मंगळवेढा टाइम्स न्यूज नेटवर्क ।
घरी आलेला अनोळखी व्यक्ती कोण होता? म्हणून पत्नीस विचारणा केल्यानंतर पत्नीने तू इथे राहू नको, तुला काय करायचे ते कर म्हणत लोखंडी सळईने तोंडावर मारून जखमी केले.
पतीच्या फिर्यादीवरून पत्नी विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. अण्णासो तुकाराम गोसावी (वय ४० रा. ब्रह्मपुरी) असे फिर्यादीचे नाव आहे. ही घटना मंगळवारी दुपारी घडली.
याबाबत माहिती अशी की, फिर्यादी अर्धांगवायू झाल्याने पाच वर्षांपासून घरीच आहेत. त्यांची पत्नी ही मजुरीने कामाला जाऊन कुटुंबाचा उदरनिर्वाह करते.
पत्नी व फिर्यादीचे घरात अनोळखी लोक का येतात? यावरून भांडण होत होते. परंतु नातेवाइकांनी फिर्यादीला व पत्नीला समजावून सांगून भांडण मिटवले होते.
मंगळवारी दुपारी तीन वाजेच्या सुमारास फिर्यादी घराबाहेर अधिक बसलेले असताना अनोळखी माणूस घरी आला. तो बोलून निघून गेला.
तेव्हा पत्नीला आपल्या घरी आलेला माणूस कोण होता? असे फिर्यादीने म्हटल्यानंतर पत्नीने तू इथे राहू नको, तुला काय करायचे ते कर असे म्हणून शिवीगाळ केली.
पतीने शिव्या दिल्यावर लोखंडी सळईने पतीला मारहाण केली. चुलत भाऊ मोहन प्रभाकर गोसावी, सूरज अंकुश गोसावी हे पळत येऊन भांडण सोडवले. तपास पोलिस हेडकॉन्स्टेबल महेश कोळी हे करीत आहेत.
अशाच महत्वपूर्ण बातम्या आणि माहीती मनोरंजन मिळवा तुमच्या व्हॉट्सअँप ग्रूपमध्ये, त्यासाठी पुढील नंबर तुमच्या ग्रुपमध्ये समाविष्ट करा – 9970766262
“मंगळवेढा टाईम्स”च्या बातम्या मिळविण्यासाठी 9970766262 हा नंबर तुमच्या व्हॉट्सऍपवर ग्रुपवर ऍड करून फक्त एक मेसेज करा.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी Mangalwedha Times वर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट मंगळवेढा टाईम्स.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज