मंगळवेढा : समाधान फुगारे
मंगळवेढा तालुक्यातील 18 ग्रामपंचायतीच्या निवडणुकांचा बिगुल वाजले असून मतदान 18 डिसेंबर रोजी होणार असल्याची राज्य निवडणूक आयोगाकडून मोठी घोषणा करण्यात आलीय.
मंगळवेढ्याच्या राजकारणात सध्या अनेक घडामोडी घडत आहेत. आ.समाधान आवताडे, आ.प्रशांत परिचारक, समविचारी आघाडी व बबनराव आवताडे गट सध्या आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर चांगलेच कामाला लागले आहेत.
आगामी काळात येणाऱ्या स्थानिक स्वाराज्य संस्थांच्या निवडणुकिचा फायदा हा आगामी विधानसभा निवडणुकीत होणार आहे. त्यामुळे प्रत्येक पक्ष कंबर कसून तयारीला लागला आहे.
या दरम्यान अनेक वेगवेगळ्या घडामोडी राजकारणात सुरु आहेत. सध्या भगीरथ भालके त्यांचा गट पूर्ण ताकदीने ही निवडणूक लढवणार असल्याचे बोलले जात आहे . तर सिध्देश्वर आवताडे यांनी शहरालगतच्या ग्रामपंचायतीवर सत्ता काबीज केली असताना आता होणाऱ्या ग्रामपंचायत निवडणूकीमध्ये स्वतंत्र पॅनल उभे करणार असल्याचे बोलले जात आहे.
भाजपचे आवताडे व परिचारक हे एकत्रित निवडणूक लढवतील का? परिचारक समविचारी आघाडीच्या पाठिशी उभे राहतील हे येत्या काही दिवसात स्पष्ट होईल.
निवडणुकीचा कार्यक्रम असा असेल :
ऑक्टोबर 2022 ते डिसेंबर 2022 या कालावधीत मुदत संपणाऱ्या; तसेच नव्याने स्थापित या सर्व ग्रामपंचायतींच्या निवडणुकांसाठी 18 नोव्हेंबर 2022 रोजी संबंधित तहसीलदार निवडणुकीची नोटीस प्रसिद्ध करतील.
नामनिर्देशनपत्र 28 नोव्हेंबर 2022 ते 2 डिसेंबर 2022 या कालावधीत दाखल करण्यात येतील. नामनिर्देशनपत्रांची छाननी 5 डिसेंबर 2022 रोजी होईल.
नामनिर्देशनपत्र मागे घेण्याची अंतिम मुदत 7 डिसेंबर 2022 रोजी दुपारी 3 वाजेपर्यंत असेल व त्याच दिवशी निवडणूक चिन्हांचे वाटप होईल.
मतदान 18 डिसेंबर 2022 रोजी सकाळी 7.30 ते सायंकाळी 5.30 या वेळेत होईल.मतमोजणी 20 डिसेंबर 2022 रोजी होईल.
मंगळवेढा तालुक्यातील ‘या’ ग्रामपंचायतीची निवडणूक जाहीर
डोंगरगाव, सोड्डी, बावची, पौट, पाठकळ, मारोळी, हाजापुर, शिरनांदगी, येड्राव, गोणेवाडी, खोमनाळ, फटेवाडी, रहाटेवाडी, तळसंगी, भालेवाडी, मारापुर गुंजेगांव व ढवळस. (टीम मंगळवेढा टाईम्स)
अशाच महत्वपूर्ण बातम्या आणि माहीती मनोरंजन मिळवा तुमच्या व्हॉट्सअँप ग्रूपमध्ये, त्यासाठी पुढील नंबर तुमच्या ग्रुपमध्ये समाविष्ट करा – 9970766262
“मंगळवेढा टाईम्स”च्या बातम्या मिळविण्यासाठी 9970766262 हा नंबर तुमच्या व्हॉट्सऍपवर ग्रुपवर ऍड करून फक्त एक मेसेज करा.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज