टीम मंगळवेढा टाईम्स।
सांगली- सोलापूर राष्ट्रीय महामार्गात बाधित झालेल्या पाईपलाईनची मंजूर रक्कम देण्यासाठी 7 हजार रुपयांची लाच स्विकारल्या प्रकरणातील आरोपी तथा तलाठी सुरज रंगनाथ नळे व झिरो कर्मचारी पंकज चव्हाण या दोघांचा जामीन अर्ज पंढरपूर जिल्हा सत्र न्यायालयाचे न्यायाधीश लंबे यांनी फेंटाळला आहे.
या घटनेची हकिकत अशी, यातील फिर्यादी तथा तक्रारदार यांची कमलापूर हद्दीतील गट क्र.52 मधून सांगली-सोलापूर राष्ट्रीय महामार्ग गेल्याने नुकसान भरपाईपोटी 1 लाख 43 हजार 794 रुपये मंजूर झाले होते.
ही रक्कम देण्यासाठी झिरो कर्मचारी तथा दलाल पंकज चव्हाण (रा.शेलेवाडी) याच्यामार्फत 7 हजार रुपये लाचेची मागणी केली होती. ती रक्कम तलाठी सुरज नळे यांनी स्विकारून सरकारी कामात अडथळा आणत चार चाकी वाहनातून लाच लुचपत पथकाला पाहताच पलायन केले होते.
आरोपीला प्रथमतः चार दिवसाची व व्दितीय वेळेस एक दिवसाची अशी पाच दिवसाची पोलिस कोठडी न्यायालयाने दिली होती.
त्याची मुदत संपल्यानंतर न्यायालयाने 14 दिवसाची न्यायालयीन कोठडी दिल्याने मुदत संपल्याने तलाठी आरोपी व झिरो कर्मचारी या दोघांनी जामीनसाठी अर्ज दाखल केला होता.
सरकार पक्षाच्यावतीने अॅड.सारंग वांगीकर यांनी आरोपी हा पैसे घेवून फरार झाला होता.
तसेच जामीन मिळाल्यावर दबाव आणण्याची शक्यता असल्याने त्याचा जामीन मंजूर करू नये तसेच तपास अधिकारी पोलिस निरिक्षक महाडिक यांनीही तपास भक्कम पध्दतीने करून न्यायालयापुढे सबळ पुरावे मांडल्यामुळे
सरकारी वकिल व तपास अधिकारी तसेच फिर्यादीचे वकिल अॅड.दिपक माने, अॅड.सुहास कदम, अॅड.विजय बेंदगुडे, अॅड.सुमीतसाळुंखे, अॅड.शक्तीमान माने, अॅड.अमोल आवताडे यांनी बाजू मांडल्याने दोन्ही आरोपींचा जामीन अर्ज फेटाळून लावला. आरोपीच्यावतीने अॅड.निलेश जोशी यांनी काम पाहिले.
अशाच महत्वपूर्ण बातम्या आणि माहीती मनोरंजन मिळवा तुमच्या व्हॉट्सअँप ग्रूपमध्ये, त्यासाठी पुढील नंबर तुमच्या ग्रुपमध्ये समाविष्ट करा – 9970766262
“मंगळवेढा टाईम्स”च्या बातम्या मिळविण्यासाठी 9970766262 हा नंबर तुमच्या व्हॉट्सऍपवर ग्रुपवर ऍड करून फक्त एक मेसेज करा.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी Mangalwedha Times वर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट मंगळवेढा टाईम्स.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज