टीम मंगळवेढा टाईम्स।
अनिल परब यांच्याशी संबंधित सात ठिकाणी ईडीकडून आज सकाळपासून छापेमारी सुरू आहे. तसेच ईडीने अनिल परब यांच्याविरोधात गुन्हा दाखल केला आहे.
ईडीच्या सुत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार अनिल परब यांच्या विरोधात ईडीने मनी लॉंन्ड्रींग विरोधात केस दाखल केली आहे.
मुंबईसह महाराष्ट्रातील त्यांच्या संबंधित सात ठिकाणी छापेमारी सुरू केली आहे. त्यामुळे अनिल परबाच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता आहे. ही छापेमारी झाल्यानंतर ईडी त्यांना समन्य बजावून चौकशीसाठी बोलावू शकतं.
याच्या आगोदर देखील अनिल ईडीने चौकशी केली आहे. तसेच त्यांच्यासोबत आरटीओच्या अधिकाऱ्याची सुद्धा चौकशी झाली होती.
अनिल परबांशी संबंधित कोणत्या 7 ठिकाणी ईडीची छापेमारी?
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, अनिल परब यांच्याशी संबंधित असलेल्या खालीलपैकी सात ठिकाणी छापेमारी करण्यात आली आहे.
परबांच्या शासकीय निवासस्थानी छापेमारी
अनिल परबांचे निकटवर्तीय बजरंग खरमाटेंच्या निवासस्थानी छापेमारी, परबांच्या सीएच्या घरी छापेमारी, दापोली रिसॉर्ट.
किरीट सोमय्यांनी अनिल परबांच्या विरोधात तक्रार दाखल केली होती. अनिल देशमुख, नवाब मलिक आणि आता अनिल परब यांनी आपला बोऱ्या बिस्तारा तयार ठेवावा.
अनिल परब यांनी शेकडो कोटी रूपयांचा घोटाळा केला आहे. शेल कंपन्या, पर्यावरण मंत्रालय अशा अनेक ठिकाणी त्यांची चौकशी सुरू आहे.
अनिल परब यांचे सहकारी संजय कदम यांच्या घरी सव्वा तीन कोट रूपयांची रोकड मिळाली होती. पंचवीस कोट रूपयांचा रिसोर्ट आहे. आत्ता उद्धव ठाकरे सरकारला जावे लागणार अशी प्रतिक्रिया किरीट सोमय्यांनी दिली आहे.
तपास यंत्रणा त्यांचं काम करीत आहे. हा प्रश्न फार महत्त्वाचा नाही. आज राज्यातील प्रश्न फार महत्त्वाचे आहेत, त्यावर अधिक बोलणं हे चांगलं ठरेल. ओबीसी आरक्षणाचा प्रश्न असेल किंवा शेतकऱ्यांचे प्रश्न असतील. अशा प्रश्नांवरती चर्चा व्हायला हवी.
एक व्यक्ती आहे, तिच्याभोवती राजकारण भिरू नये, विकासाची चर्चा दोन्ही बाजूकडून व्हायला हवी अशी प्रतिक्रिया भाजप नेते सुधीर मुंनगटीवार यांनी दिली.
अनधिकृत रिसॉर्ट प्रकरणात परब यांच्यावर कारवाई होणार असल्याचा दावा सोमय्यांनी केला. काही दिवसांपूर्वीच अनिल परब यांच्याशी संबंधित काही व्यक्तींवर आयकर विभागाकडून छापेमारी करण्यात आली होती.
परिवहन मंत्री अनिल परब हे वांद्रे येथील घरी नसल्याची माहिती मिळत आहे. ED चे अधिकारी आले तेव्हा अनिल परब घरी नव्हते. वांद्रे येथील अनिल परब यांच्या घरी ED च्या अधिकाऱ्यांसोबत CRPF चे सुरक्षा रक्षक उपस्थित आहेत.(स्रोत:TV9 मराठी)
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज