टीम मंगळवेढा टाईम्स।
मंगळवेढयातील माध्यमिक शिक्षक लक्ष्मण मनोहर हेंबाडे यांनी आपल्याला संस्थेकडून दरमहा पगारातून 15 हजार रुपयांची मागणी केली जात असून रक्कम न दिल्यास नोकरीवरून काढून टाकण्याची व जीवे मारण्याची ही धमकी तसेच लाथाबुक्क्यंानी मारहाण केल्याची लेखी तक्रार
मंगळवेढा पोलिसांकडे केल्यामुळे रात्री उशीरापर्यंत संस्थेतील पदाधिकारी व शिक्षकांचे जाब जबाब नोंदविण्याचे काम सुरु होते. वदरम्यान या घटनेमुळे शैक्षणिक क्षेत्रामध्ये एकच खळबळ उडाली आहे.
हेंबाडे यांनी दिलेल्या तक्रारी अर्जामध्ये म्हटले आहे की, मी ज्या संस्थेत काम करतो त्या संस्थेचे सदस्य व मुख्याध्यापक हे शाळेतील कर्मचार्यांकडून शाळा सुधार योजनेच्या नावाखाली वर्गणी प्रतिमहिना 15 हजार घेतात.
पैसे देण्यास नकार दिल्यास कर्मचार्याला लक्ष्य करून त्रास दिला जात आहेे. शाळेतील शिक्षक व शिक्षकेतर कर्मचार्यांवर संस्थेतील संचालकांची प्रचंड दहशत आहे. ते नेहमी मनमानी करतात.
तसेच वास्तविक पाहता संस्थेस शालेय वेतनावर अनुदान शासनाकडून नियमितपणे मिळत आहे. तरीसुध्दा शिक्षक कर्मचार्याकडून पैसे घेत असल्याचा दिलेल्या तक्रारीत हेंबाडे यंानी आरोप केला आहे.
दि.9 मे रोजी सकाळी 10.48 वा. हेंबाडे हे शाळेत गेल्यावर मुख्याध्यापकांनी शिपायामार्फत बोलावले. यावेळी तेथे तीन इसम बसले होते. त्यांनी अर्वाच्च भाषेत शिवीगाळ करून तक्रारदार हेंबाडे यांच्या थोबाडीत मारून लाथाबुक्क्यंानी मारहाण केल्याचे तक्रारीत म्हटले असून
यावेळी हेंबाडे यांनी शर्टाच्या वरील खिशात मोबाईल रेकॉर्डीग ऑन केल्याने सर्व घटना चित्रीत झाली आहे.
15 हजार रुपये मागितल्याचा मोबाईलवरील मेसेज प्रिंटचा पुरावा पोलिस प्रशासनास दिला आहे.
दरम्यान आज बुधवार दि.11 रोजी संध्याकाळी 7.30 वाजता संस्थेतील पदाधिकारी व सर्व शिक्षकांना जबाबासाठी पोलिसांनी बोलावून घेवून चौकशीला गती दिली आहे. ही चौकशी रात्री उशीरापर्यंत सुरु होती.
चौकशी सुरु, संपूर्ण चौकशी झाल्यानंतर कारवाई
लक्ष्मण हेंबाडे या शिक्षकाचा दरमहा पगारीतून पैसे मागत असल्याचा तक्रारी अर्ज प्राप्त झाला असून याची चौकशी सुरु आहे.संपूर्ण चौकशी झाल्यानंतर योग्य ती कारवाई केली जाईल.
-रणजित माने,पोलिस निरिक्षक,मंगळवेढा.
तक्रारीत तथ्य नाही
सदर तक्रारदाराचे मानसिक संतुलन बिघडले आहे, केलेल्या तक्रारीमध्ये काहीही तथ्य नाही. -बाबासाहेब रेड्डी, मुख्याध्यापक, लक्ष्मी दहिवडी
अशाच महत्वपूर्ण बातम्या आणि माहीती मनोरंजन मिळवा तुमच्या व्हॉट्सअँप ग्रूपमध्ये, त्यासाठी पुढील नंबर तुमच्या ग्रुपमध्ये समाविष्ट करा – 9970766262
“मंगळवेढा टाईम्स”च्या बातम्या मिळविण्यासाठी 9970766262 हा नंबर तुमच्या व्हॉट्सऍपवर ग्रुपवर ऍड करून फक्त एक मेसेज करा.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज