चा झटका; अंगाची लाही अन् विजेचा खोडसाळपणा; भीषण दुष्काळात सोलापूर जिल्ह्यात भारनियमनाचा घाव

October 11, 2026
शेतकऱ्यांची दिवाळी आनंदात! मंगळवेढा तालुक्यातील 36 हजार शेतकऱ्यांच्या खात्यावर अनुदान वर्ग

सोलापूर जिल्ह्यातील दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांसाठी दिलासा: पंचनामे पूर्ण; केंद्रीय पथक पाहणीसाठी दाखल; आज मंगळवेढ्यात; मदत कधी आणि किती मिळणार?

October 10, 2026
सोन्याच्या पावलांनी गौराई आली…; गौरी पूजनासाठी लागणारे साहित्य कोणते? ‘अशी’ करा पूजेची मांडणी

नवरात्र नऊ नाही, यंदा तब्बल १० दिवसांचे! सप्तमी तिथी वाढली; असा आहे घटस्थापनेचा मुहूर्त

October 10, 2026
पालकमंत्रिपदी नियुक्त झाल्यानंतर पहिल्यांदाच जयकुमार गोरे आज सोलापूर जिल्ह्याच्या दौऱ्यावर

मागणी करा, चारा डेपो लगेच सुरू होणार; सोलापूरच्या शेतकऱ्यांना पालकमंत्र्यांचा मोठा दिलासा; रब्बी पेरणीपूर्वी ‘हे’ तपासण्याचे आवाहन

October 8, 2026
दिपावलीचा दुसरा हप्ता कारखान्यांनी देऊन शेतकऱ्यांची दिवाळी गोड करावी; ऊस उत्पादक शेतकरी बालाजी गरड यांचे भावनिक आवाहन

मंगळवेढा तालुक्यातील शेतकऱ्यांना सरसकट नुकसान भरपाई मिळवून देण्यासाठी उपसरपंच बालाजी गरड यांची आक्रमक भूमिका; सर्व शेतकऱ्यांना विनाविलंब आर्थिक मदत व दुष्काळ निधी देण्याची मागणी

October 6, 2026
मोठी बातमी! सिद्धेश्वर रणे यांच्याकडे मंगळवेढा तालुका राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाची धुरा; खा.धैर्यशील मोहिते पाटील यांनी सोपवली जबाबदारी

मोठी बातमी! सिद्धेश्वर रणे यांच्याकडे मंगळवेढा तालुका राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाची धुरा; खा.धैर्यशील मोहिते पाटील यांनी सोपवली जबाबदारी

October 5, 2026
सबजेल हाऊसफुल्ल पंढरपूरचे कैदी मंगळवेढ्यात वर्ग; कोरोना संसर्गाची कैद्यांना भीती

मोठी बातमी! ठाकरे गटाचे उपनेते शरद कोळीला अटक; एक वर्षासाठी येरवडा कारागृहात स्थानबद्ध, नेमकं कारण काय?

October 5, 2026

ई-पीक पाहणीसाठी शेतकऱ्याकडे ५०० रुपयांची खंडणी; साहाय्यकाची हकालपट्टी करत पोलिसांत गुन्हा दाखल; ​दुष्काळी अनुदानाची भीती दाखवून पैशांची मागणी

October 4, 2026
Next Post
सोलापुरात शेतकऱ्याच्या पत्नीने घरातून साडेचार लाखांच्या दागिनेसह रोख रक्कम घेऊन केले पलायन

मंगळवेढा ब्रेकिंग!श्री बाळूमामा मंदिरातील घंटा चोरीचा प्रयत्न

ताज्या बातम्या

महाराष्ट्रातील ‘या’ भागात पुन्हा मुसळधार पावसाचा इशारा; प्रशासनाला सतर्क राहण्याचं आवाहन

हो पाऊस येणार! पंजाबराव डख यांनी थेट तारीख सांगितली; ‘जीवदान’ ठरणारा हवामान अंदाज समोर

October 12, 2026
मंगळवेढ्यात पक्षाची धुरा आता सचिन नागणे यांच्या खांद्यावर; राष्ट्रवादी (शरदचंद्र पवार) शहराध्यक्षपदी नियुक्ती

मंगळवेढ्यात पक्षाची धुरा आता सचिन नागणे यांच्या खांद्यावर; राष्ट्रवादी (शरदचंद्र पवार) शहराध्यक्षपदी नियुक्ती

October 12, 2026
गालबोट! मंगळवेढ्यात वर्ग वाटपावरून शिक्षक-मुख्याध्यापकात हमरीतुमरी, ‘या’ शाळेतील प्रकार; कारवाईसाठी ‘प्रहार’ संघटना आक्रमक

अद्भूत धाडस! विषारी ‘कोब्रा’ चावला, ब्लेडने रक्त काढले अन् सापाला सोबत घेऊन गाठला दवाखाना; मंगळवेढ्याच्या प्राचार्यांचा काळजाचा ठोका चुकवणारा थरार; अखेर मृत्यूवर मात

October 12, 2026
मंगळवेढेकरांनो सावधान! शहरातून दोन दुचाकी चोरीला; वाहन चोरांचे पोलिसांना आव्हान

दुष्काळात भान हरपलेल्या हुल्लडबाजांना पोलिसांचा दणका; मंगळवेढ्यात ९ बुलेटसह दुचाकी ताब्यात, कारवाई तीव्र होणार

October 12, 2026
नागरिकांनो! शासकीय योजनेंची कामे प्रलंबित आहेत तर तुमच्या समस्या लेखी स्वरूपात आज द्या; आमदार समाधान आवताडे यांनी उद्या बोलावली आढावा बैठक

शेतकऱ्यांना दिवाळीपूर्वी मदत द्या! आमदार समाधान आवताडेंचे केंद्रीय पथकाला १७ कलमी मागण्यांची सनद; कर्जमाफी, चारा छावण्या अन् मोफत पाणी

October 11, 2026
विद्यार्थ्यांच्या ऑनलाइन परीक्षांसाठी वीजपुरवठा सुरळीत ठेवा

दुहेरी संकट! दुष्काळात ‘करंट’चा झटका; अंगाची लाही अन् विजेचा खोडसाळपणा; भीषण दुष्काळात सोलापूर जिल्ह्यात भारनियमनाचा घाव

October 11, 2026
mangalwedhatimes.in

प्रिंट,टीव्ही मीडियानंतर सध्या डिजिटल मीडियाचं महत्व प्रचंड वाढलंय. येणाऱ्या काळात या माध्यमाचं महत्व आणि व्याप्ती आणखी वाढणार असल्यानं . आम्ही हा नवीन बदल स्वीकारून 'मंगळवेढा टाईम्स' या सोशल मीडियाच्या फेसबुक पेजचे रूपांतर वेब मीडिया मध्ये करून 'मंगळवेढा टाईम्स' या नावाने न्युजचे वेब पोर्टल आपल्या सेवेत दाखल झालय. येथे आपण आपल्या स्मार्टफोन, कॉम्पुटर वरून देश विदेशातील घडामोडी तसेच स्थानिक, व्यापार, ग्रामीण, सांस्कृतिक, उद्योग, कृषी, मनोरंजन, तंत्रज्ञान, शिक्षण अश्या विविध श्येत्रांतील बातम्या घरबसल्या वाचू शकता. स्मार्टफोन, सोशल मीडियाच्या माध्यमातून बातम्या पाहण्यात लोकांचा कल वाढतोय, म्हणूनच आम्ही बदलतोय.

© 2020 Website Maintained by Tushar Bhambare..

No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • सोलापूर
  • मंगळवेढा
  • राजकारण
  • क्राईम
  • मनोरंजन
  • शैक्षणिक

© 2020 Website Maintained by Tushar Bhambare..

ताज्या बातम्या थेट मोबाईलवर मिळवण्यासाठी आजच जॉईन व्हा