टीम मंगळवेढा टाईम्स ।
मंगळवेढा शहरातील दोन प्रतिष्ठित व्यापाऱ्यांनी पुणे जिल्ह्यातील नामांकित हॉस्पिटलमध्ये मेडिकल चालविणेसाठी रिफंडेबल डिपॉझिट म्हणून तब्बल ९१ लाख रूपये दिले असून पैसे घेवूनही त्यांना सदर मेडिकल चालू करू न देता ८२ लाख फसवणुक झाल्याने त्यांनी आरोपी विरूद्ध चंदननगर पोलिस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल केला आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, मंगळवेढा शहरातील सदर दोघेजण ३० ऑगस्ट २०२० रोजी त्यांच्या ओळखीचा बालाजी भिमराव तिडके-पाटील याने त्यांना वडगावशेरी ता.हवेली जि.पुणे येथील लोकेशनवर संगमनेर हॉस्पिटल असून ते तिडके-पाटील याने
नितीन संगमनेर यांच्याकडून चालवण्यास घेतले असल्याचे सांगितले होते. तसेच संगमनेर यांनी कायदेशिररित्या नोंदवलेले नोंदणीकृत कुलमुखत्यारपत्र दाखवून हॉस्पिटल व जागेचे सर्व अधिकार आपणास असून
डिसेंबर २०२० मध्ये बालाजी तिडके याने आमचे हॉटेल एम.एच.आय. विमान नगर येथे नामांकित डॉक्टरांची भेट घडवून आणली त्यामध्ये नितीन संगमनेरकर सुध्दा हजर होता.
नितीन संगमनेरकर याने बालाजी तिडके पाटील याची प्रशंसा करुन त्यांना सहकार्य करण्याचे व एकत्रित काम करण्याची हमी दिली म्हणन त्या दोघा व्यापाऱ्यांनी ९१ लाख रुपये रिफंडेबल डिपॉझीट
या अटीवर सदर मिळकतीत बालाजी फार्मसीचा मेडीकल व्यवसाय करण्याची परवानगी संगमनेरकर यांचे कलमुखत्यार धारक म्हणून बालाजी तिडके व संगमनेरकर यानी दिली होती.
त्यानुसार ते बालाजी तिडके पाटील यांचेजवळ असलेल्या नोंदणीकृत कुलमुखत्यारपत्र विसंबुन राहून त्यांच्या बालाजी फामर्सी कोल्हापूरचे नावे असलेल्या
राजाराम बापू सहकारी बँक लि कोल्हापुर बँक खाते क्रं ०३७३३०२६७ ९ ४३० ९ २ यावरुन वेळोवेळी ७२ लाख आरटीजीएसमार्फत बालाजी तिडके याने सांगितले प्रमाणे मे.पाटील मल्टी स्पेशालिटी हॉस्पीटलचे नावे असलेले
अलाहाबाद बँक खाते क्रं ५०५३८४५१०६४ यावर ट्रान्स्फर केलेले आहेत. तसेच उर्वरीत रक्कम १९ लाख रुपये बालाजी तिडके पाटील याने फर्निचर व इतर खर्चासाठी मागेल त्यावेळी लागेल तसे रोख स्वरुपात दिले.
त्याप्रमाणे त्यांनी मे .बालाजी फार्मसी मधील सर्व भागिदार व नितीन संगमनेरकर यांचा नोंदणीकृत कुलमुखत्यारपत्र धारक बालाजी तिडके असे दि. २१ जानेवारी २०२१ रोजी दस्त क्रं.१२०७/२०२१ प्रमाणे दुय्यम निबंधक कार्यालय क्रं . १४ या ठिकाणी लिव्ह अँण्ड लायसन्स अँग्रिमेंट केले.
त्यानंतर एफ.डी.ए.पुणे झोन -१ बालाजी फार्मसीचा ड्रग लायसन्स नंबर २०-४०९ १५८ , २१-४०९ १५ ९ नुसार दिनांक ०३/०२/२०२१ रोजी प्राप्त झाला आहे. त्यानंतर त्यांनी बालाजी फार्मसी मधील फर्निचरचे व इतर कामे करून घेतली.
त्यानंतर नितीन संगमनेरकर व त्याचे कुलमुखत्यारपत्र बालाजी तिडके यांचे आपसात वाद निर्माण झाले. त्यामध्ये नितीन संगमनेरकर व अर्चना संगमनेरकर यांनी सदरबाबत कोणतीही कल्पना न देता बालाजी फार्मसीला नविन शटर लावुन रु.लॉक केले.
त्यावेळी त्यांनी संगमनेरकर यास सदरबाबत विचारणा केली असता बालाजी तिडके व आमचेमध्ये वाद निर्माण झाले आहे म्हणून लावल्याचे सांगून त्यांना त्या ठिकाणी जाण्यास मज्जाव केला.
त्यानंतर नितीन संगमनेरकर व अर्चना संगमनेरकर यांनी त्यांचेकडून मेडीकलचा ताबा काढुन घेतला व त्यांचेकडून डिपॉझीट म्हणुन घेतलेली रक्कम परत दिली नाही.
त्यानंतर त्यांनी मे.पाटील मल्टी स्पेशालिटी हस्पीटल संदर्भात चौकशी केली असता बालाजी तिडके शटर याचेव्यतिरीक्त त्याची पत्नी रत्नमाला तिडके ही देखील संचालक असल्याचे समजले.
आम्ही वेळोवेळी पैशाची मागणी केली असता बालाजी तिडके पाटील व रत्नमाला तिडके पाटील यांनी त्या ९१ लाख रुपया पैकी ९ लाख रुपये परत दिले,
परंतू बाकीचे राहीलेले पैसे अद्यापपर्यंत दिले नसल्याने फसवणुक झाल्याचे त्यांचे लक्षात आले. दिनांक ३०/०८/२०२० ते आज रोजी पर्यत बालाजी भिमराव तिडके पाटील (रा फ्लट नं २०२ , जागृती सोसायटी , मासुळकर कलनी अजमेरा पिंपरी , पुणे), रत्नमाला बालाजी तिडके पाटील (रा फ्लॅट नं २०२ , जागृती सोसायटी , मासुळकर कॉलनी अजमेरा , पिंपरी , पुणे),
नितीन अरविंद संगमनेरकर (रा.कलनी नर्सिंग होम लक्ष्मी पार्क कलनी , नवी पेठ पुणे) अर्चना नितीन संगमनेरकर रा कलनी नर्सिंग होम, लक्ष्मी पार्क कलनी , नवी पेठ पुणे यांनी आपसात संगनमत करुन बालाजी फार्मसीचा मेडीकल व्यवसाय करण्यासाठी त्यांचेकडून ९१ लाख स्विकारुन सदर रक्कमेचा अपहार करुन
बालाजी फार्मसीचे संपुर्ण काम झालेले असतांना त्याचे शटर लावून मंगळवेढ्याच्या सदर दोन व्यापाऱ्यांना आतमध्ये जाण्यास मज्जाव केला तसेच त्यांची ८२ लाख रुपयाची फसवणुक केली म्हणून त्यांनी सदर आरोपीविरूद्ध चंदननगर पोलीसात तक्रार दिली.
पोलीसांनी या चार जणांविरूद्ध भा.दं.वि.सं. कलम ४२० , ४०६ , ३४१,३४ प्रमाणे गुन्हा दाखल केला असून अधिक तपास पालिस निरीक्षक सुनिल जाधव करीत आहेत.
अशाच महत्वपूर्ण बातम्या आणि माहीती मनोरंजन मिळवा तुमच्या व्हॉट्सअँप ग्रूपमध्ये, त्यासाठी पुढील नंबर तुमच्या ग्रुपमध्ये समाविष्ट करा – 9970766262
“मंगळवेढा टाईम्स”च्या बातम्या मिळविण्यासाठी 9970766262 हा नंबर तुमच्या व्हॉट्सऍपवर ग्रुपवर ऍड करून फक्त एक मेसेज करा.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज