टीम मंगळवेढा टाईम्स । राज्यातील ज्या शेतकऱ्यांना अद्याप प्रधानमंत्री शेतकरी सन्मान योजनेचा लाभ मिळाला नाही, त्यांच्यासाठी 5 ऑगस्टपर्यंत विशेष मोहीम राबवून लाभार्थ्यांच्या माहितीतील त्रुटी दुरुस्ती करावी व नवीन लाभार्थ्यांची नोंदणी करावी, असं आवाहन कृषिमंत्री दादाजी भुसे यांनी केले आहे.
या योजनेंतर्गत राज्यातील 91 लाख 13 हजार शेतकऱ्यांना लाभ मिळाला असून त्यांच्या खात्यात पाच हप्त्यात 6 हजार 949 कोटी रुपये जमा करण्यात आले आहेत. Thackeray government’s special campaign for farmers till 5th August, will get the benefit of Shetkari Sanman Nidhi
प्रधानमंत्री शेतकरी सन्मान योजनेचा राज्यातील ९१ लाख १३ हजार शेतकऱ्यांना लाभ. या योजनेचा अद्याप लाभ मिळाला नसलेल्या शेतकऱ्यांसाठी आजपासून ५ ऑगस्टपर्यंत विशेष मोहीम. यात लाभार्थ्यांच्या माहितीतील त्रुटी दुरुस्त करण्यासह नवीन लाभार्थ्यांची नोंदणी केली जाणार- कृषीमंत्री @dadajibhuse pic.twitter.com/Gwy9kg99f2
— MAHARASHTRA DGIPR (@MahaDGIPR) July 23, 2020
जास्तीत जास्त शेतकऱ्यांना प्रधानमंत्री शेतकरी सन्मान योजनेचा लाभ घ्यावा यासाठी सरकारचे प्रयत्न सुरु आहेत. अद्याप या योजनेचा ज्यांनी लाभ घेतला नाही, त्यासाठी महाराष्ट्र सरकार विशेष मोहीम राबविणार आहे.पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शेतकऱ्यांसाठी महत्त्वकांक्षी योजना राबवली. यामध्ये शेतकऱ्यांना वर्षाला सहा हजार रुपये दिले जातात. बँकेच्या खात्यात तीन हप्त्यात ही रक्कम जमा होते. याचा लाभ ज्यांनी घेतला नाही. त्यांच्यासाठी राज्य सरकार 5 ऑगस्टपर्यंत विशेष मोहीम राबविणार आहे.
यामध्ये ज्या लाभार्थ्यांच्या माहितीतील त्रुटी दुरुस्ती करावी व नवीन लाभार्थ्यांची नोंदणी करावी, असं आवाहन कृषिमंत्री दादाजी भुसे यांनी केले आहे.यासंदर्भाती त्यांनी ट्विट केले आहे. या योजनेंतर्गत राज्यातील 91 लाख 13 हजार शेतकऱ्यांना लाभ मिळाला असून त्यांच्या खात्यात पाच हप्त्यात 6 हजार 949 कोटी रुपये जमा करण्यात आले आहेत.
राज्यातील जे शेतकरी प्रधानमंत्री शेतकरी सन्मान निधी योजनेपासून वंचित आहेत. त्याचा आढावा घेण्यासाठी कृषिमंत्र्यांनी नुकतीच आढावा बैठक घेतली. कृषी विभागाचे सचिव एकनाथ डवले, कृषी सहसंचालक यावेळी उपस्थित होते.
राज्यात 1 कोटी 52 लाख शेतकरी आहेत. या योजनेंतर्गत आतापर्यंत 1 कोटी 4 लाख शेतकऱ्यांची नोंदणी झाली आहे. मात्र काही लाभार्थ्यांच्या माहितीमध्ये त्रुटी आढळून आल्याने त्यांना योजनेचा लाभ मिळत नाही.
————————-
???? राज्यातील व देशातील ब्रेकिंग बातम्या आणि माहिती सर्वात प्रथम तुमच्या पर्यंत .आजच Add करा तुमच्या Whatsapp ग्रुपवर 95 6161 7373 हा आमचा नंबर.
ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 95 6161 7373 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Mangalwedha Times News”
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज