टीम मंगळवेढा टाईम्स ।
विधानसभेचे विरोधी पक्षनेते अजित पवार रविवारी मध्यरात्री रात्री बाराच्या सुमाराला अकस्मात सोलापूर मुक्कामी आले. रविवारी सकाळी ते सातारा जिल्ह्यातील कार्यक्रमासाठी रवाना होणार आहेत.
अजित पवार यांच्या उपस्थितीत उमरगा येथे शनिवारी रात्री एका कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.
राष्ट्रवादी कार्यकर्त्यांनी दिलेल्या माहितीनुसार, नियोजित दौऱ्यानुसार अजित पवार उमरगा येथून बारामती येथे जाणार होते. हा कार्यक्रम संपायला उशीर लागला.
रात्रीचा लांब प्रवास नको म्हणून त्यांनी सोलापुरात मुक्काम करण्याचा निर्णय घेतला. रात्री बाराच्या सुमाराला त्यांचा ताफा सोलापुरातील शासकीय विश्रामगृहात पोहोचला.
राष्ट्रवादीचे कार्यकर्ते त्यांच्या स्वागतासाठी उभे होते. अजित पवार यांना भेटू इच्छिणाऱ्या शहरातील कार्यकर्त्यांनी रविवारी पहाटे साडेपाच वाजता यावे ,असा निरोप देण्यात आला होता.
सकाळी 7 वाजता महात्मा गांधींना केले अभिवादन
राष्ट्रपिता महात्मा गांधी आणि माजी पंतप्रधान स्वर्गीय लाल बहादूर शास्त्री यांच्या जयंतीनिमित्त विधानसभेचे विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी त्यांना अभिवादन केले आहे.
त्यावेळी 2 ऑक्टोबर रोजी सकाळी सोलापूर रेल्वे स्टेशन समोरील महात्मा गांधीजींच्या पुतळ्याला, पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले यावेळी त्यांच्या सोबत प्रदेश सचिव संतोष पवार उपस्थित होते. त्यानंतर ते पुढील दौऱ्यावर रवाना झाले.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज