mangalwedhatimes.in
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • सोलापूर
  • मंगळवेढा
  • राजकारण
  • क्राईम
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • सोलापूर
  • मंगळवेढा
  • राजकारण
  • क्राईम
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
No Result
View All Result
Mangalwedha Times
No Result
View All Result

तलाठी सुरज नळे याला चार दिवसाची पोलीस कोठडी; चाैकशीत बडा मासा गळाला लागण्याची शक्यता; शेतकर्‍यांना न्याय मिळणार?

टीम 'मंगळवेढा टाईम्स' by टीम 'मंगळवेढा टाईम्स'
April 2, 2023
in क्राईम, मंगळवेढा
एक लाख रुपयांची लाच स्वीकारताना मंगळवेढ्यातील तत्कालीन मंडळअधिकारी रंगेहाथ सापडला

टीम मंगळवेढा टाईम्स ।

सोलापूर-सांगली राष्ट्रीय महामार्ग क्र.166 मध्ये बाधीत झालेल्या पाईपलाईनची मंजूर रक्कम 1 लाख 43 हजार 794 रुपये शेतकर्‍याला देण्यासाठी सात हजाराची लाचेची रक्कम घेवून फरार झालेला आरोपी तथा तलाठी सुरज रंगनाथ नळे अखेर तो लाचलुचपत पथकाला शरण आला आहे.

दरम्यान पोलीसांनी त्याला अटक करुन पंढरपूर येथील जिल्हा सत्र न्यायालयापुढे उभे केले असता चार दिवसाची पोलीस कोठडी सुनावली आहे.

या घटनेची हकीकत अशी, यातील फिर्यादी हे बाधीत शेतकरी असून कमलापूर हद्दीतील गट नं.52 मधून सोलापूर-सांगली राष्ट्रीय महामार्ग केला आहे.

सदर जमीनीमध्ये असलेली पाईपलाईन बाधीत झाल्याने 1 लाख 43 हजार 794 रुपये इतकी मंजूर रक्कम झाली होती.

ही रक्कम देण्यासाठी दलाल तथा झीरो कर्मचारी पंकज महादेव चव्हाण (रा.शेलेवाडी) याच्या मार्फत सात हजाराची लाच मागून ती स्वीकारुन लाचलुचपतच्या पथकाला पाहताच

आरोपी सुरज नळे याने दि. 29 रोजी रात्री 10.15 वाजता फिल्मीस्टाईलने चार चाकी वाहनातून पलायन केले होते.

पथकाने कामती पोलीस स्टेशनच्या हद्दीपर्यंत पाठलाग केल्यानंतर आरोपीने गाडी सोडून अंधाराचा फायदा घेत फरार झाला होता. पोलीसांनी झीरो कर्मचार्‍याला यापुर्वीच अटक केली आहे.

तलाठी आरोपीची गाडी ही पोलीसांनी जप्त केली होती. अखेर तलाठी आरोपी याने नांगी टाकत पथकाच्या समोर दि.1 एप्रिल रोजी हजर झाला. तपासीक अंमलदार तथा पोलीस निरीक्षक उमेश महाडीक यांनी पंढरपूर जिल्हा सत्र न्यायालयात उभे केले असता आरोपी नळे यास चार दिवसाची पोलीस कोठडी सुनावली आहे.

प्रांत कार्यालय हे भ्रष्टाचाराच्या विळख्यात अडकले असून बाधीत झालेल्या शेतकर्‍यांना मंजूर रक्कमा देण्यासाठी टक्केवारीत पैसे वसूल करुन शेतकर्‍यांचा छळ केला जात असल्याच्या यापुर्वी अनेक तक्रारी असतानाही जिल्हा प्रशासनातील वरिष्ठ अधिकार्‍यांनी याकडे सोयीस्करपणे डोळेझाक केल्यानेच आजचा प्रसंग उद्भवला आहे.

राष्ट्रीय महामार्गाच्या बाधीत शेतकर्‍यांकडून लाखो रुपयांच्या रक्कमा उखळल्या असल्याची खमंग चर्चा असून वरिष्ठ अधिकार्‍यांचीही चौकशी लाचलुचपत विभागाने करुन शेतकर्‍यांना न्याय द्यावा अशी मागणी आहे.

दरम्यान गैरमार्गाने अमाप संपत्ती अधिकार्‍यांनी कमावल्यामुळे सीआयडी खात्यामार्फत चौकशी होवून संबंधीत अधिकार्‍यांना बडतर्फ करावे अशी मागणी सुज्ञ व ज्येष्ठ नागरिकांमधून होत आहे.

यापुर्वी येथील भ्रष्टाचाराला वाचा फोडण्यासाठी शेतकर्‍यांनी तब्बल 28 दिवस उपोषण व महामार्गावर आंदोलन केले होते. एवढे करुनही जिल्हा प्रशासनाला जाग न आल्यामुळे भ्रष्टाचाराचा काळ सोकावला गेला असल्याचा आरोप जनतेमधून होत आहे.

लाचलुचपतच्या पडलेल्या धाडीमुळे प्रांत कार्यालयात सन्नाटा पसरला असून यात बडे मासे ही अडकण्याची शक्यता वर्तविली जात आहे.

अशाच महत्वपूर्ण बातम्या आणि माहीती मनोरंजन मिळवा तुमच्या व्हॉट्सअँप ग्रूपमध्ये, त्यासाठी पुढील नंबर तुमच्या ग्रुपमध्ये समाविष्ट करा – 9970766262

“मंगळवेढा टाईम्स”च्या बातम्या मिळविण्यासाठी 9970766262 हा नंबर तुमच्या व्हॉट्सऍपवर ग्रुपवर ऍड करून फक्त एक मेसेज करा.

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.

ताज्या बातम्या थेट मोबाईलवर मिळवण्यासाठी आजच जॉईन व्हा

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज

Tags: पोलीस कोठडीसुरज नळे

संबंधित बातम्या

धक्कादायक! सोलापुरात गेल्या २४ तासांत खुनाच्या तीन घटना; १६ महिन्यांच्या मुलाचा आईकडून खून

दारूचे व्यसन ठरले आईच्या जीवावर; पैसे न दिल्याने पोटच्या मुलाने आईला संपवले, आरोपी गजाआड

September 1, 2026
राजकीय घडामोड! मंगळवेढा नगरपालिका नगराध्यक्ष पदासाठी भाजपकडून ‘या’ नावाची चर्चा; राष्ट्रवादी स्वबळावर लढणार?

अतिक्रमणधारकांचे धाबे दणाणले! मंगळवेढ्यात लवकरच फिरणार ‘बुलडोझर’; जिल्हाधिकाऱ्यांचे कडक आदेश; ‘या’ चौकात होणार कारवाई

August 31, 2026
​स्मृतीवंदन! स्व.सुभाषराव शहा यांच्या स्मृतींना ‘सेवाकार्याने’ अभिवादन; १४ व्या पुण्यस्मरणानिमित्त विविध उपक्रम

रतनचंद शहा बँकेचे माजी चेअरमन स्व. सुभाषराव शहा यांची आज ८२ वी जयंती; मंगळवेढ्यात विविध कार्यक्रमांचे आयोजन

August 31, 2026
कै.भगवानराव भाकरे यांच्या पुण्यस्मरणाचे औचित्य साधून ‘सायकल बँक’ उपक्रम सुरु; आज विविध सामाजिक कार्यक्रमाचे आयोजन

मंगळवेढा पंचायत समितीचे माजी सभापती कै.भगवानराव भाकरे यांच्या पुण्यस्मरणानिमित्त वृद्धाश्रमात ‘मिष्टान्न भोजनाचे’ आयोजन; सामाजिक बांधिलकीचा अनोखा आदर्श

August 31, 2026
नवी तारीख शाळेची घंटा वाजण्याची! शाळा कधी सुरू होणार? शिक्षणमंत्र्यांनी दिले संकेत

साप चावला तर जबाबदार कोण? मंगळवेढा तालुक्यातील ‘या’ शाळेतील धोकादायक इमारतीच्या अवशेषांवरून पालकांचा प्रशासनाला थेट सवाल

August 30, 2026
धर्मगावच्या शिरपेचात मानाचा तुरा! बहुजन साहित्य संघाच्या राज्य संमेलनात कै. बाबुराव जाधव विद्यालयाला आदर्श शाळा पुरस्कार

धर्मगावच्या शिरपेचात मानाचा तुरा! बहुजन साहित्य संघाच्या राज्य संमेलनात कै. बाबुराव जाधव विद्यालयाला आदर्श शाळा पुरस्कार

August 30, 2026
Breaking! मंगळवेढा तालुक्यातील वृद्धाने चिठ्ठी लिहून संपविले जीवन; मुलाविरोधात गुन्हा दाखल धक्कादायक कारण आले समोर..?

राखी पौर्णिमेच्या दिवशीच काळाचा घाला: बहिणीकडे राखी बांधण्यासाठी गेलेल्या भावाचा भीषण अपघातात मृत्यू; मंगळवेढा तालुक्यातील ‘या’ गावावर शोककळा

August 29, 2026
खास योजना! फक्त 90 दिवसांसाठी 9 टक्के सर्वाधिक व्याजदर; विठाई परिवार अर्बन बँकेची नवरात्रोत्सवानिमित्त घोषणा

विठाई परिवार बँकेचा उद्या तिसरा वर्धापन दिन; अवघ्या ३ वर्षांत १५० कोटींच्या व्यवसायाचा टप्पा पूर्ण; मोफत आरोग्य तपासणी आणि महिलांसाठी रक्षाबंधन विशेष ठेव योजना जाहीर

August 27, 2026
ग्रामपंचायतीची भराल बिले तर मिळतील बक्षिसे; करवसुलीसाठी मंगळवेढा तालुक्यातील ‘या’ गावात अफलातून योजना

काम कागदावर, पैसे खिशात! ‘या’ गावात बोगस बिले काढून लाखोंचा अपहार; मंगळवेढा BDO कडे तक्रार दाखल

August 27, 2026
Next Post
धक्कादायक! मंगळवेढ्यातील विवाहित महिलेला पळवून नेवून केला बलात्कार; आरोपीला अटक

संतापजनक! पती बाहेरगावी गेल्याची संधी साधून विवाहित महिलेचा केला विनयभंग; एकाविरूध्द गुन्हा दाखल

ताज्या बातम्या

महसूल पंधरवाडा अंतर्गत आज बोराळे येथे शेती, पाऊस व दाखले मार्गदर्शन कार्यक्रम; शेती समस्या व उपाय, पावसाची अनियमितता, शेतकऱ्यांना देण्यात येणारे वेगवेगळे दाखले या विषयावर सखोल मार्गदर्शन

शेतकऱ्यांना मोठा दिलासा! मोबाईलवरील ई-पीक पाहणीची डोकेदुखी मिटली; महसूल यंत्रणेवर जबाबदारी

September 1, 2026
धक्कादायक! सोलापुरात गेल्या २४ तासांत खुनाच्या तीन घटना; १६ महिन्यांच्या मुलाचा आईकडून खून

दारूचे व्यसन ठरले आईच्या जीवावर; पैसे न दिल्याने पोटच्या मुलाने आईला संपवले, आरोपी गजाआड

September 1, 2026
राजकीय घडामोड! मंगळवेढा नगरपालिका नगराध्यक्ष पदासाठी भाजपकडून ‘या’ नावाची चर्चा; राष्ट्रवादी स्वबळावर लढणार?

अतिक्रमणधारकांचे धाबे दणाणले! मंगळवेढ्यात लवकरच फिरणार ‘बुलडोझर’; जिल्हाधिकाऱ्यांचे कडक आदेश; ‘या’ चौकात होणार कारवाई

August 31, 2026

जमीन मालकांसाठी मोठी खूशखबर! वारंवार मोजणीच्या त्रासातून अन् खर्चातून मुक्तता; शासकीय कार्यालयांमध्ये पुन्हा मोजणीची अट रद्द

August 31, 2026
​स्मृतीवंदन! स्व.सुभाषराव शहा यांच्या स्मृतींना ‘सेवाकार्याने’ अभिवादन; १४ व्या पुण्यस्मरणानिमित्त विविध उपक्रम

रतनचंद शहा बँकेचे माजी चेअरमन स्व. सुभाषराव शहा यांची आज ८२ वी जयंती; मंगळवेढ्यात विविध कार्यक्रमांचे आयोजन

August 31, 2026
कै.भगवानराव भाकरे यांच्या पुण्यस्मरणाचे औचित्य साधून ‘सायकल बँक’ उपक्रम सुरु; आज विविध सामाजिक कार्यक्रमाचे आयोजन

मंगळवेढा पंचायत समितीचे माजी सभापती कै.भगवानराव भाकरे यांच्या पुण्यस्मरणानिमित्त वृद्धाश्रमात ‘मिष्टान्न भोजनाचे’ आयोजन; सामाजिक बांधिलकीचा अनोखा आदर्श

August 31, 2026
mangalwedhatimes.in

प्रिंट,टीव्ही मीडियानंतर सध्या डिजिटल मीडियाचं महत्व प्रचंड वाढलंय. येणाऱ्या काळात या माध्यमाचं महत्व आणि व्याप्ती आणखी वाढणार असल्यानं . आम्ही हा नवीन बदल स्वीकारून 'मंगळवेढा टाईम्स' या सोशल मीडियाच्या फेसबुक पेजचे रूपांतर वेब मीडिया मध्ये करून 'मंगळवेढा टाईम्स' या नावाने न्युजचे वेब पोर्टल आपल्या सेवेत दाखल झालय. येथे आपण आपल्या स्मार्टफोन, कॉम्पुटर वरून देश विदेशातील घडामोडी तसेच स्थानिक, व्यापार, ग्रामीण, सांस्कृतिक, उद्योग, कृषी, मनोरंजन, तंत्रज्ञान, शिक्षण अश्या विविध श्येत्रांतील बातम्या घरबसल्या वाचू शकता. स्मार्टफोन, सोशल मीडियाच्या माध्यमातून बातम्या पाहण्यात लोकांचा कल वाढतोय, म्हणूनच आम्ही बदलतोय.

© 2020 Website Maintained by Tushar Bhambare..

No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • सोलापूर
  • मंगळवेढा
  • राजकारण
  • क्राईम
  • मनोरंजन
  • शैक्षणिक

© 2020 Website Maintained by Tushar Bhambare..

ताज्या बातम्या थेट मोबाईलवर मिळवण्यासाठी आजच जॉईन व्हा