मंगळवेढा टाईम्स न्युज नेटवर्क।
मंगळवेढा तालुक्यातील आंधळगावचे सरपंच लव्हाजी लेंडवे व उपसरपंच सुयोग बनसोडे यांनी आत्तापर्यंतचे मिळालेले मानधनाचे सर्व पैसे है गावाच्या विकास कामासाठी देऊन एक वेगळा आदर्श घालून दिला आहे. यामुळे गावातील सर्व ग्रामस्थांकडून त्यांचे कौतुक केले जात आहे.
आंधळगाव ग्रामपंचायतीच्या वतीने विकसित भारत रोजगार व आजीविका हमी मिशन ग्रामीण या विषयावर शुक्रवार, २६ डिसेंबर रोजी विशेष ग्रामसभा घेण्यात आली. या ग्रामसभेत सरपंच लव्हाजी लेंडवे व उपसरपंच सुयोग बनसोडे यांनी गावाच्या विकासासाठी हा महत्त्वपूर्ण निर्णय जाहीर केला.

ग्रामपंचायत आंधळगाव यांच्यावतीने नेहमीच वेगवेगळे उपक्रम राबविले जातात. ग्रामविकास अधिकारी शहाजीराव इंगोले, सरपंच, उपसरपंच व सदस्यांनी यांनी शाश्वत विकासाच्या मोहिमा हाती घेतल्या असून शाळा, अंगणवाड्या सुधारणा करणे, पाणीपुरवठा, पर्यावरण संवर्धनाला प्राधान्य देत प्लास्टिक बंदी, फटाके बंदी,

माझी वसुंधरा अभियानाचा व्यापक प्रचार, पर्यावरणपूरक वस्तूंचा वापर याबरोबरच पी. एम. सूर्यधर मोफत बिजली योजना घराघरात पोहोचविण्यासाठी पुढाकार, शासनाच्या विविध योजनांसाठी लाभार्थी निवड, मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियान प्रभावीपणे राबविणे, गावातील स्वच्छता व हरित उपक्रमांना चालना देणे, तसेच ग्रामविकासाशी निगडित महत्वपूर्ण कामे हाती घेतली आहेत.

यावेळी सामाजिक कार्यकर्ते सुनील वेळापूरे यांनी सरपंच लव्हाजी लेंडवे यांनी प्रति महिना ४००० प्रमाणे आपले दोन वर्षाचे व उपसरपंच सुयोग बनसोडे यांनी प्रति महिना १५०० प्रमाणे आपल्या एका वर्षांच्या कार्यकाळाचे स्वतःचे संपूर्ण मानधन गावाच्या विकासासाठी अर्पण करणारे राज्याच्या इतिहासात हे एकमेव उदाहरण आहे असे सांगत ग्रामसभेत त्यांच्या अभिनंदनचा ठराव मांडला.

यावेळी माजी जिल्हा परिषद सदस्य शिवाजीराव नागणे, चेअरमन काशिनाथ पाटील, माजी सरपंच महादेव माळी, दामाजी शुगरचे संचालक दिगंबर भाकरे, सरपंच लव्हाजी लेंडवे, उपसरपंच सुयोग बनसोडे, पोलिस पाटील राणीताई माळी, ग्रामविकास अधिकारी शहाजी इंगोले, माजी उपसरपंच भारत लेंडवे,

सदस्य दिगंबर माळी, सुनील शिंदे, संतोष शिंदे, रामेश्वर आवताडे, गणेश नागणे, विष्णुपंत भाकरे, अंकुश लेंडवे, सलीम शेख, अंकुश डांगे, समाधान लेंडवे, पोपट भाकरे, सुनील वेळापुरे, दत्तात्रय स्वामी, उद्योजक तनवीर मुलाणी, निलेश आवताडे, भाजपाचे तालुका उपाध्यक्ष आप्पासो स्वामी, आबासो माळी, चैतन्य गांडुळे, वैभव नागणे यांचेसह ग्रामस्थ उपस्थित होते.
माझे कर्तव्य पार पाडले
गावाच्या विकासासाठी हे माझे कर्तव्य आहे. हे मानधन रस्ते, पाणीपुरवठा, शाळा सुधारणा आणि ग्रामीण रोजगार योजनांसाठी खर्च होईल. प्रत्येक सरपंचाने अशी बांधिलकी जपावी, जेणेकरून गाव समृद्ध होईल.-लव्हाजी लेंडवे, सरपंच, आंधळगाव

विकासासाठी हा निर्णय निश्चितच दिशादर्शक ठरेल
गावाच्या विकासासाठी स्वतःच्या मानधनाचा त्याग करण्याचा सरपंच व उपसरपंच यांचा निर्णय खरोखरच अनुकरणीय आहे, अशा निर्णयांमुळे ग्रामपंचायतीच्या कामकाजात पारदर्शकता वाढते आणि लोकसहभागाला चालना मिळते. गावाच्या हितासाठी काम करताना लोकप्रतिनिधी आणि ग्रामस्थ यांच्यातील विश्वास अधिक मजबूत होतो. आंधळगावच्या विकासासाठी हा निर्णय निश्चितच दिशादर्शक ठरेल.-दिगंबर भाकरे, संचालक, दामाजी शुगर, मंगळवेढा.
अशाच महत्वपूर्ण बातम्या आणि माहीती मनोरंजन मिळवा तुमच्या व्हॉट्सअँप ग्रूपमध्ये, त्यासाठी पुढील नंबर तुमच्या ग्रुपमध्ये समाविष्ट करा – 9970766262
“मंगळवेढा टाईम्स”च्या बातम्या मिळविण्यासाठी 9970766262 हा नंबर तुमच्या व्हॉट्सऍपवर ग्रुपवर ऍड करून फक्त एक मेसेज करा.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी Mangalwedha Times वर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट मंगळवेढा टाईम्स.



बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज














