टीम मंगळवेढा टाईम्स ।
मंगळवेढा येथील बालविकास प्रकल्प कार्यालयाकडून ४४ अंगणवाडी मदतनीसच्या जागा भरण्यात येणार असून दि. १२ जुलै अखेर अर्ज स्वीकारण्याची मुदत आहे.
दरम्यान पात्र महिलांनी अर्ज करावेत असे आवाहन बालविकास प्रकल्प अधिकारी जगन्नाथ गारोळे यांनी केले आहे.
दि १ जुलैपासुन कार्यालयीन वेळेत अर्ज स्वीकारले जातील. अर्ज स्वीकारण्याचा अंतिम दि.१२ जुलै असून अर्ज छाननी करून उमेदवाराची प्राथमिक गुणवत्ता यादी प्रकाशित करणे दि.२६ जुलै,
प्रकाशित केलेल्या यादीवर आक्षेप नोंदविण्याचा अंतिम दि. ८ ऑगस्ट, अंतिम निवड यादी व प्रतीक्षा यादी दि.१६ ऑगस्ट रोजी प्रकाशित होणार आहे
बोगस खत मिळाल्यास व्हॉट्सअॅप करा, दोषी दुकानदार तुरुंगात जाणार
सोलापूर जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी बोगस बियाणे, बोगस रासायनिक खते, कीटकनाशके आदींबाबत तक्रार कृषी विभागाला व्हॉटस्अॅपवर कळवावे, असे आवाहन जिल्हा कृषी अधीक्षक दत्तात्रय गवसाने यांनी केले.
गवसाने म्हणाले, कृषी निविष्ठा खरेदी करतेवेळेस ज्यादा दराने विक्री करणे, खरेदीची पावती न देणे, एका निविष्ठा सोबत दुसरी निविष्ठा खरेदीसाठी सक्ती करणे, (लिकिंग) निविष्ठा उपलब्ध असतानाही विक्री न करणे असे प्रकार घडतात. काही ठिकाणी मुदतबाह्य निविष्ठा विक्री केल्या जातात.
या तक्रारींचा निपटारा करण्यासाठीकृषी विभागाचा जिल्हास्तरावर ७२१९२८६९२८ हा व्हॉटस्अॅप नंबर सुरु करण्यात आला आहे.
शेतकऱ्यांना अडचणी आल्यास त्यांनी नमूद व्हॉटस्अॅप नंबर वरती आपल्याकडील ठोस पुराव्यासह तक्रार करावी. त्यावर शहानिशा करुन आवश्यक ती कारवाई करण्यात येईल असेही अधीक्षक कृषी अधिकारी दत्तात्रय गावसाने यांनी कळविले आहे.
नावे गोपनीय राहणार
कृषी आयुक्तालय स्तरावर तक्रार निवारण कक्षही स्थापन करण्यात आला आहे. हा कक्ष २४ तास कार्यरत आहे. तसेच शेतकरी आपली तक्रार controlroom.qc.maharashtra @gmail.com या ईमेल पत्त्यावर देखील करु शकतात. तक्रार करणाऱ्या व्यक्तींची नावे गोपनीय ठेवण्यात येणार आहे.
अशाच महत्वपूर्ण बातम्या आणि माहीती मनोरंजन मिळवा तुमच्या व्हॉट्सअँप ग्रूपमध्ये, त्यासाठी पुढील नंबर तुमच्या ग्रुपमध्ये समाविष्ट करा – 9970766262
“मंगळवेढा टाईम्स”च्या बातम्या मिळविण्यासाठी 9970766262 हा नंबर तुमच्या व्हॉट्सऍपवर ग्रुपवर ऍड करून फक्त एक मेसेज करा.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी Mangalwedha Times वर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट मंगळवेढा टाईम्स
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज