दुबई | तानाजी गोरड
दुबई येथील युएई महाराष्ट्र क्रिकेट क्लब च्या स्पर्धेत राॅयल मराठा संघाने अजिंक्यपद मिळविले आहे. संयुक्त अरब अमिराती येथील अजमान मध्ये युएई महाराष्ट्र क्रिकेट क्लब च्या वतिने एकदिवसीय टेनिसबाॅल क्रिकेटचे आयोजन करण्यात आले होते.
युएई मध्ये नोकरी व व्यवसायकरिता स्थायिक असलेल्या मराठी तरुण वेगवेगळ्या टिम मधुन खेळत होते.
युएई मराठी क्रिकेट क्लबकडून खेळविल्या गेलेल्या एकदिवसीय सामन्याला तुफान गर्दी पहायला मिळाली, वरील सर्व सामने हे अजमान येथील सेव्हन डिस्ट्रिक्ट क्रिकेट मैदानावर पार पडले.
या स्पर्धेत आम्ही रायगडकर, सिंधू पुत्र, राॅकस्टार्स, मुंबई ११, मराठा किंग्ज, राॅयल मराठा, स्वराज्य वाॅरियर्स ह्या संघानी भाग घेतला होता.
अंतिम सामन्यात राॅयल मराठा संघाने गणेश मित्रमंडळ संघाचा ५ गडी राखुन दणदणीत विजय मिळवून २०२३ चा युएई महाराष्ट्र क्रिकेट क्लब चषक आपल्या नावे केला.
राॅयल मराठा संघाचे व्यवस्थापक श्रीधर दत्ताराम तावडे यांनी उत्तम खेळाबद्दल संघाचे अभिनंदन केले. अजमान येथे पार पडलेल्या या सामन्यास राॅयल मराठा संघाचे प्रायोजक व शाहरजाह येथील कम्यनिटी मेडिकल सेंटर च्या सर्वेसर्वा सौ. निधी सिसोडिया यांनी सहकुटुंब उपस्थित राहिले होते.
राॅयल मराठा संघाचा कर्णधार सौरभ गौड( वारणा कोल्हापूर ) व उपकर्णधार शाहरुख शेख ( रायगड) यांच्या यशस्वी खेळीने संघाने अंतिम सामना जिंकला.
दुबईतील प्रसिद्ध स्वामिनी मराठी ढोलताशा पथक तसेच वैशाली सोनार यांच्या लेझीम पथकाने या स्पर्धेची शोभा वाढविली.
अशाच महत्वपूर्ण बातम्या आणि माहीती मनोरंजन मिळवा तुमच्या व्हॉट्सअँप ग्रूपमध्ये, त्यासाठी पुढील नंबर तुमच्या ग्रुपमध्ये समाविष्ट करा – 9970766262
“मंगळवेढा टाईम्स“च्या बातम्या मिळविण्यासाठी 9970766262 हा नंबर तुमच्या व्हॉट्सऍपवर ग्रुपवर ऍड करून फक्त एक मेसेज करा.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी Mangalwedha Times वर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट मंगळवेढा टाईम्स.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज