mangalwedhatimes.in
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • सोलापूर
  • मंगळवेढा
  • राजकारण
  • क्राईम
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • सोलापूर
  • मंगळवेढा
  • राजकारण
  • क्राईम
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
No Result
View All Result
Mangalwedha Times
No Result
View All Result

Breaking! अ‍ॅड.गुणरत्न सदावर्ते पोलिसांच्या ताब्यात; शरद पवारांच्या घरावर आंदोलन भोवले

टीम 'मंगळवेढा टाईम्स' by टीम 'मंगळवेढा टाईम्स'
April 9, 2022
in राज्य
Breaking! अ‍ॅड.गुणरत्न सदावर्ते पोलिसांच्या ताब्यात; शरद पवारांच्या घरावर आंदोलन भोवले

टीम मंगळवेढा टाईम्स ।

मागील पाच महिन्यापासून सुरु असलेल्या एसटी कर्मचाऱ्यांच्या आंदोलनाला आज वेगळं वळण मिळालं. जवळपास 100 पेक्षा अधिक एसटी कर्मचाऱ्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांचं निवासस्थान असलेल्या सिल्व्हर ओकवर आंदोलन केलं.

यावेळी उपमुख्यमंत्री अजित पवार आणि शरद पवार यांच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली. तसंच पवारांच्या निवासस्थानावर चपला आणि दगडफेकही झाली.

या प्रकारानंतर राज्यातील राजकारण चांगलंच तापलं आहे. या संपूर्ण प्रकाराची चौकशी करुन कठोर कारवाईचा इशारा पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे, परिवहन मंत्री अनिल परब यांनी दिला होता.

त्यानंतर आता एसटी कर्मचाऱ्यांचा लढा कोर्टात लढणारे अॅड. गुणरत्न सदावर्ते यांची चौकशी करण्यात येणार आहे. पोलिसांनी सदावर्ते यांना ताब्यात घेतल्याची माहिती मिळतेय.

सदावर्तेंच्या पत्नीचा पवारांवर गंभीर आरोप

दरम्यान, शरद पवार, दिलीप वळसे पाटील, सुप्रिया सुळे यांच्याकडून माझ्या पतीच्या जीविताला धोका असल्याचा आरोप गुणरत्न सदावर्ते यांच्या पत्नी जयश्री पाटील यांनी केलाय. गुणरत्न सदावर्ते यांना पोलिसांनी ताब्यात घेतल्यानंतर जयश्री पाटील गावदेवी पोलीस ठाण्यात दाखल झाल्या. त्यावेळी त्यांनी पवार आणि राज्य सरकारवर गंभीर आरोप केलेत.

एसटी कर्मचाऱ्यांच्या आंदोलनावर सदावर्तेंची प्रतिक्रिया काय?

अॅड. गुणरत्न सदावर्ते यांच्या सांगण्यावरुनच एसटी कर्मचाऱ्यांनी सिल्व्हर ओकवर आंदोलन केल्याचा आरोप राष्ट्रवादी काँग्रेसकडून करण्यात आलाय. यावर बोलताना सदावर्ते म्हणाले की, एकशे चोवीस महिलांचे कुंकू पुसले गेले.

परंतु तुम्हाला सांगतो की केसचा निकाल लागल्यानंतर विपश्यना करा, शांतता राखा, मनस्थिती शांत ठेवा, असं मी आणि न्यायमूर्तींनीही सांगितलं. व्यथित झालेल्या महिलांचा तुम्ही हल्ला हल्ला म्हणून बोलू नका.

हल्लेखोर असते, तर ते व्यथित आणि चक्कर आलेले कसे असतील? बांगड्या फोडणं हे तर गुलामगिरीतून बाहेर येण्याचं लक्षण आहे. कोविड काळात वीर मरण पत्करलेल्या विधवा झालेल्या महिलांसाठी कोर्टात उभं करणं मी हल्ला करण्यासाठी उभा राहीन का? असा सवाल सदावर्ते यांनी विचारलाय.

‘हे राष्ट्रवादीकडूनही केलं गेलं असेल’

संवंधिनिक मर्यादा आम्ही ओलांडलेली नाही. संविधानाच्या बाहेर आम्ही एकही शब्द बोललेलो नाही. एक शब्द तुम्ही वापरला की ड्रामा.. ड्राम्याला हल्ल्याचं स्वरुप देऊ नये.

124 विधवा झालेल्या भगिनी, लोकांच्या प्रती त्यांना तुम्ही हल्लेखोर ठरवू नका. चौकशी आधी फाशीची प्रथा कुठेच नाही. सुप्रिया सुळेच म्हणतात की मी चर्चा करायला तयार आहे, तर मग संवादातून आक्रमकता झाली असेल त्याला तुम्ही हल्ला कसं म्हणता? असंही सदावर्तेंनी विचारलंय.

हा हल्ला नाही, याला हल्ल्याचं रुप दिलं जातंय. हायवोल्टेज ड्रामा तयार करुन राष्ट्रवादीकडूनही केलं जाण्याचा प्रकार असू शकतो, अशी शंकाही सदावर्ते यांनी व्यक्त केली आहे.(स्रोत:TV9 मराठी)

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.

ताज्या बातम्या थेट मोबाईलवर मिळवण्यासाठी आजच जॉईन व्हा

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज

Tags: अँड.गुणरत्न सदावर्तेताब्यात

संबंधित बातम्या

पालकांनो, खिशाला कात्री लागणार नाही! सरकारने ‘या’ विद्यार्थ्यांची परीक्षा फी केली माफ; पहा तुम्ही पात्र आहात का?” जाणून घ्या…

February 13, 2026
मोठी बातमी! मनोज जरांगे पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त आज मुढवी येथे भव्य रक्तदान शिबिर; मंगळवेढा येथील शिवालयापासून मुढवी पर्यंत भव्य सायकल रॅलीचे आयोजन

खळबळ! माझ्या हत्येचा कट रचला जातोय, सुपाऱ्या दिल्या जातायत; मनोज जरांगे पाटील यांचा मंगळवेढ्यात गंभीर आरोप, म्हणाले….

February 13, 2026
मोठी बातमी! मनोज जरांगे पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त आज मुढवी येथे भव्य रक्तदान शिबिर; मंगळवेढा येथील शिवालयापासून मुढवी पर्यंत भव्य सायकल रॅलीचे आयोजन

मराठा आरक्षणाचे वादळ आता शिवरायांच्या चरणी! “शिवमुर्ती प्रतिष्ठापना आणि जरांगे पाटील; मंगळवेढ्यात आज ऐतिहासिक भेटीचा साक्षीदार व्हा

February 11, 2026
चमकदार कामगिरी! सोलापूर पोलिसांनी उध्वस्त केला बनावट नोटांची छपाई करणारा अड्डा

खळबळजनक! खोटा व न वटणारा चेक दिल्याप्रकरणी आरोपीस दोन वर्षे सश्रम कारावास

February 9, 2026
Breaking! मंगळवेढा तालुक्यातील वृद्धाने चिठ्ठी लिहून संपविले जीवन; मुलाविरोधात गुन्हा दाखल धक्कादायक कारण आले समोर..?

नॉन स्ट्राईकला आयुष्याचा झाला The End; रन काढताना हार्ट अटॅक आला, Live मॅचमध्ये रत्नागिरीच्या क्रिकेटपटूचा मृत्यू

February 9, 2026
सोलापूर विद्यापीठाने पुन्हा परीक्षा पुढे ढकलल्या! नैसर्गिक आपत्तीमुळे ऑनलाइन परीक्षा रद्द

टेन्शन मुक्त! दहावी आणि बारावीच्या मुलांना परीक्षेचे टेन्शन; एका कॉलवर विद्यार्थ्यांना मार्गदर्शन घेता येणार; बोर्डाने केली तज्ज्ञ समुपदेशकांची नियुक्ती

February 13, 2026
मोठी बातमी! मंगळवेढ्यात नगरसेवक पदासाठी आज भाजप, राष्ट्रवादी काँग्रेस व अपक्षाकडून अर्ज दाखल; नगराध्यक्षपदासाठी ‘इतके’ अर्ज; मतदारांमध्ये उत्सुकता वाढली

पत्नी मेंबर, पतीचा हस्तक्षेप चालणार नाही; पद गमावणार, गुन्हाही दाखल होणार; शासन आदेशाचे पालन आवश्यक; अधिकारीही सतर्क

January 30, 2026
सर्वात मोठी बातमी! लोकसभा निवडणुकीच्या तारखा ‘या’ दिवशी जाहीर होणार?; निवडणूक आयोगाच्या हालचाली सुरु

मोठी बातमी! जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीचे मतदान आणि निकाल पुढे ढकलला, तारखेत मोठा बदल; 5 ऐवजी ‘या’ तारखेला मतदान

January 29, 2026
अश्रूंच्या धारांनी बारामती चिंब! जिथून सुरूवात, तिथेच निरोप; उपमुख्यमंत्री अजितदादांच्या पार्थिवावर आज अंत्यसंस्कार; महाराष्ट्रावर शोककळा

अश्रूंच्या धारांनी बारामती चिंब! जिथून सुरूवात, तिथेच निरोप; उपमुख्यमंत्री अजितदादांच्या पार्थिवावर आज अंत्यसंस्कार; महाराष्ट्रावर शोककळा

January 29, 2026
Next Post
मोदी सकारात्मक! मतदारसंघाच्या विकासासाठी आ.आवताडे यांनी घेतली पंतप्रधान मोदींची भेट; कायापालट होणार

मोदी सकारात्मक! मतदारसंघाच्या विकासासाठी आ.आवताडे यांनी घेतली पंतप्रधान मोदींची भेट; कायापालट होणार

ताज्या बातम्या

मोठी बातमी! मंगळवेढ्यात नगरसेवक पदासाठी आज भाजप, राष्ट्रवादी काँग्रेस व अपक्षाकडून अर्ज दाखल; नगराध्यक्षपदासाठी ‘इतके’ अर्ज; मतदारांमध्ये उत्सुकता वाढली

बापरे..! जिल्हा परिषद मेंबर होण्यासाठी इच्छुक झाले कर्जबाजारी; सावकाराचे कर्ज डोक्यावर : निवडणुकीत कोट्यवधींचा खर्च

February 13, 2026

पालकांनो, खिशाला कात्री लागणार नाही! सरकारने ‘या’ विद्यार्थ्यांची परीक्षा फी केली माफ; पहा तुम्ही पात्र आहात का?” जाणून घ्या…

February 13, 2026
मोठी बातमी! मनोज जरांगे पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त आज मुढवी येथे भव्य रक्तदान शिबिर; मंगळवेढा येथील शिवालयापासून मुढवी पर्यंत भव्य सायकल रॅलीचे आयोजन

खळबळ! माझ्या हत्येचा कट रचला जातोय, सुपाऱ्या दिल्या जातायत; मनोज जरांगे पाटील यांचा मंगळवेढ्यात गंभीर आरोप, म्हणाले….

February 13, 2026
लक्ष्मीदहिवडी गटाचा चेहरा बदलणार! कृतज्ञता दौऱ्यातून सर्वांगीण विकासाचा शब्द; २१ गावांना भेट देऊन जनतेचे मानले आभार; करूणाताई शिवशरण यांचा झंझावाती दौरा

लक्ष्मीदहिवडी गटाचा चेहरा बदलणार! कृतज्ञता दौऱ्यातून सर्वांगीण विकासाचा शब्द; २१ गावांना भेट देऊन जनतेचे मानले आभार; करूणाताई शिवशरण यांचा झंझावाती दौरा

February 12, 2026
मोठी बातमी! मनोज जरांगे पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त आज मुढवी येथे भव्य रक्तदान शिबिर; मंगळवेढा येथील शिवालयापासून मुढवी पर्यंत भव्य सायकल रॅलीचे आयोजन

मराठा आरक्षणाचे वादळ आता शिवरायांच्या चरणी! “शिवमुर्ती प्रतिष्ठापना आणि जरांगे पाटील; मंगळवेढ्यात आज ऐतिहासिक भेटीचा साक्षीदार व्हा

February 11, 2026
मंगळवेढा तालुक्यातील ‘या’ मंदिरातील देवीच्या चांदीच्या पादुका चोरट्यांनी पळविल्या

हद्दच झाली! रातोरात अख्खं शेतच लंपास; चोरट्यांनी सोन्या-चांदीऐवजी पळवलं लाखो रुपयांचे ‘हिरवं सोनं’; शेतकऱ्याच्या डोळ्यात पाणी; मंगळवेढा तालुक्यातील प्रकार

February 11, 2026
mangalwedhatimes.in

प्रिंट,टीव्ही मीडियानंतर सध्या डिजिटल मीडियाचं महत्व प्रचंड वाढलंय. येणाऱ्या काळात या माध्यमाचं महत्व आणि व्याप्ती आणखी वाढणार असल्यानं . आम्ही हा नवीन बदल स्वीकारून 'मंगळवेढा टाईम्स' या सोशल मीडियाच्या फेसबुक पेजचे रूपांतर वेब मीडिया मध्ये करून 'मंगळवेढा टाईम्स' या नावाने न्युजचे वेब पोर्टल आपल्या सेवेत दाखल झालय. येथे आपण आपल्या स्मार्टफोन, कॉम्पुटर वरून देश विदेशातील घडामोडी तसेच स्थानिक, व्यापार, ग्रामीण, सांस्कृतिक, उद्योग, कृषी, मनोरंजन, तंत्रज्ञान, शिक्षण अश्या विविध श्येत्रांतील बातम्या घरबसल्या वाचू शकता. स्मार्टफोन, सोशल मीडियाच्या माध्यमातून बातम्या पाहण्यात लोकांचा कल वाढतोय, म्हणूनच आम्ही बदलतोय.

© 2020 Website Maintained by Tushar Bhambare..