टीम मंगळवेढा टाईम्स ।
सोलापूर शहराचा पाणी पुरवठा आणि सिंचनासाठी उजनी धरणातून मार्च ते जून या कालावधीत आजवर दाेन आवर्तने दिली जात हाेती.
यावर्षी जूनअखेर कालवे, भीमा नदीत तीनवेळा पाणी साेडले जाेडले जाईल. जलसंपदा अधिकाऱ्यांनी पाणीचाेरी राेखण्यासाठी नियाेजन करावे, असे आदेश पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी रविवारी दिले.
उन्हाळी हंगामासाठी उजनी प्रकल्पाच्या कालवा सल्लागार समितीची बैठक रविवारी झाली. यावेळी ते बाेलत हाेते.
आमदार सुभाष देशमुख, संजयमामा शिंदे, सचिन कल्याणशेट्टी, समाधान आवताडे, जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर, अहमदनगरचे जिल्हाधिकारी सिद्धाराम सालिमठ,
महानगरपालिका आयुक्त शीतल तेली उगले, लाभक्षेत्र विकास प्राधिकरणचे अधीक्षक अभियंता धीरज साळे आदी उपस्थित होते.
विखे पाटील म्हणाले, पाणीपट्टी वसुलीसंदर्भात साखर कारखानदारांनी सहकार्य करावे. तसेच, उन्हाळी आवर्तनाच्या पहिल्या १० दिवसात दररोज २० तास वीजपुरवठा बंद ठेवण्याबाबत
जिल्हाधिकारी यांनी लाभक्षेत्र विकास प्राधिकरण, महावितरण, महानगरपालिका व अन्य संबंधित विभागांची संयुक्त बैठक घेऊन कार्यवाही करावी.
कर्नाटक राज्यात वीजपुरवठ्यामुळे अवैध पाणीउपसा होण्याची शक्यता लक्षात घेऊन, तेथील जिल्हाधिकाऱ्यांशी संपर्क साधून तेथेही वीजपुरवठा बंद ठेवण्याची कार्यवाही करावी.
लाभक्षेत्र विकास प्राधिकरणने अन्य शासकीय यंत्रणांची पूर्ण मदत घ्यावी. आवश्यक तेथे पोलीस संरक्षण घ्यावे.
भीमा नदी आणि कालव्यातून पाणी साेडल्यानंतर माढा, माेहाेळ तालुक्यात पाण्याचा बेसुमार उपसा हाेताे. त्यामुळे खालच्या भागाला पाणी मिळत नाही. जलसंपदाची यंत्रणा ही पाणी चाेरी राेखण्याचा प्रयत्न करणार असल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले.
अशाच महत्वपूर्ण बातम्या आणि माहीती मनोरंजन मिळवा तुमच्या व्हॉट्सअँप ग्रूपमध्ये, त्यासाठी पुढील नंबर तुमच्या ग्रुपमध्ये समाविष्ट करा – 9970766262
“मंगळवेढा टाईम्स”च्या बातम्या मिळविण्यासाठी 9970766262 हा नंबर तुमच्या व्हॉट्सऍपवर ग्रुपवर ऍड करून फक्त एक मेसेज करा.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज