मंगळवेढा टाईम्स न्युज नेटवर्क ।
राजधानी मुंबईसह महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात, विविध जिल्ह्यात पावसाने दमदार हजेरी लावली असून मुंबईसह उपनगर आणि ठाणे, नवी मुंबई, रायगड जिल्ह्यातही मुसळधार पाऊस कोसळत आहे.
मुंबईतील रस्ते जलमय झाले असून जनजीवन विस्कळीत झाले आहे. त्याच पार्श्वभूमीवर मुंबई, ठाणे, नवी मुंबई आणि रायगड जिल्ह्यातील शाळांना 2 दिवस सुट्टी जाहीर करण्यात आली आहे. आज आणि उद्या अशी दोन दिवस सर्वच शाळा आणि महाविद्यालयांना जिल्ह्यात सुट्टी देण्यात आली आहे.
भारतीय हवामान खात्याकडून आज मंगळवार 19 ऑगस्ट 2025 रोजी मुंबई महानगरात (मुंबई शहर आणि उपनगरे) अतिमुसळधार पावसाचा इशारा (रेड अलर्ट) देण्यात आला आहे. त्या पार्श्वभूमीवर, मुंबई महानगर क्षेत्रातील (मुंबई शहर आणि उपनगरे) सर्व शासकीय,
खासगी, महानगरपालिका शाळा आणि महाविद्यालये यांना जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण या नात्याने बृहन्मुंबई महानगरपालिकेकडून सुटी जाहीर करण्यात येत आहे.
दरम्यान, काही आवश्यकता भासल्यास मदतीसाठी व अधिकृत माहितीसाठी बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या मुख्य नियंत्रण कक्षाच्या 1916 या मदतसेवा क्रमांकावर संपर्क साधावा, असे आवाहनही बीएमसी प्रशासनाकडून करण्यात आलं आहे.
नवी मुंबईतील सर्व शाळांना देखील मुसळधार पावसामुळे आज 19 तारखेला सुट्टी जाहीर करण्यात आली आहे. महानगरपालिका आणि खासगी शाळांना सुट्टी देण्यात आल्याचे परिपत्रक महापालिकेच्या शिक्षण विभागाने काढले आहे.
यासह, ठाणे आणि नवी मुंबईतही आज आणि उद्या देखील सुट्टी जाहीर करण्यात आली आहे. यासह, रायगड जिल्ह्यातही पावसाचा जोर कायम असल्याने जिल्हाधिकारी महोदयांनी आज 19 ऑगस्ट रोजी शाळांना सु्ट्टी जाहीर केली आहे.
हवामान खात्याने रायगड जिल्ह्यासाठी आज सुद्धा रेड अलर्ट जारी केला आहे. त्यानुसार रायगडचे जिल्हाधिकारी किशन जावळे यांनी रायगड जिल्ह्यातील सर्व शाळा, माध्यमिक शाळा तसेच महाविद्यालयांना आज सुट्टी जाहीर केली आहे. नागरिकांनी सतर्क राहावे, अशा सूचना प्रशासनाकडून देण्यात आल्या आहेत.
रायगड जिल्ह्यात नद्यांनी ओलांडली धोक्याची पातळी
रायगड जिल्ह्यात दिवसभर झालेल्या मुसळधार पावसाचा सर्वाधिक फटका रोहा आणि महाड तालुक्याला बसला आहे. रोहा तालुक्यातल्या आंबा आणि कुंडलिका तर महाडमधील सावित्री नदीने धोका पातळी ओलांडून काही भागात पूर परिपरीस्थिती निर्माण केली. त्यामुळे छोट्या-मोठ्या उपनद्यांना देखील पूर आल्याने अनेक गावांचा संपर्क तुटला.
म्हसळा दिघी मार्गावर देखील पाणी आल्यामुळे त्या रस्त्यावरची वाहतूक ठप्प पडली होती. नागोठणे रोहाला जोडणाऱ्या भिसे खिंडित सुद्धा काही प्रमाणात दरड आल्याने हा मार्ग एकेरी वाहतुकीसाठी सुरू ठेवण्यात आलाय.
दिवसभरात एकूण 112.23 मिमि पावसाची नोंद करण्यात आली असून सर्वाधिक पाऊस 160 मिमि रोहा तालुक्यात झाल्याची नोंद करण्यात आहे. त्यामुळे कुंडलिका नदीने धोका पातळी ओलांडली आहे.अजूनही मुंबई गोवा महामार्गावर धिम्या गतीने वाहतूक सुरू आहे.
अशाच महत्वपूर्ण बातम्या आणि माहीती मनोरंजन मिळवा तुमच्या व्हॉट्सअँप ग्रूपमध्ये, त्यासाठी पुढील नंबर तुमच्या ग्रुपमध्ये समाविष्ट करा – 9970766262
“मंगळवेढा टाईम्स”च्या बातम्या मिळविण्यासाठी 9970766262 हा नंबर तुमच्या व्हॉट्सऍपवर ग्रुपवर ऍड करून फक्त एक मेसेज करा.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी Mangalwedha Times वर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट मंगळवेढा टाईम्स.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज