mangalwedhatimes.in
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • सोलापूर
  • मंगळवेढा
  • राजकारण
  • क्राईम
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • सोलापूर
  • मंगळवेढा
  • राजकारण
  • क्राईम
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
No Result
View All Result
Mangalwedha Times
No Result
View All Result

लेटर बॉम्ब! गटशिक्षणाधिकाऱ्याची शिक्षिकेला वाईट हेतुने ऑफर; पालकमंत्री विखे-पाटलांच्या गाडीसमोर आत्मदहन करण्याचा इशारा

टीम 'मंगळवेढा टाईम्स' by टीम 'मंगळवेढा टाईम्स'
November 10, 2022
in शैक्षणिक, सोलापूर
गालबोट! मंगळवेढ्यात वर्ग वाटपावरून शिक्षक-मुख्याध्यापकात हमरीतुमरी, ‘या’ शाळेतील प्रकार; कारवाईसाठी ‘प्रहार’ संघटना आक्रमक

टीम मंगळवेढा टाईम्स ।

प्राथमिक शिक्षण विभागातील एक गटशिक्षणाधिकारी वाईट हेतू ठेवून आपल्याशी लगट करण्याचा प्रयत्न करत आहे. यासंदर्भात तत्कालीन शिक्षणाधिकारी , विद्यमान मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्यासह मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांना आपण पत्रे पाठविली.

मात्र याबाबत संबंधितावर कोणतीही कारवाई करण्यात आली नाही. त्यामुळे आता संबंधित अधिकाऱ्यावर तात्काळ कठोर कारवाई करावी, अन्यथा पालकमंत्री राधाकृष्ण विखे-पाटील यांच्या गाडीसमोर आत्मदहन करण्याचा इशारा संबंधित शिक्षिकेने निनावी पत्राद्वारे दिला आहे. या निनावी बॉम्बमुळे जिल्हा परिषद वर्तुळात एकच खळबळ उडाली आहे.

अगोदरच सोलापूर जिल्हा परिषद प्राथमिक शिक्षण विभाग विविध प्रकरणाने राज्यभर गाजत असताना त्यात या नव्या गंभीर प्रकरणाची भर पडली आहे.

या प्रकरणाची सखोल चौकशी होऊन या प्रकाराची शहानिशा होण्याची गरज आहे मात्र या प्रकरणाकडे जिल्हा परिषद प्रशासन किती गांभीर्याने पाहणार , हा संशोधनाचा विषय आहे.

हा प्रकार मागील सात ते आठ महिन्यांपासून सुरू आहे. यासंदर्भात तत्कालीन शिक्षणाधिकारी, विद्यमान मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्याकडे आपण तक्रार केली.

मात्र संबंधित अधिकाऱ्यावर कोणतीही कारवाई होत नसल्याने त्याचे धाडस वाढले आहे. दिवाळीच्या दरम्यान तर आमच्या घरी कोणी नाही. तुम्ही फराळाला या म्हणेपर्यंत त्या गटशिक्षणाधिकाऱ्याची मजल गेल्याचे त्या निनावी पत्रात नमूद करण्यात आले आहे.

विशेष म्हणजे प्रशासनातील अधिकाऱ्यांकडे न्याय मागूनही मिळत नसल्याने संबंधित शिक्षिकेने जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष बळीराम साठे यांनाही पोस्टाद्वारे पत्र पाठवित आपल्याला न्याय द्यावा, अशी मागणी केली आहे. केवळ त्यामुळे या प्रकरणाचे बिंग फुटले आहे.(स्रोत:पुण्यनगरी)

अशा अधिकाऱ्यांना जाहीरपणे जोड्याने मारा- साठे

एका महिला शिक्षिकेने आपल्यावर होणाऱ्या अन्यायासंदर्भात निनावी पत्र पाठवून सविस्तर कथन केले आहे. शिक्षण क्षेत्रासारख्या पवित्र ठिकाणी असे उद्योग करणाऱ्या अधिकाऱ्याची चौकशी करून कारवाई करण्याची मागणी आपण मुख्य कार्यकारी अधिकारी स्वामी यांची भेट घेऊन केली आहे. हा प्रकार सत्य असेल तर अशा अधिकाऱ्याला जाहीरपणे जोड्याने मारले पाहिजे, असा संताप बळीराम साठे यांनी व्यक्त केला आहे.

या प्रकरणी कठोर कारवाई – स्वामी

निनावी पत्राद्वारे कथन करण्यात आलेला हा प्रकार अतिशय गंभीर आहे. या संदर्भात त्या महिला शिक्षिकेचे म्हणणे इन कॅमेरा घेऊन तक्रारदाराचे नाव गुप्त ठेवण्यात येणार आहे.

संपूर्ण प्रकाराची सखोल चौकशी करून दोषी असणाऱ्यांवर प्रशासकीय कारवाईबरोबरच पोलीस कारवाई करण्यात येणार असल्याचे मुख्य कार्यकारी अधिकारी दिलीप स्वामी यांनी सांगितले.

जाणीवपूर्वक बदनाम करण्याचा प्रकार : जमादार

मध्यंतरी एका वरिष्ठ अधिकाऱ्यासंदर्भात अपशब्द वापरल्याप्रकरणे संघटनेच्या माध्यमातून आपण काम बंद आंदोलन केले होते. त्याचा रोष धरूनच हा प्रकार केला जात आहे. यात अनेक माहिती अधिकारी कार्यकर्त्यांचा समावेश आहे.

यासंदर्भात आपण दि.१७ ऑक्टोबर रोजी मुख्य कार्यकारी अधिकारी यांना पत्र लिहून घडत असलेल्या संभाव्य अर्थहीन प्रकाराबद्दल माहिती दिली असल्याचे गटशिक्षणाधिकारी बापूसाहेब जमादार यांनी सांगितले.

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.

ताज्या बातम्या थेट मोबाईलवर मिळवण्यासाठी आजच जॉईन व्हा

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज

Tags: गटशिक्षणाधिकारी

संबंधित बातम्या

दुर्दैवी घटना! सांगोल्यातील ‘या’ गावात दोन बहिणींचा शेततळ्यात बुडून मृत्यू

डोळे पाणावले! मुलीच्या लेकाने केला वारीचा हट्ट; आजीसमोरच नातू नदीत वाहून गेला; मृतदेह शोधासाठी वारकऱ्यांचा रास्ता रोको

July 2, 2025
गुड न्युज! चंद्रभागा शुद्धीकरणासाठी मोदी सरकारने उचलले मोठं पाऊल; आमदार आवताडेंची माहिती

सर्वसामान्य भाविक व वारकऱ्यांच्या दर्शनाची सोय आता सुलभ होणार; व्हीआयपीमध्ये घुसखोरी करणाऱ्यांना प्रतिबंध; उत्सवाच्या दिवशी ‘येथून’ मिळणार प्रवेश; जिल्हाधिकाऱ्यांचे नवे आदेश

July 1, 2025
नागरिकांनो! ‘हे’ काम आत्ताच करून घ्या, अन्यथा 1 फेब्रुवारीपासून रेशन होणार बंद!

सोलापूर जिल्ह्यात ‘एवढे’ रेशन दुकानांचा जाहीरनामा; महिला बचत गट, सहकारी संस्था, स्वयंसेवी संस्थांना दुकाने प्राधान्याने दिली जाणार; इच्छुकांनी विहित नमुन्यात, वेळेत अर्ज करावा

July 1, 2025
‘मी देवेंद्र फडणवीस शपथ घेतो की.’, महाराष्ट्रात ‘देवेंद्र’ पर्वाला सुरुवात; आजपासूनच फडणवीस यांच्यापुढे असतील ‘हे’ 5 आव्हान

मोठी बातमी! त्रिभाषा सूत्राबाबतचे दोन्ही शासन निर्णय रद्द; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची सर्वात मोठी घोषणा; फडणवीस नेमकं काय म्हणाले?

June 30, 2025
एक लाख वारकरी विठ्ठल मंदिरासमोर आज ठिय्या आंदोलन करणार; वंचितच्या आंदोलनाला सरकार घाबरले

देवाचे दर्शन भाविकांना लवकर मिळणार, भक्तांसाठी विठूराया २४ तास उभा राहणार; ‘या’ तारखेपर्यंत असणार दिवसभर दर्शन उपलब्ध

June 29, 2025
गाडीला चॉईस नंबर हवा आहे, मग ‘हे’ काम करा; सोलापूर जिल्हा आर.टी.ओ चे आवाहन

वाहनधारकांनो! वाहनांचे फिटनेस सर्टिफिकेट नाही केले, तर पाच हजार रुपये दंड आकारला जाणार, दरदिवशी होणार ‘एवढा’ रुपये दंड

June 28, 2025
गुड न्युज! चंद्रभागा शुद्धीकरणासाठी मोदी सरकारने उचलले मोठं पाऊल; आमदार आवताडेंची माहिती

धर्म आणि जातीच्या भिंती तोडून मुस्लिम तरुणाच्या अनोख्या विठ्ठलभक्तीचे दर्शन; एक लाख रुपये किमतीचा चांदीचा मुकुट विठुरायाला अर्पण

June 28, 2025
महसूल पंधरवाडा अंतर्गत आज बोराळे येथे शेती, पाऊस व दाखले मार्गदर्शन कार्यक्रम; शेती समस्या व उपाय, पावसाची अनियमितता, शेतकऱ्यांना देण्यात येणारे वेगवेगळे दाखले या विषयावर सखोल मार्गदर्शन

शेतकऱ्यांनो! पीकविम्यासाठी मोजावे लागणार अधिकचे पैसे, शासनाची एक रुपयात विमा योजना बंद; नुकसानभरपाईच्या नियमात झाले ‘हे’ बदल

June 27, 2025
तरुण पिढीने नेतृत्व घेऊन सांगोला व मंगळवेढा भागासाठी ही चळवळ अधिक तीव्र करावी; प्रा.काळुंगे यांनी सोपवली नव्या पिढीवर जबाबदारी; हक्काच्या पाण्यासाठी ३३ वर्षांचा संघर्ष

तरुण पिढीने नेतृत्व घेऊन सांगोला व मंगळवेढा भागासाठी ही चळवळ अधिक तीव्र करावी; प्रा.काळुंगे यांनी सोपवली नव्या पिढीवर जबाबदारी; हक्काच्या पाण्यासाठी ३३ वर्षांचा संघर्ष

June 27, 2025
Next Post
अरे कुठे नेऊन ठेवलाय मंगळवेढा माझा? वेगळ्या देशाची मान्यता द्या, अन्यथा सामूहिक आत्मदहनाचा इशारा; नागरिकांनी केली खळबळजनक मागणी

अरे कुठे नेऊन ठेवलाय मंगळवेढा माझा? वेगळ्या देशाची मान्यता द्या, अन्यथा सामूहिक आत्मदहनाचा इशारा; नागरिकांनी केली खळबळजनक मागणी

ताज्या बातम्या

मर्चंट नेव्हीतील अधिकार्‍यावर हल्ला; माजी सरपंचासह 5 जणांना पोलिस कोठडी

भयानक! वाळू टाकण्याच्या वादातून तरुणाला अपहरण करून संपवलं; मृतदेह आडरानात फेकला; नेमके घडले काय?

July 2, 2025

ट्रॅक्टर खरेदीसाठी दीड लाख रुपयांचे अनुदान मिळणार, राज्य सरकारची मोठी घोषणा; शेतकऱ्याचा खर्च 70 टक्के कमी होणार

July 2, 2025
दुर्दैवी घटना! सांगोल्यातील ‘या’ गावात दोन बहिणींचा शेततळ्यात बुडून मृत्यू

डोळे पाणावले! मुलीच्या लेकाने केला वारीचा हट्ट; आजीसमोरच नातू नदीत वाहून गेला; मृतदेह शोधासाठी वारकऱ्यांचा रास्ता रोको

July 2, 2025
रतनचंद शहा बँकेच्या सर्व खातेदारांच्या ठेवी सुरक्षित : चेअरमन राहुल शहा

राज्य कार्यक्षेत्र असणाऱ्या रतनचंद शहा सहकारी बँकेचा निवडणूक कार्यक्रम सुरू; १५ जागांसाठी ‘इतके’ अर्ज दाखल

July 2, 2025
खिशावर डल्ला : सलग १२ व्या दिवशी पेट्रोल-डिझेल दरात वाढ, हे आहेत आजचे दर

नागरिकांनो! आजपासून ‘या’ वाहनांना पेट्रोल- डिझेल मिळणार नाही, का आणि कुठे घेण्यात आला निर्णय? पेट्रोल पंपावर असणार कडक नजर

July 1, 2025
गुड न्युज! चंद्रभागा शुद्धीकरणासाठी मोदी सरकारने उचलले मोठं पाऊल; आमदार आवताडेंची माहिती

सर्वसामान्य भाविक व वारकऱ्यांच्या दर्शनाची सोय आता सुलभ होणार; व्हीआयपीमध्ये घुसखोरी करणाऱ्यांना प्रतिबंध; उत्सवाच्या दिवशी ‘येथून’ मिळणार प्रवेश; जिल्हाधिकाऱ्यांचे नवे आदेश

July 1, 2025
mangalwedhatimes.in

प्रिंट,टीव्ही मीडियानंतर सध्या डिजिटल मीडियाचं महत्व प्रचंड वाढलंय. येणाऱ्या काळात या माध्यमाचं महत्व आणि व्याप्ती आणखी वाढणार असल्यानं . आम्ही हा नवीन बदल स्वीकारून 'मंगळवेढा टाईम्स' या सोशल मीडियाच्या फेसबुक पेजचे रूपांतर वेब मीडिया मध्ये करून 'मंगळवेढा टाईम्स' या नावाने न्युजचे वेब पोर्टल आपल्या सेवेत दाखल झालय. येथे आपण आपल्या स्मार्टफोन, कॉम्पुटर वरून देश विदेशातील घडामोडी तसेच स्थानिक, व्यापार, ग्रामीण, सांस्कृतिक, उद्योग, कृषी, मनोरंजन, तंत्रज्ञान, शिक्षण अश्या विविध श्येत्रांतील बातम्या घरबसल्या वाचू शकता. स्मार्टफोन, सोशल मीडियाच्या माध्यमातून बातम्या पाहण्यात लोकांचा कल वाढतोय, म्हणूनच आम्ही बदलतोय.

© 2020 Website Maintained by Tushar Bhambare..

No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • सोलापूर
  • मंगळवेढा
  • राजकारण
  • क्राईम
  • मनोरंजन
  • शैक्षणिक

© 2020 Website Maintained by Tushar Bhambare..

ताज्या बातम्या थेट मोबाईलवर मिळवण्यासाठी आजच जॉईन व्हा