mangalwedhatimes.in
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • सोलापूर
  • मंगळवेढा
  • राजकारण
  • क्राईम
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • सोलापूर
  • मंगळवेढा
  • राजकारण
  • क्राईम
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
No Result
View All Result
Mangalwedha Times
No Result
View All Result

कौतुकास्पद! साताराच्या कर्मवीर भाऊराव पाटील विद्यापीठाच्या ‘प्रथम कुलसचिव’ पदी मंगळवेढ्याच्या सुपुत्राची निवड

टीम 'मंगळवेढा टाईम्स' by टीम 'मंगळवेढा टाईम्स'
November 6, 2022
in मंगळवेढा, राज्य, सोलापूर
कौतुकास्पद! साताराच्या कर्मवीर भाऊराव पाटील विद्यापीठाच्या ‘प्रथम कुलसचिव’ पदी मंगळवेढ्याच्या सुपुत्राची निवड

टीम मंगळवेढा टाईम्स ।

महाराष्ट्र शासन, राष्ट्रीय उच्चतर शिक्षा अभियान भारत सरकार आणि रयत शिक्षण संस्थेच्या माध्यमातून सुरू झालेल्या कर्मवीर भाऊराव पाटील यांच्या स्वप्नातील

ग्रामीण विद्यापीठाच्या धर्तीवर सातारा येथे कर्मवीर भाऊराव पाटील विद्यापीठ स्थापन झाले असून या विद्यापीठाच्या प्रथम कुलसचिव पदी धनंजयराव गाडगीळ वाणिज्य महाविद्यालय सातारा येथील बँक मॅनेजमेंट विभागाचे विभाग प्रमुख डॉ.विजय कुंभार यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे.

दि.३ नोव्हेंबर 2022 रोजी प्रा. डॉ. डी टी शिर्के यांनी या विद्यापीठाच्या प्रथम कुलगुरू पदाचा कार्यभार  स्वीकारल्यानंतर महाराष्ट्र विद्यापीठ कायदा व कर्मवीर भाऊराव पाटील विद्यापीठ सातारा

अधिसूचना 2021 नुसार या विद्यापीठाचे प्रथम कुलसचिव म्हणून महत्त्वाची जबाबदारी डॉ. कुंभार यांचेवर सोपवलेली आहे.

कुंभार हे रयत शिक्षण संस्थेत सन 2005 पासून अर्थशास्त्र व बँकिंग विषयाचे अधिव्याख्याता व सहाय्यक प्राध्यापक  म्हणून कार्य केलेले असून सन 2013 पासून ते बँक मॅनेजमेंट विभागाचे विभाग प्रमुख म्हणून कार्यरत आहेत.

त्यानी सन 2011 मध्ये ख्यातनाम अर्थतज्ञ प्रा.डॉ.वसंतराव जुगळे यांचे मार्गदर्शनाखाली शिवाजी विद्यापीठातून इलेक्ट्रॉनिक बँकिंग व कस्टमर्स सॅटिस्फॅक्शन या विषयातून पीएचडी ही पदवी संपादित केलेली आहे,

ते एक उत्तम संशोधक व लेखक असून त्यांचे राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय पातळीवरील विविध संशोधन विषयक जर्नल्स मधून 68 शोधनिबंध प्रकाशित झालेले आहेत.

डॉ.कुंभार हे 12 क्रमिक पुस्तके व 3 संदर्भ ग्रंथ आणि 50 पेक्षा अधिक स्वयंअध्ययन पुस्तिकेचे लेखक असून त्यांचा उत्कृष्ट संशोधक म्हणून अनेक वेळा गुणगौरव झालेला आहे.

एडी सायंटिफिक वर्ल्ड सायंटिस्ट रँकिंग मध्ये सलग 2021 व 2022 मध्ये उत्कृष्ट संशोधकांमध्ये त्यांचा समावेश करण्यात आलेला आहे.

डॉ. कुंभार यांचे मल्टी बँक डेबिट कार्ड हे पेटंट पब्लिश झालेले असून लवकरच त्यास भारत सरकारच्या पेटंट ऑफिस कडून मान्यता मिळेल अशी अपेक्षा आहे.

सन 2015 ते 2022 या कालावधीत दि रयत सेवक को-ऑपरेटिव्ह बँक लिमिटेड सातारा या पगारदार नोकरांच्या सहकारी बँकेचे 2 वर्षे चेअरमन आणि 5 वर्षे संचालक म्हणून देखील त्यांनी महत्त्वाचे योगदान दिलेले आहे.

या बँकेचे संगणकीकरण व ग्राहक सेवा सुधारणांमध्ये डॉ. कुंभार यांचे योगदान आहे. डॉ कुंभार हे रयत शिक्षण संस्थेच्या स्किल डेव्हलपमेंट विभागाचे सहाय्यक समन्वयक, सेंट्रल प्लेसमेंट ऑफिसर म्हणून देखील कार्यरत आहेत.

धनंजयराव गाडगीळ वाणिज्य महाविद्यालयातील बँकिंग स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन केंद्राच्या उभारणीमध्ये त्यांचे योगदान महत्त्वपूर्ण असून ग्रामीण भागातील युवक युवतींना बँकिंग व वित्तीय क्षेत्रातील रोजगार विषयक संधी उपलब्ध करून देण्यासाठी त्यांनी विशेष प्रयत्न केले असून

या केंद्रातील अनेक विद्यार्थी देशातील विविध बँका व वित्तीय संस्थांमध्ये व्यवस्थापक, प्रोबेशनरी ऑफिसर्स, स्पेशालिस्ट ऑफिसर्स, असिस्टंट इत्यादी पदावर कार्यरत आहेत.

डॉ.कुंभार यांनी धनंजयराव गाडगीळ वाणिज्य महाविद्यालय सातारा या महाविद्यालयास स्वायत्तता मिळवून देण्यासाठी देखील विशेष योगदान दिलेले असून रयत शिक्षण संस्थेतील पहिल्या स्वायत्त महाविद्यालयाचे समन्वयक म्हणून सन 2016 पासून काम पाहित आहेत.

या महाविद्यालयातील बीकॉम बँक मॅनेजमेंट आणि एम कॉम बँक मॅनेजमेंट हे पदवी व पदवी तर कोर्सेस सुरू करण्यामध्ये व ते नावारूपास आणण्यामध्ये त्यांचे महत्त्वाचे योगदान आहे.

तसेच ते कोल्हापूर, सोलापूर व पुणे जिल्ह्यातील विविध स्वायत्त महाविद्यालयाच्या अभ्यास मंडळावर आणि अकॅडमी कौन्सिलवर ते सदस्य म्हणून देखील कार्यरत आहेत.

सन 2018 ते 2022 या कालावधीत त्यांनी शिवाजी विद्यापीठ कोल्हापूर या विद्यापीठातील व्यावसायिक अर्थशास्त्र व बँकिंग विषयाच्या अभ्यास मंडळाचे सक्रिय सदस्य म्हणून महत्त्वाची भूमिका पार पाडलेली आहे तसेच या विद्यापीठाच्या विविध समित्यांवर काम केलेले आहे.

कर्मवीर भाऊराव पाटील विद्यापीठ सातारा या विद्यापीठाच्या प्रथम कुलसचिव पदी नियुक्ती होणे ही महाराष्ट्रातील शैक्षणिक चळवळीत महत्त्वाचे योगदान देणाऱ्या रयत शिक्षण संस्थेच्या महान कार्यात विद्यापीठाचा सेवक म्हणून सहभागी होण्याची संधी हे परमभाग्य असून

या नव्याने सुरू होणाऱ्या विद्यापीठाची पायाभरणी करण्यासाठी मिळालेली ही संधी माझ्या आयुष्यातील सर्वात महत्त्वाची संधी असल्याचे मत व्यक्त केले. ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना उत्कृष्ट स्वरूपाच्या उच्च शिक्षण विषयक व संशोधन विषयक संधी उपलब्ध करून देण्यासाठी हे विद्यापीठ महत्त्वाची भूमिका पार पाडेल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

डॉ. कुंभार यांनी आपले शिक्षण पुर्ण करण्यासाठी पलुस येथील औद्योगिक वसाहतीमधील कामधेनू इंजिनिअरींग मध्ये लेथ मशीन ऑपरेटर, वेल्डर तसेच फोटो प्रिंटिंग लॅब मध्ये प्रिंटर म्हणूनही काम करून स्वतःचे शिक्षण पुर्ण केले. तळसंगी ता. मंगळवेढा जि. सोलापूर येथील एका सर्वसामान्य अशिक्षित शेतमजूराच्या कुटुंबात जन्मलेल्या डॉ. विजय कुंभार यांनी आई-वडीलांच्या प्रेरणेतून जिद्दीने पीएच.डी पर्यंतचे शिक्षण पुर्ण केले.

आर्थिक परिस्थितीमुळे शिक्षण सोडून देण्याचे अनेक प्रसंग उद्भवले असताना देखील अशा प्रसंगावर मात करून त्यांनी उच्च शिक्षण घेतले.

त्यांच्या या कर्तृत्वाचा आणि योगदानाचा विचार करून विद्यापीठाचे कुलगुरू प्रा. डॉ. डी टी शिर्के, रयत शिक्षण संस्थेचे चेअरमन डॉ अनिल पाटील, संस्थेचे सचिव प्राचार्य डॉ. विठ्ठल शिवणकर, सहसचिव प्राचार्य डॉ. शिवलिंग मेनकुदळे,

विद्यापीठाच्या लीड कॉलेजचे प्राचार्य डॉ. भारत जाधव आणि धनंजयराव गाडगीळ वाणिज्य महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. बाळ कांबळे यांनी त्यांची निवड केली. या सर्वांनी माझ्यावर दाखवलेला विश्वास सार्थ ठरवण्यासाठी मी विशेष योगदान देणार असल्याचे मत त्यांनी व्यक्त केले.

अशाच महत्वपूर्ण बातम्या आणि माहीती मनोरंजन मिळवा तुमच्या व्हॉट्सअँप ग्रूपमध्ये, त्यासाठी पुढील नंबर तुमच्या ग्रुपमध्ये समाविष्ट करा – 9970766262

“मंगळवेढा टाईम्स”च्या बातम्या मिळविण्यासाठी 9970766262 हा नंबर तुमच्या व्हॉट्सऍपवर ग्रुपवर ऍड करून फक्त एक मेसेज करा.

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.

ताज्या बातम्या थेट मोबाईलवर मिळवण्यासाठी आजच जॉईन व्हा

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज

Tags: डॉ.विजय कुंभारसातारा

संबंधित बातम्या

सर्वात मोठी बातमी! लोकसभा निवडणुकीच्या तारखा ‘या’ दिवशी जाहीर होणार?; निवडणूक आयोगाच्या हालचाली सुरु

गावगाड्याच्या राजकारणाला येणार वेग! जिल्हा परिषद निवडणूक कधी होणार? राज्य निवडणूक आयोगाकडून मोठी अपडेट

January 6, 2026
मंगळवेढा शहराचा कायापालट करणारा व जनतेचे राहणीमान उंचावणारा तीर्थक्षेत्र विकास आघाडीचा वचननामा जाहीर

‘पती अन्‌ मुलाची मदत न घेता….’ नगरपालिकेचा कारभार यशस्वी करून दाखवणार; नगराध्यक्षपदाचा पदभार स्वीकारताच सुनंदा आवताडेंची मोठी घोषणा

January 6, 2026
खुनीहल्ल्याप्रकरणी मंगळवेढ्यातील आरोपीविरुद्ध २१ लाखांचा नुकसान भरपाईचा दावा

बनावट सोन्याचे दागिणे देवुन 10 लाख रुपयांची फसवणुक केल्याप्रकरणी आरोपीस जामीन मंजूर; केवळ संशयित म्हणून.., मंगळवेढ्यातील ॲड.ओंकार भुसे यांचा युक्तीवाद ग्राह्य

January 6, 2026
भोसे गटातून सिध्देश्वर रणे यांना ‘समविचारी आघाडी’कडून उमेदवारी मिळण्याची शक्यता? रणे यांनी प्रत्येक गावात जाऊन जाणून घेतल्या अडीअडचणी

भोसे गटातून सिध्देश्वर रणे यांना ‘समविचारी आघाडी’कडून उमेदवारी मिळण्याची शक्यता? रणे यांनी प्रत्येक गावात जाऊन जाणून घेतल्या अडीअडचणी

January 6, 2026
धडाकेबाज कामगिरी! उजनी वसाहत पंढरपुर येथील अतिक्रमणांवर जलसंपदा विभागाची कारवाई; 10 निवासस्थाने केली रिक्त

धडाकेबाज कामगिरी! उजनी वसाहत पंढरपुर येथील अतिक्रमणांवर जलसंपदा विभागाची कारवाई; 10 निवासस्थाने केली रिक्त

January 5, 2026
कॅनॉलमध्ये अडकलेली गाडी काढण्यासाठी बोलावून जेसीबी मालकास मारहाण करत लुटले

बापरे..! आईवरून शिवीगाळ केल्यानं संतापलेल्या मित्राचा दगडाने ठेचून केला खून; परिसरात उडाली एकच खळबळ

January 5, 2026
खळबळ! मंगळवेढ्यात झालेल्या ‘त्या’ आत्महत्येप्रकरणी पाच जणांविरूध्द गुन्हा दाखल

Breaking! बाळासाहेब सरवदे खून प्रकरणात मोठा ट्विस्ट; मृताच्या कुटुंबाविरोधातच गुन्हा दाखल

January 5, 2026
मंगळवेढा शहराचा कायापालट करणारा व जनतेचे राहणीमान उंचावणारा तीर्थक्षेत्र विकास आघाडीचा वचननामा जाहीर

लोकनियुक्त नूतन नगराध्यक्षा सुनंदा आवताडे आज घेणार पदभार; अपेक्षा अन् आव्हानाची होणार कसोटी; उपनगराध्यक्ष, स्वीकृत नगरसेवक निवडीकडे लक्ष

January 5, 2026
ग्रामपंचायतीची भराल बिले तर मिळतील बक्षिसे; करवसुलीसाठी मंगळवेढा तालुक्यातील ‘या’ गावात अफलातून योजना

आदर्शवत निर्णय! विधवा प्रथा न पाळणाऱ्यांची घरपट्टी, पाणीपट्टी माफ; ‘या’ ग्रामपंचायतीचे ऐतिहासिक पाऊल

January 5, 2026
Next Post
Breaking! मंगळवेढ्यात उद्योजकाची गळफास घेऊन आत्महत्या

धक्कादायक! मंगळवेढ्यात अज्ञात कारणावरून 55 वर्षीय इसमाची गळफास घेवून आत्महत्या

ताज्या बातम्या

सर्वात मोठी बातमी! लोकसभा निवडणुकीच्या तारखा ‘या’ दिवशी जाहीर होणार?; निवडणूक आयोगाच्या हालचाली सुरु

गावगाड्याच्या राजकारणाला येणार वेग! जिल्हा परिषद निवडणूक कधी होणार? राज्य निवडणूक आयोगाकडून मोठी अपडेट

January 6, 2026
मंगळवेढा शहराचा कायापालट करणारा व जनतेचे राहणीमान उंचावणारा तीर्थक्षेत्र विकास आघाडीचा वचननामा जाहीर

‘पती अन्‌ मुलाची मदत न घेता….’ नगरपालिकेचा कारभार यशस्वी करून दाखवणार; नगराध्यक्षपदाचा पदभार स्वीकारताच सुनंदा आवताडेंची मोठी घोषणा

January 6, 2026
खुनीहल्ल्याप्रकरणी मंगळवेढ्यातील आरोपीविरुद्ध २१ लाखांचा नुकसान भरपाईचा दावा

बनावट सोन्याचे दागिणे देवुन 10 लाख रुपयांची फसवणुक केल्याप्रकरणी आरोपीस जामीन मंजूर; केवळ संशयित म्हणून.., मंगळवेढ्यातील ॲड.ओंकार भुसे यांचा युक्तीवाद ग्राह्य

January 6, 2026
भोसे गटातून सिध्देश्वर रणे यांना ‘समविचारी आघाडी’कडून उमेदवारी मिळण्याची शक्यता? रणे यांनी प्रत्येक गावात जाऊन जाणून घेतल्या अडीअडचणी

भोसे गटातून सिध्देश्वर रणे यांना ‘समविचारी आघाडी’कडून उमेदवारी मिळण्याची शक्यता? रणे यांनी प्रत्येक गावात जाऊन जाणून घेतल्या अडीअडचणी

January 6, 2026
धडाकेबाज कामगिरी! उजनी वसाहत पंढरपुर येथील अतिक्रमणांवर जलसंपदा विभागाची कारवाई; 10 निवासस्थाने केली रिक्त

धडाकेबाज कामगिरी! उजनी वसाहत पंढरपुर येथील अतिक्रमणांवर जलसंपदा विभागाची कारवाई; 10 निवासस्थाने केली रिक्त

January 5, 2026
कॅनॉलमध्ये अडकलेली गाडी काढण्यासाठी बोलावून जेसीबी मालकास मारहाण करत लुटले

बापरे..! आईवरून शिवीगाळ केल्यानं संतापलेल्या मित्राचा दगडाने ठेचून केला खून; परिसरात उडाली एकच खळबळ

January 5, 2026
mangalwedhatimes.in

प्रिंट,टीव्ही मीडियानंतर सध्या डिजिटल मीडियाचं महत्व प्रचंड वाढलंय. येणाऱ्या काळात या माध्यमाचं महत्व आणि व्याप्ती आणखी वाढणार असल्यानं . आम्ही हा नवीन बदल स्वीकारून 'मंगळवेढा टाईम्स' या सोशल मीडियाच्या फेसबुक पेजचे रूपांतर वेब मीडिया मध्ये करून 'मंगळवेढा टाईम्स' या नावाने न्युजचे वेब पोर्टल आपल्या सेवेत दाखल झालय. येथे आपण आपल्या स्मार्टफोन, कॉम्पुटर वरून देश विदेशातील घडामोडी तसेच स्थानिक, व्यापार, ग्रामीण, सांस्कृतिक, उद्योग, कृषी, मनोरंजन, तंत्रज्ञान, शिक्षण अश्या विविध श्येत्रांतील बातम्या घरबसल्या वाचू शकता. स्मार्टफोन, सोशल मीडियाच्या माध्यमातून बातम्या पाहण्यात लोकांचा कल वाढतोय, म्हणूनच आम्ही बदलतोय.

© 2020 Website Maintained by Tushar Bhambare..