mangalwedhatimes.in
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • सोलापूर
  • मंगळवेढा
  • राजकारण
  • क्राईम
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • सोलापूर
  • मंगळवेढा
  • राजकारण
  • क्राईम
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
No Result
View All Result
Mangalwedha Times
No Result
View All Result

शेतकऱ्यांसाठी खूषखबर! निरा डावा व उजवा कालव्यास दोन सलग आवर्तन मिळणार; आ.आवताडेंच्या मागणीला यश

टीम 'मंगळवेढा टाईम्स' by टीम 'मंगळवेढा टाईम्स'
March 27, 2022
in मंगळवेढा, राज्य, सोलापूर
Breaking! मंगळवेढ्याच्या दोन ‘नायब तहसीलदारां’ची तहसीलदार पदावर पदोन्नती

टीम मंगळवेढा टाईम्स ।

उन्हाळ्यामधील पंढरपूर तालुक्यातील पाण्याचे दुर्भीक्ष कमी करण्यासाठी नीरा उजव्या कालव्यातून उन्हाळी हंगामात दुसरे अवर्तन मिळावे अशी मागणी पंढरपूर-मंगळवेढा मतदारसंघाचे आमदार समाधान आवताडे यांनी केली होती.

उपमुख्यमंत्री ना. अजित पवार यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या कालवे सल्लागार समितीच्या उन्हाळा हंगाम सन २०२२ अनुषंगाने पुणे येथे झालेल्या बैठकीत आ.आवताडे यांनी ही मागणी केली होती.

ऐन उन्हाळ्यात शेतकऱ्यांना थंडावा देणारी एक बातमी आज आली आहे. ऐन मे महिन्याच्या उकाड्यात शेतात उभ्या पिकांना पाण्याचा ताण जाणवतो.

पंढरपूर व मंगळवेढा परिसरातील शेतकऱ्यांसाठी मे महिना परिक्षा पाहणारा असतो. परंतू आता त्यांच्यासाठी आनंदाची बातमी आहे.

नीरा उजवा आणि डाव्या कालव्यातून सध्या सुरु असलेल्या आवर्तनाला जोडून अजून एक आवर्तन ३० जूनपर्यंत देण्याचा निर्णय कालवा सल्लागार समितीच्या बैठकीत घेण्यात आला आहे. उपमुख्यमंत्री अजीत पवार यांच्या अध्यक्षतेखाली ही बैठक झाली.

नीरा प्रणालीअंतर्गत भाटघर, वीर, नीरा देवघर, गुंजवणी या सर्व धरणात मिळून ३५.५३ टीएमसी पाणी शिल्लक आहे. ते गेल्यावर्षीपेक्षा १.७५ टीएमसीने जास्त आहे. त्यामुळे हे जादाचे आवर्तन देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

या आवर्तनामुळे ऐन उन्हाळ्यात शेतकरी तसेच या पाण्यावर अवलंबून असणाऱ्या पिण्याच्या पाण्याच्या योजनांना मोठा दिलासा मिळाला आहे.

नीरा उजवा आणि डावा कालवा, भीमा आसखेड, पवना व चासकमान प्रकल्पांची कालवा सल्लागार समितीची बैठक उपमुख्यमंत्री अजीत पवार यांच्या अध्यक्षतेखाली शासकीय विश्रामगृहात पार पडली.

याप्रसंगी सोलापूरचे पालकमंत्री दत्तात्रय भरणे, खासदार गिरीश बापट, आमदार अशोक पवार, भीमराव तापकीर, चेतन तुपे,आ.समाधान आवताडे, सुनील शेळके, राम सातपुते, पुणे महानगरपालिका आयुक्त विक्रम कुमार, जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख, जलसंपदा विभागाचे मुख्य अभियंता एच. व्ही. गुणाले, पुणे पाटबंधारे मंडळाचे अधीक्षक अभियंता संजीव चोपडे या बैठकीला उपस्थित होते.

जर ३० जूननंतरही पाऊस सुरु झाल्यास उशीर झाला तर पिण्यासाठी पाणी सोडण्याचे नियोजनही करण्यात आले असल्याची माहिती पुणे पाटबंधारे मंडळाचे अधीक्षक अभियंता संजीव चोपडे यांनी दिली. चासकमान प्रकल्पातूनही सध्या सुरू असलेल्या आवर्तनासह दोन उन्हाळी आवर्तने सोडण्याचा निर्णय बैठकीत घेण्यात आला.

आमदार आवताडे यांनी केली होती ‘ही’ मागणी

नीरा उजवा कालव्यातून उन्हाळी हंगामात दोन अवर्तन मिळाल्याने पंढरपूर तालुक्यातील गादेगाव, कोर्टी , बोहाळी , उंबरगाव , खर्डी , तपकीरी शेटफळ , तनाळी , तावशी , कासेगाव अनवली , एकलासपूर , रांझणी गावातील शेतकऱ्यांना फायदा होणार आहे.

पाऊस लाबल्यानंतर अनेकदा लाभक्षेत्रातील शेतकऱ्यांना पाणी टंचाईला समोरे जावे लागते . हे टाळण्यासाठी पाणी नियोजनात बदल होणे आवश्यक असल्याचे आ.आवताडे यांनी सांगितले होते.

समांतर पाईपलाईन अंतर्गत माळशिरस पर्यंत सर्व्हे चालू आहे, तो सर्व्हे तशाच पद्धतीने पंढरपूर सीमेपर्यंत पुढे करावा, प्रशासकीय कार्य गतिमान करण्यासाठी पंढरपूर येथील उपविभागीय कार्यालय येथे कर्मचारी यांची भरती करून ती संख्या वाढवावी अशीही मागणी आ.समाधान आवताडे यांनी केली.

अशाच महत्वपूर्ण बातम्या आणि माहीती मनोरंजन मिळवा तुमच्या व्हॉट्सअँप ग्रूपमध्ये, त्यासाठी पुढील नंबर तुमच्या ग्रुपमध्ये समाविष्ट करा – 9970766262

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.

ताज्या बातम्या थेट मोबाईलवर मिळवण्यासाठी आजच जॉईन व्हा

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज

Tags: आ.समाधान आवताडेउजनी धरण

संबंधित बातम्या

सोलापूर विद्यापीठाने पुन्हा परीक्षा पुढे ढकलल्या! नैसर्गिक आपत्तीमुळे ऑनलाइन परीक्षा रद्द

उच्च शिक्षण घेणाऱ्या मुलींना मिळणार दरमहा ‘एवढे’ हजार रुपये; शिक्षण घेणाऱ्या मुलींसाठी एक महत्त्वाकांक्षी योजना; जाणून घ्या काय आहे योजना?

August 26, 2025
मराठा आरक्षणासाठी 10 ऑक्‍टोबरला महाराष्ट्र बंद; सोलापूर जिल्हा बंद ? बाबत नवी घोषणा

मराठा आरक्षणाची ठिणगी पेटणार; तरुणाचा आत्महत्येचा प्रयत्न, सरकारच्या वेळकाढूपणामुळे विष प्राशन केल्याची चिठ्ठी

August 26, 2025
विधानपरिषद निवडणुकीचा निकाल जाहीर, कोणाकोणाचा विजय? महाविकास आघाडीला मोठा धक्का; निकाल जाणून घ्या एका क्लिकवर

सर्वात मोठी बातमी! मराठा समाजाचा मोठा विजय; मनोज जरांगे पाटलांची पहिली मागणी मान्य, राज्य सरकारची घोषणा

August 26, 2025
मोठी बातमी! मनोज जरांगे पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त आज मुढवी येथे भव्य रक्तदान शिबिर; मंगळवेढा येथील शिवालयापासून मुढवी पर्यंत भव्य सायकल रॅलीचे आयोजन

आर-पार लढाईची घोषणा! गणपतीच्या दुसऱ्याच दिवशी मुंबईत धडकण्यावर ठाम; सर्व मराठ्यांनी कामधंदे बंद करून मुंबईकडे निघा..; मनोज जरांगेंच्या यावेळच्या मागण्या नेमक्या काय?

August 26, 2025
पोरींनो..! तुमच्यासाठी आयुष्यभर खस्ता खाणाऱ्या बापाची मान ताठ ठेवा; प्रा.वसंत हंकारे यांचे काळजाला भिडणारे ‘हे’ शब्द ऐकून तुमच्या जीवनात बदल घडणारच

पोरींनो..! तुमच्यासाठी आयुष्यभर खस्ता खाणाऱ्या बापाची मान ताठ ठेवा; प्रा.वसंत हंकारे यांचे काळजाला भिडणारे ‘हे’ शब्द ऐकून तुमच्या जीवनात बदल घडणारच

August 26, 2025
कॅनॉलमध्ये अडकलेली गाडी काढण्यासाठी बोलावून जेसीबी मालकास मारहाण करत लुटले

धक्कादायक! जेवणाच्या बिलावरून हॉटेल मालकाला गळा दाबून मारहाण; हॉटेलमध्ये तोडफोड करून आरोपींनी ठोकली धूम

August 26, 2025
खळबळ! मंगळवेढा तालुक्यात पंतप्रधान किसान सन्मान योजनेत तब्बल २ हजार ६०० बोगस लाभार्थी

खळबळ! वनविभागामध्ये नोकरी लावतो असे आमिष दाखवून तरुणाची १३ लाखांची फसवणूक; मंगळवेढ्यातील ‘या’ ठगा विरोधात गुन्हा दाखल

August 26, 2025
मंगळवेढेकरांनो! प्रा.वसंत हंकारे यांचे आज इंग्लिश स्कूल प्रशालेत व्याख्यान; विद्यार्थी व पालकांनी जरूर ऐकावे; व्याख्यान काळजाला भिडणार

मंगळवेढेकरांनो! प्रा.वसंत हंकारे यांचे आज इंग्लिश स्कूल प्रशालेत व्याख्यान; विद्यार्थी व पालकांनी जरूर ऐकावे; व्याख्यान काळजाला भिडणार

August 25, 2025
एक मराठा कोट मराठा! सरकारला एक तासही देणार नाही, जरांगे पुन्हा कडाडले; अकलूजमध्ये मनोज जरांगेंची विराट सभा

आता सुट्टी नाही! ही शेवटची फाईट, विजयाचा गुलाल लावायचाय, आता मैदान सोडायचं नाही; बीडमधून मनोज जरांगे पाटलाचा फडणवीस सरकारला थेट इशारा

August 24, 2025
Next Post
शेतकर्‍यांना एफआरपीनुसार उसाची बिले दिली नाहीत; सोलापूर जिल्ह्यात ‘हे’ कारखाने रेड झोनमध्ये

अरे वा..! मंगळवेढ्यातील 'हा' कारखाना साखर उताऱ्यात सोलापूर जिल्ह्यात दुसऱ्या क्रमांकावर

ताज्या बातम्या

सोलापूर विद्यापीठाने पुन्हा परीक्षा पुढे ढकलल्या! नैसर्गिक आपत्तीमुळे ऑनलाइन परीक्षा रद्द

उच्च शिक्षण घेणाऱ्या मुलींना मिळणार दरमहा ‘एवढे’ हजार रुपये; शिक्षण घेणाऱ्या मुलींसाठी एक महत्त्वाकांक्षी योजना; जाणून घ्या काय आहे योजना?

August 26, 2025
मराठा आरक्षणासाठी 10 ऑक्‍टोबरला महाराष्ट्र बंद; सोलापूर जिल्हा बंद ? बाबत नवी घोषणा

मराठा आरक्षणाची ठिणगी पेटणार; तरुणाचा आत्महत्येचा प्रयत्न, सरकारच्या वेळकाढूपणामुळे विष प्राशन केल्याची चिठ्ठी

August 26, 2025
विधानपरिषद निवडणुकीचा निकाल जाहीर, कोणाकोणाचा विजय? महाविकास आघाडीला मोठा धक्का; निकाल जाणून घ्या एका क्लिकवर

सर्वात मोठी बातमी! मराठा समाजाचा मोठा विजय; मनोज जरांगे पाटलांची पहिली मागणी मान्य, राज्य सरकारची घोषणा

August 26, 2025
मोठी बातमी! मनोज जरांगे पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त आज मुढवी येथे भव्य रक्तदान शिबिर; मंगळवेढा येथील शिवालयापासून मुढवी पर्यंत भव्य सायकल रॅलीचे आयोजन

आर-पार लढाईची घोषणा! गणपतीच्या दुसऱ्याच दिवशी मुंबईत धडकण्यावर ठाम; सर्व मराठ्यांनी कामधंदे बंद करून मुंबईकडे निघा..; मनोज जरांगेंच्या यावेळच्या मागण्या नेमक्या काय?

August 26, 2025
पोरींनो..! तुमच्यासाठी आयुष्यभर खस्ता खाणाऱ्या बापाची मान ताठ ठेवा; प्रा.वसंत हंकारे यांचे काळजाला भिडणारे ‘हे’ शब्द ऐकून तुमच्या जीवनात बदल घडणारच

पोरींनो..! तुमच्यासाठी आयुष्यभर खस्ता खाणाऱ्या बापाची मान ताठ ठेवा; प्रा.वसंत हंकारे यांचे काळजाला भिडणारे ‘हे’ शब्द ऐकून तुमच्या जीवनात बदल घडणारच

August 26, 2025
कॅनॉलमध्ये अडकलेली गाडी काढण्यासाठी बोलावून जेसीबी मालकास मारहाण करत लुटले

धक्कादायक! जेवणाच्या बिलावरून हॉटेल मालकाला गळा दाबून मारहाण; हॉटेलमध्ये तोडफोड करून आरोपींनी ठोकली धूम

August 26, 2025
mangalwedhatimes.in

प्रिंट,टीव्ही मीडियानंतर सध्या डिजिटल मीडियाचं महत्व प्रचंड वाढलंय. येणाऱ्या काळात या माध्यमाचं महत्व आणि व्याप्ती आणखी वाढणार असल्यानं . आम्ही हा नवीन बदल स्वीकारून 'मंगळवेढा टाईम्स' या सोशल मीडियाच्या फेसबुक पेजचे रूपांतर वेब मीडिया मध्ये करून 'मंगळवेढा टाईम्स' या नावाने न्युजचे वेब पोर्टल आपल्या सेवेत दाखल झालय. येथे आपण आपल्या स्मार्टफोन, कॉम्पुटर वरून देश विदेशातील घडामोडी तसेच स्थानिक, व्यापार, ग्रामीण, सांस्कृतिक, उद्योग, कृषी, मनोरंजन, तंत्रज्ञान, शिक्षण अश्या विविध श्येत्रांतील बातम्या घरबसल्या वाचू शकता. स्मार्टफोन, सोशल मीडियाच्या माध्यमातून बातम्या पाहण्यात लोकांचा कल वाढतोय, म्हणूनच आम्ही बदलतोय.

© 2020 Website Maintained by Tushar Bhambare..