मंगळवेढा टाईम्स न्युज नेटवर्क ।
सोलापूर-मंगळवेढा महामार्गावर वाघोली ता. मोहोळ येथे सकाळी ८:३० वाजता झालेल्या चारचाकी वाहनाच्या अपघातात पती जागीच ठार झाला असून पत्नी जखमी झाली आहे.
चेतन राजेंद्र आवताडे (वय २५ वर्ष रा. विरवडे बुद्रुक) असे अपघातात मयत झालेल्या तरुणाचे नाव आहे. चैताली चेतन आवताडे असे जखमीचे नाव आहे.
प्रथमदर्शी माहितीनुसार चेतन आवताडे हे वाघोली येथून दुचाकी क्रमांक एमएच १३ डीझेड ३४०१ वर त्यांची पत्नी चैताली आवताडे यांना घेऊन कामतीकडे निघाले होते. वाघोली सुतमील जवळ आले असता मंगळवेढा वरून येणाऱ्या चारचाकी क्रमांक एमएच ०१ एएच ४४७२ हिने दुचाकीला पाठीमागून जोराची धडक दिली.
धडक एवढी जोराची होती की, समोर रस्त्याच्याकडेला उभारलेल्या आयशर ट्रक क्रमांक एमएच ०२ ईआर ३७९२ खाली फरपटत गेला. त्यांची दुचाकी रस्त्याच्या कडेला खड्ड्यात जाऊन पडली तर पत्नीच्या डोक्याला मार लागून खाली पडली.
या अपघातात चेतन अवताडे हे जागीच मयत झाले. कामती पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन जखमीला दवाखान्यात पाठवले. राष्ट्रीय महामार्ग देखभाल टीमने रस्त्यावरील वाहनांना बाजूला सरकवून वाहतूक सुरळीत चालू केली. कामती पोलिसांनी तिन्ही वाहने ताब्यात घेतली आहेत.
मालट्रकला खासगी बसची जोरात धडक
कांदा घेऊन निघालेल्या मालट्रकला खासगी बसने पाठीमागून जोराची धडक दिली. यात बसचालक गंभीर जखमी झाला असून, बसचे ९५ हजारांचे नुकसान झाले. हा अपघात शनिवार, १० ऑगस्ट रोजी पहाटे साडेतीन वाजेच्या सुमारास बोरामणी गावाच्या शिवारात घडला.
१० ऑगस्ट रोजी पहाटे साडेतीन वाजेच्या सुमारास बोरामणी (ता. द. सोलापूर) गावाच्या शिवारातील कीर्ती गोल्ड कंपनीच्या समोर खासगी बसने (क्र. एआर ०१ यू ०३३३) पुढे चालणाऱ्या १६ चाकी मालट्रकला (क्र. केए ५६-७४६३) पाठीमागून जोराची धडक दिली.
यात ट्रकच्या संरक्षण लोखंडी जाळी व कांद्याचे नुकसान झाले, तर खासगी बसचे संपूर्ण शो, रेडिएटर, हेडलाइट, बंपर आदी ९५ हजारांचे नुकसान झाले. अपघातात बसचालक महेश पुंडलिक पन्ने हा जखमी झाला आहे.
भीमराव देवीदास गाडे (वय ४१, रा.चिंचोळी सयाखान, ता. निलंगा, जि. लातूर) यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार बसचालक महेश पन्ने (वय ३८, रा. बसवकल्याण, जि. बिदर, कर्नाटक) याच्याविरोधात सोलापूर तालुका पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
माहिती मिळाल्यानंतर सहायक पोलिस उपनिरीक्षक अत्तार यांनी घटनास्थळाला भेट दिली. सोलापूर तालुका पोलिस ठाण्यात नोंद झाली आहे.
अशाच महत्वपूर्ण बातम्या आणि माहीती मनोरंजन मिळवा तुमच्या व्हॉट्सअँप ग्रूपमध्ये, त्यासाठी पुढील नंबर तुमच्या ग्रुपमध्ये समाविष्ट करा – 9970766262
“मंगळवेढा टाईम्स”च्या बातम्या मिळविण्यासाठी 9970766262 हा नंबर तुमच्या व्हॉट्सऍपवर ग्रुपवर ऍड करून फक्त एक मेसेज करा.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी Mangalwedha Times वर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट मंगळवेढा टाईम्स.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज