टीम मंगळवेढा टाईम्स ।
महाराष्ट्रात सध्या परतीचा पाऊस धुमाकूळ घालत आहे. राज्यातील अनेक जिल्ह्यात परतीच्या पावसाने हजेरी लावली आहे.
राजधानी मुंबईसह ठाणे परिसरात परतीचा पाऊस चांगलाच बरसत आहे. सकाळी देखील राजधानी मुंबई आणि ठाणे परिसरात पावसाची हजेरी पाहायला मिळाली.
कोल्हापूर मध्ये देखील परतीच्या पावसाचा कहर बघायला मिळाला असून कोल्हापूर मध्ये वादळी वाऱ्याचा देखील प्रकोप पाहायला मिळाला. यामुळे कोल्हापूर शहरात वाहतूक कोंडी झाली होती.
दरम्यान भारतीय हवामान विभागाने आज देखील राज्यात पावसाची शक्यता वर्तवली आहे. भारतीय हवामान विभागाने आज कोकण आणि पश्चिम महाराष्ट्र या दोन विभागांसाठी पावसाचा येलो ॲलर्ट जारी केला आहे.
भारतीय हवामान विभागाचे मते पुढील चार दिवस राज्यात पावसाची शक्यता (Rain Alert) आहे. मित्रांनो राज्यात या वर्षी समाधानकारक पाऊस झाला आहे.
शिवाय आता परतीचा पाऊस देखील राज्यात चांगला होत असल्याने रब्बी हंगामात पावसाची कमतरता जाणवणार असल्याचे जाणकार नमूद करत आहेत.
परतीच्या पावसाचा रब्बी हंगामातील पिकांच्या वाढीसाठी फायदा होणार असल्याचे कृषी तज्ञ नमूद करत आहे. मित्रांनो आज कोकणातील रायगड रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग या तीन जिल्ह्यात पावसाची शक्यता आहे.
पावसाची शक्यता लक्षात घेता भारतीय हवामान विभागाने या तीन जिल्ह्यांसाठी पावसाचा येलो अलर्ट जारी करण्यात आला आहे.
दरम्यान आज पश्चिम महाराष्ट्रात देखील पावसाची शक्यता असून पश्चिम महाराष्ट्रासाठी भारतीय हवामान विभागाने येलो अलर्ट जारी केला आहे.
निश्चितच संबंधित विभागातील नागरिकांना सतर्क राहण्याचे आवाहन यावेळी जाणकार लोक करत आहेत. दरम्यान भारतीय हवामान विभागाने दिलेल्या महत्त्वपूर्ण माहितीनुसार भारत वर्षातून मान्सून माघारी जाण्यासाठी पोषक वातावरण तयार झाले आहे.
राजस्थान आणि गुजरात मधून मान्सून माघारी फिरला असून इतर राज्यातून देखील मान्सून आता माघारी जाऊ लागला आहे.
यावर्षी मोसमी पावसाने राज्यात चांगलीच हजेरी लावली असल्याने तसेच परतीचा पाऊस देखील चांगला बरसत असल्याने उन्हाळी हंगामात शेतकरी बांधवांना पावसाची कमतरता भासणार नाही.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज