mangalwedhatimes.in
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • सोलापूर
  • मंगळवेढा
  • राजकारण
  • क्राईम
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • सोलापूर
  • मंगळवेढा
  • राजकारण
  • क्राईम
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
No Result
View All Result
Mangalwedha Times
No Result
View All Result

कौतुकास्पद : मंगळवेढा शहराचा देश पातळीवर कचरा मुक्त शहरात समावेश

टीम 'मंगळवेढा टाईम्स' by टीम 'मंगळवेढा टाईम्स'
October 11, 2020
in Uncategorized
कौतुकास्पद : मंगळवेढा शहराचा देश पातळीवर कचरा मुक्त शहरात समावेश

समाधान फुगारे । मंगळवेढा टाईम्स केंद्र सरकारच्या गृहनिर्माण व नागरी कार्य मंत्रालय देशातील 141 शहरे कचरामुक्त शहरे म्हणून निवडली असून त्यामध्ये जिल्ह्यातील मंगळवेढा व बार्शी ची निवड झाली असून मंगळवेढा नगरपालिकेने आपल्या कामाचा ठसा 2020 मध्ये देखील कायम ठेवला.

सलग दोन वर्ष नियोजनबध्‍द केलेले कामकाज, कर्मचा-यांनी घेतलेले परिश्रम,मुख्याधिकारी सर्व नगरसेवकांचे सहकार्य,आणि नागरिकांची साथ यामुळेच नगरपरिषदेस गौरव प्राप्‍त झाला. शहरांतील स्‍वच्‍छतेची कामे व नागरीकांना चांगल्‍या सुविधा देण्‍यांस खूप मदत होणार आहे.भविष्यात भूमिगत गटारीच्या कामास प्राधान्य राहिल.असे नगराध्यक्ष अरुणा माळी यानी सांगितले.

       

नगरपालिकेने यापूर्वी स्वच्छ सर्वेक्षण व इतर कामात देखील सातत्य कायम ठेवून मंगळवेढ्याचे नावलौकीक कायम ठेवला असून यापूर्वी गतवर्षी नगरपालिकेचा राष्ट्रपती च्या हस्ते नगराध्यक्ष, आरोग्य सभापती, मुख्याधिकारी यांचा गौरव केला होता. यंदा देशातील 141 कचरामुक्त म्हणून निवडण्यात आली. त्यामध्ये महाराष्ट्रातील 76 शहरांचा समावेश आहे. फाईव्ह स्टार शहरात एकाचा तर वन स्टार मध्ये 41 शहराचा समावेश आहे.

सलग दोन वर्ष मंगळवेढा नगरपरिषदेने शहरांतील नागरीक, विविध मंडळ, संस्‍था यांचे सहकार्याने स्‍वच्‍छ सर्वेक्षण अभियानांत सातत्‍य राखल्‍यामुळे अडीच कोटी रुपये बक्षीस मिळाले. यामधील सव्‍वा कोटी रुपयांचा निधी नगरपरिषदेस प्राप्‍त झालेला असून उर्वरित सव्‍वा कोटी रुपये स्‍वच्‍छ सर्वेक्षण अभियान 2020 मध्‍ये सातत्‍य राखल्‍यामुळे प्राप्‍त होणार आहे. 

शहरांतील सर्व नागरीक बंधू भगिनी व विविध संस्‍था, मंडळे, यांनी स्‍वच्‍छ सर्वेक्षण अभियान 2020 मध्‍ये सुध्‍दा सातत्‍य ठेवल्याने शहर विकासाची संधी आपल्‍याला मिळणार असल्याने स्‍वच्‍छता व आरोग्‍य सुविधा या सारखा सतत भेडसावणारा प्रश्‍न भविष्यात सुटणार आहे असे मत मुख्याधिकारी पल्लवी पाटिल यानी व्यक्त केले.

नगरपालिकेमध्ये सध्या लोकप्रतिनिधी व प्रशासनामध्ये वारंवार तक्रारी होत आहेत परंतु त्यामुळे नागरिकांमध्ये उलट-सुलट चर्चा असताना स्वच्छ सर्वेक्षण सारख्या कामात हे सर्व जण एकजुटीने पालिकेचा गौरव वाढवण्यासाठी प्रयत्न करतात देखील समाधान व्यक्त होत आहे.

—————–

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 9561617373 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Mangalwedha Times News”

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.

ताज्या बातम्या थेट मोबाईलवर मिळवण्यासाठी आजच जॉईन व्हा

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज

Tags: MangalWedha

संबंधित बातम्या

सोने-चांदीचे दागिने खरेदी करायचेय मग वाट कसली पाहताय; भावात मोठी घसरण

खळबळ! मुलीच्या लग्नासाठी बुक केलेले सोन्याचे दागिने न देता चार लाखांची फसवणूक; विधवा महिलेची पोलीस ठाण्यात धाव; सोलापूर जिल्ह्यातील प्रकार

January 1, 2026

1 april to 9 april birthday

March 31, 2023

आठ मार्च वाढदिवस

March 8, 2023

प्रा.शिवाजीराव काळुंगे सर वाढदिवस

March 6, 2023
बारावीच्या विद्यार्थ्यांनो लक्ष द्या! ‘इथे’ क्लिक करुन पाहता येईल निकाल; ‘या’ तारखा निकालानंतर तुमच्यासाठी महत्त्वाच्यात

पालकांनो! दहावी निकालाच्या तारखेची अद्याप घोषणा नाही; विद्यार्थी, पालकांमध्ये निकालाची उत्सुकता शिगेला

June 15, 2022
आ.समाधान आवताडेंच्या कामगिरीने भारावले मुख्यमंत्री; तोंडभरून केले कौतुक

आ.समाधान आवताडेंच्या कामगिरीने भारावले मुख्यमंत्री; तोंडभरून केले कौतुक

July 21, 2021
शेतकऱ्यांची दिवाळी आनंदात! मंगळवेढा तालुक्यातील 36 हजार शेतकऱ्यांच्या खात्यावर अनुदान वर्ग

शेतकऱ्यांना कोणीच वाली नाही! खत विकेत्यांकडून शेतकऱ्यांची लूट सुरू; शेतकरी संघटना गप्प का?

July 12, 2021
रमजान ईदचा सण साधेपणाने साजरा करावा व घरातच नमाज पठण करावे : मुजम्मील काझी

केंद्र सरकारने इंधन व खत दरवाढ न थांबवलेस राष्ट्रवादी पद्धतीत अंदोलन करू; मुजम्मील काझी यांचा इशारा

May 17, 2021
कोरोनाला रोखण्यासाठी मंगळवेढा व्यापारी महासंघाचा पुढाकार; नागरिकांच्या सुरक्षतेच्या दृष्टीने घेतला ‘हा’ निर्णय

मंगळवेढेकरांनो नीट समजून घ्या! शहरात दुकानासाठी पुर्वीचेच नियम लागू असतील; विनाकारण बाहेर पडाल तर…

May 17, 2021
Next Post
नांदेडमध्ये हिंदु धर्मगुरूची मठात घुसून केली निर्घृण हत्या

नांदेडमध्ये हिंदु धर्मगुरूची मठात घुसून केली निर्घृण हत्या

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

Breaking! मंगळवेढा तालुक्यातील वृद्धाने चिठ्ठी लिहून संपविले जीवन; मुलाविरोधात गुन्हा दाखल धक्कादायक कारण आले समोर..?

नियतीचा क्रूर डाव! बाळ जन्माला आलं, पण माऊलीने जगाचा निरोप घेतला; मंगळवेढा येथील धक्कादायक घटना

July 20, 2026
‘मी देवेंद्र फडणवीस शपथ घेतो की.’, महाराष्ट्रात ‘देवेंद्र’ पर्वाला सुरुवात; आजपासूनच फडणवीस यांच्यापुढे असतील ‘हे’ 5 आव्हान

रक्तदानातून घडणार सेवाभावी पांडुरंगाचे दर्शन; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वाढदिवसानिमित्त आंधळगावात महारक्तदान शिबिर; करुणा शिवशरण यांचा स्तुत्य उपक्रम

July 20, 2026
अखेर सस्पेन्स संपला! इंडस्ट्रियल उद्योजक असोसिएशन एमआयडीसी मंगळवेढ्याच्या अध्यक्ष आणि सचिवपदी ‘यांची’ निवड; गुप्त मतदानाने फिरवली चक्रे

अखेर सस्पेन्स संपला! इंडस्ट्रियल उद्योजक असोसिएशन एमआयडीसी मंगळवेढ्याच्या अध्यक्ष आणि सचिवपदी ‘यांची’ निवड; गुप्त मतदानाने फिरवली चक्रे

July 20, 2026
मंगळवेढ्याचा ‘हा’ प्रस्ताव आपल्या स्तरावर प्रलंबित; सत्ताधारी पक्षाच्या दुर्लक्षामुळे अनेक प्रश्न रखडले; अनिल सावंत यांनी उपमुख्यमंत्र्याकडे केली महत्त्वाची मागणी

पिके करपली, पशुधन संकटात! मंगळवेढा तालुका दुष्काळग्रस्त घोषित करा; शिवसेना नेते अनिल सावंतांची थेट उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंकडे धाव

July 19, 2026
भयंकर! दूध डेअरी चालकास ‘या’ कारणांसाठी झाला सव्वा दोन लाखाचा दंड

घरात चालायची दुधात डिटर्जंट, युरिया आणि रसायनांची भेसळ, रंगेहात पकडले; तुकाराम मुंढेंची मोठी कारवाई

July 20, 2026
खळबळ! मंगळवेढ्यात झालेल्या ‘त्या’ आत्महत्येप्रकरणी पाच जणांविरूध्द गुन्हा दाखल

खळबळ! ऊसतोड मजूर, बालविवाह अन् दोन अपत्ये… मंगळवेढ्यातील ‘त्या’ धक्कादायक प्रकाराने पोलीसही चक्रावले

July 19, 2026
mangalwedhatimes.in

प्रिंट,टीव्ही मीडियानंतर सध्या डिजिटल मीडियाचं महत्व प्रचंड वाढलंय. येणाऱ्या काळात या माध्यमाचं महत्व आणि व्याप्ती आणखी वाढणार असल्यानं . आम्ही हा नवीन बदल स्वीकारून 'मंगळवेढा टाईम्स' या सोशल मीडियाच्या फेसबुक पेजचे रूपांतर वेब मीडिया मध्ये करून 'मंगळवेढा टाईम्स' या नावाने न्युजचे वेब पोर्टल आपल्या सेवेत दाखल झालय. येथे आपण आपल्या स्मार्टफोन, कॉम्पुटर वरून देश विदेशातील घडामोडी तसेच स्थानिक, व्यापार, ग्रामीण, सांस्कृतिक, उद्योग, कृषी, मनोरंजन, तंत्रज्ञान, शिक्षण अश्या विविध श्येत्रांतील बातम्या घरबसल्या वाचू शकता. स्मार्टफोन, सोशल मीडियाच्या माध्यमातून बातम्या पाहण्यात लोकांचा कल वाढतोय, म्हणूनच आम्ही बदलतोय.

© 2020 Website Maintained by Tushar Bhambare..

No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • सोलापूर
  • मंगळवेढा
  • राजकारण
  • क्राईम
  • मनोरंजन
  • शैक्षणिक

© 2020 Website Maintained by Tushar Bhambare..

ताज्या बातम्या थेट मोबाईलवर मिळवण्यासाठी आजच जॉईन व्हा