टीम मंगळवेढा टाईम्स ।
मंगळवेढा तालुक्यातील भोसे ग्रामपंचायतीच्या निवडणुकीच्या आखाड्यातील चौदा उमेदवारांचे अर्ज विविध हरकती घेता अपात्र करण्यात आले.परंतु हरकती साठी जोडलेल्या दाखल्या प्रकरणी तहसीलदार स्वप्नील रावडे यांनी फौजदारी गुन्हा दाखल करण्याचे आदेश गटविकास अधिकाऱ्यांना दिले आहेत.
भोसे ग्रामपंचायत साठी 5 प्रभागातून 57 उमेदवारी अर्ज दाखल झाले.सदर उमेदवाराकडे शौचालय आहे.तशी नोंद ग्रामपंचायतीकडे आहे.तरीही छाननीच्या वेळी पाच प्रभागातील प्रभाग एक मध्ये 3, 2 मध्ये 4, प्रभाग 3 मध्ये 1, प्रभाग 4 मध्ये 4, आणि प्रभाग पाच मधील 6 इतक्या उमेदवारांना अर्जाला हरकत घेण्यात आली.
हरकती मधील काही उमेदवाराकडे घेरडी ता.सांगोला येथे शौचालय आहे परंतु भोसे येथे शौचालय नाही व काही उमेदवारांनी ग्रामपंचायतीकडे ठेकेदारी स्वरूपाचे काम केल्याचे पुरावे म्हणून ग्रामसेवकांचे दाखले जोडण्यात आले.
या ग्रामपंचायतीकडे दोन ग्रामसेवकांनी कामकाज केले असून संबंधित ग्रामसेवकांनी दाखल्याबाबत हात वर केल्यामुळे हरकतीसाठी घेतलेले देखले नेमके दाखले कुणाच्या सहीचे हा प्रश्न अपात्र उमेदवारांना छाणणी दरम्यान पडला.
दरम्यान याबाबत हरकती साठीचे ग्रामसेवकासोबत झालेले फोन रॅकार्ड व व्हाटसअपवर टाकलेले मेसेजचे पुरावे तहसीलदारांना दाखवण्यात आले.
परंतु हरकती ची वेळ निघून गेल्यामुळे सदरचे पुरावे फेटाळण्यात आल्यानंतर मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल करण्यात आली. न्यायालयाने चौकशी आदेश दिल्यानंतर याबाबत चौकशी करण्यात आली.
प्रभारी ग्रामसेवक दत्तात्रय इंगोले यांनी आपण दाखले दिले नसल्याचा अहवाल 5 जानेवारी दिला. होता. सदरच्या बनावट दाखल्याप्रकरणी ग्रामसेवका मार्फत गुन्हा दाखल करण्याचे आदेश तहसीलदार यांनी दिले.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज