टीम मंगळवेढा टाईम्स ।
सोलापूर ग्रामीणच्या पोलीस अधीक्षक तेजस्वी सातपुते यांनी ग्रामीण पोलीस दलातील सहाय्यक फौजदार, पोलीस हवालदार, पोलीस नाईक व पोलीस शिपाई अशा 387 कर्मचाऱ्यांच्या अंतर्गत बदल्या केल्या आहेत.
त्यामध्ये 36 सहाय्यक फौजदार, 52 हवालदार, 72 नाईक,227 शिपाई यांचा समावेश आहे. पहा कुणाच्या झाल्या बदल्या आणि कुठे ही नावाची यादी
एकाच पोलीस ठाण्यात पाच वर्षाची सेवा पूर्ण व विनंती अर्ज केलेल्या पोलीस कर्मचाऱ्यांच्या अंतर्गत बदल्यांचे सत्र सुरू झाले आहे.
पारदर्शक बदली प्रक्रिया पार पाडण्यासाठी पोलीस अधीक्षक तेजस्वी सातपुते या प्रत्येक कर्मचाऱ्याचे समक्ष मत जाणून घेत, अडचणी जाणून घेऊन रिक्त जागा व विनंती अर्जाचा विचार करून बदली प्रक्रिया राबवली आहे.
दरम्यान, सोलापूर ग्रामीण पोलीस ठाणे अंतर्गत २५ पोलीस ठाणी कार्यरत आहेत. अडीच हजाराहून अधिक पोलिसांचे संख्याबळ असलेल्या
ग्रामीण पोलीस दलात पोलीस शिपाई , पोलीस नाईक, पोलीस हेड कॉन्स्टेबल , सहायक पोलीस फौजदार या पदावर कार्यरत असलेल्या पोलीस अंमलदारांच्या अंतर्गत बदल्यांची प्रक्रिया पार पडली आहे.
अनेकांना मुख्यालयाचा रस्ता …
या अंतर्गत बदली प्रक्रियेत ज्या पोलीस कर्मचाऱ्यांच्या संदर्भात तक्रारी आहेत. किंवा एखाद्या प्रकरणात त्या कर्मचाऱ्याची चौकशी सुरू आहे. अशा कर्मचाऱ्याची मुख्यालयात बदली होणार असल्याचे निश्चित मानले जात आहे.
शिवाय तपास कामात कामचुकारपणा करणाऱ्यांनाही मुख्यालयाचा रस्ता दाखविण्यात येणार असल्याचे सांगण्यात आले.
घरच्या अडचणींचा विचार
■ बदली प्रक्रियेत सर्वाधिक कर्मचारी हे घरच्या अडचणी सांगत आहेत . शिवाय कुटुंबातील सदस्यांवर सुरू असलेले उपचार, मुला – मुलींचे शिक्षण , वैद्यकीय अडचणी, कुटुंबाची जबाबदारी यासह अन्य अडचणी पोलीस अधीक्षकांसमोर सांगून बदली करा अशी विनंती अनेक कर्मचारी करीत होते.
बदलीसाठी चार पोलीस स्टेशनचा पर्याय
अंतर्गत बदल्यांच्या प्रक्रियेत प्रत्येक कर्मचाऱ्यांना चार पोलीस ठाणे किंवा स्टेशनचा पर्याय देण्यात येत आहे. या पर्यायानंतर रिक्त जागा व आवश्यक असलेल्या जागांचा विचार करून कर्मचाऱ्यांना संबंधित ठिकाणी बदलीचे ठिकाण देण्याचे कार्य सुरु असल्याचे एका वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्याने सांगितले.
आस्थापना मंडळांची पारदर्शकता …
सोलापूर ग्रामीण पोलीस दलातील अंतर्गत बदली प्रक्रियेसाठी आस्थापना मंडळाची स्थापना करण्यात आली होती. या मंडळात पोलीस अधीक्षक तेजस्वी सातपुते, अप्प पोलीस अधीक्षक हिम्मत जाधव , उपविभागीय पोलीस अधिकारी अमोल भारती यांचा समावेश होता.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज