टीम मंगळवेढा टाईम्स ।
मनोज जरांगे-पाटील यांनी मराठा आरक्षणासाठी सुरु केलेल्या आंदोलनास मंगळवेढा तालुक्यातून पाठिंबा वाढला आहे. आरक्षणाचा मुद्दा पेटू लागल्याने मराठा क्रांती मोर्चाने महाराष्ट्र बंदची हाक दिली असून त्या पार्श्वभूमीवर सकल मराठा समाजाच्यावतीने मंगळवेढा बंदची हाक दिली आहे.
नागरिक, व्यावसायिकांनी बंदच्या हाकेला प्रतिसाद देण्याचे आवाहन समन्वयकांनी केले आहे. दरम्यान, जिल्हाधिकारी कार्यालयासमोर साखळी उपोषण सुरु राहणार आहे.
आंतरवाली सराटी (जि. जालना) येथे मराठा समाजाला आरक्षण मिळवा यासाठी मनोज जरांगे-पाटील यांनी दुसऱ्या टप्प्यातील आंदोलन सुरू केले आहे.
सोलापूर जिल्ह्यातही आरक्षणासाठी मराठा समाज आक्रमक झाला. जिल्हयात मराठा समाजाच्यावतीने गावोगावी कुठे बाईक रॅली, पदयात्रा, कँडल मार्च काढण्यात येत आहे.
जिल्ह्यातील सांगोला, मंगळवेढा, पंढरपूर, मोहोळ, कुर्डुवाडी, करमाळा, अकलूज, माळशिरस आदी ठिकाणी मराठा क्रांती मोर्चाच्यावतीने साखळी उपोषण सुरु आहे. मराठा समाजाच्या आरक्षणाला सर्वच समाज घटकांतून उत्स्फुर्त पाठिंबा मिळूत आहे. सोमवारी सामाजिक संघटनांसह राजकीय पक्षांनी जाहीर समर्थन केले.
दरम्यान, दोन दिवसांपासून आंदोलकांनी टाळ-मृदंगाचा गजर सुरू केला आहे. त्याचबरोबर सध्या गावोगावी कँडल मार्च सुरू आहे. मराठा क्रांती मोर्चा महाराष्ट्र यांनी मराठा आरक्षणासाठी महाराष्ट्र बंदची हाक दिली असून त्याच्या आमलबजवानी मंगळवेढ्यात केली जाणार आहे.
उद्या दि. ३१ रोजी मंगळवेढा जिल्हा बंदची हाक देण्यात आली आहे. नागरिकांनी स्वस्फूर्तीने बंदमध्ये सामील व्हावे आणि बंद शांततेत पार पाडावा असे आवाहन करण्यात आले आहे.
अशाच महत्वपूर्ण बातम्या आणि माहीती मनोरंजन मिळवा तुमच्या व्हॉट्सअँप ग्रूपमध्ये, त्यासाठी पुढील नंबर तुमच्या ग्रुपमध्ये समाविष्ट करा – 9970766262
“मंगळवेढा टाईम्स“च्या बातम्या मिळविण्यासाठी 9970766262 हा नंबर तुमच्या व्हॉट्सऍपवर ग्रुपवर ऍड करून फक्त एक मेसेज करा.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी Mangalwedha Times वर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट मंगळवेढा टाईम्स.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज