टीम मंगळवेढा टाईम्स ।
कारचा पाठीमागून धक्का लागल्यानंतर जाब विचारल्याच्या कारणावरून चिडून शेकाप माजी नगरसेवकांच्या नातूसह पाच जणांनी मिळून कॉलेजमध्ये घुसून प्राध्यापकास बेदम मारहाण केली. ही घटना शुक्रवारी दुपारी १२ च्या सुमारास सांगोला शहरातील डॉ. गणपतराव देशमुख महाविद्यालय येथील प्राचार्यांच्या केबिनसमोर घडली.
मारुती आनंदा हाके (५४ रा. शिवाजीनगर जिल्हा परिषद शाळेजवळ, सांगोला असे जखमी प्राध्यापकाचे नाव आहे.
दरम्यान घडला प्रकार महाविद्यालयाच्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाला आहे. याबाबत अधिक माहिती अशी की, मूळचे जुनोनी येथील प्रा.मारुती हाके हे सांगोल्यातील डॉ. गणपतराव देशमुख महाविद्यालय येथे प्राध्यापक म्हणून नोकरीस आहेत.
प्रा.हाके हे शुक्रवारी सकाळी ८ वाजता सांगोला येथील घरातून दुचाकीवरून वासूद रोडनी कॉलेजवर निघाले होते. वाटेत पाठीमागून येणाऱ्या कारचा त्यांच्या दुचाकीला दोन वेळा धक्का लागल्याने त्यांनी
कार थांबून कारमधील तरुणास तुला नीट कार चालवता येत नाही म्हणून कारची चावी काढून घेऊन तुझ्या घरच्यांना बोलवून घे, असे म्हणून त्या तरुणास चापट मारली व ते कॉलेजवर निघून गेले.
तो तरुण नातेवाईकांना घेऊन कॉलेजवर आला. त्यावेळी महाविद्यालयाचे सचिव, प्राचार्य, प्रा. हाके व इतर प्राध्यापक मंडळींनी घडलेल्या प्रकाराबद्दल त्या तरुणाची माफीही मागितली होती.
दरम्यान दुपारी १२ च्या सुमारास प्रा. हाके हे प्राचार्य यांच्या केबिन समोर इतर शिक्षकांसमवेत बोलत थांबले असता त्या तरुणासह इतर चार जणांनी कॉलेजमध्ये घुसून हातातील दगड, बेल्टने व लाथाबुक्क्यांनी बेदम मारहाण करण्यास सुरुवात केली.(स्रोत:लोकमत)
प्राचार्याकडून पोलिसांना लेखी पत्र
महाविद्यालयाचे प्राचार्य सिकंदर मुलाणी यांनी घडल्या प्रकाराची दखल घेत सांगोला पोलीस स्टेशनला लेखी पत्र देऊन संबंधितावर गुन्हा दाखल करण्याची मागणी केली आहे. पोलिसांनी प्रा.हाके यांचा जबाब घेतला असून, रात्री उशिरापर्यंत पोलिसात गुन्हा दाखल झाला नव्हता.
राज्यातील व देशातील ब्रेकिंग बातम्या आणि माहिती सर्वात प्रथम तुमच्या पर्यंत .आजच Add करा तुमच्या Whatsapp ग्रुपवर 99 70 76 6262 हा आमचा नंबर.
ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 99 70 76 6262 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Mangalwedha Times News”
विश्वसनीय ऑनलाईन पोर्टल ‘मंगळवेढा टाईम्स’ला बातम्या व जाहिरात देण्यासाठी आजच संपर्क करा : 75 88 214 814
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज