टीम मंगळवेढा टाईम्स । मोडनिंब (ता.माढा) येथील रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आठवले गट) प.महाराष्ट्राचे उपाध्यक्ष कुमार विठ्ठल वाघमारे यांचा मंगळवेढा येथील एमआयडीसीमध्ये संशयास्पद मृत्यू झाल्याचे शनिवारी सायंकाळी निदर्शनास आले आहे.
कुमार वाघमारे यांची मंगळवेढा येथील एमआयडीसीमध्ये मागासवर्गीय संस्था आहे. ते मोडनिंब येथून तीन दिवसांपूर्वी घरातून मी मंगळवेढ्याला जाऊन येतो,असे सांगून निघून गेले होते.
मात्र शनिवारी त्यांच्या मृत्यूचे वृत्त मोडनिंब येथे समजताच रिपाइंचे कार्यकर्ते व नातेवाईकांनी मंगळवेढ्याकडे धाव येथील घेतली.
त्या ठिकाणी कुमार वाघमारे हे मृतावस्थेत निदर्शनास आले.त्यांचा मृत्यू कसा झाला व का झाला याचे.गुढ रविवारी शवविच्छेदन झाल्यानंतर समजणार आहे.
त्यांचा मृत्यू कशाने ? का झाला ? कधी झाला ? हे अद्याप तरी समजले नाही. मंगळवेढा पोलिसांनी रविवारी शवविच्छेदन झाल्यानंतर याबाबतची माहिती मिळेल, असे सांगितले.
कुमार वाघमारे हे पक्षीय कामाबरोबर सामाजिक कामांमध्ये अग्रेसर होते.त्यांनी लॉकडाऊनच्या कालावधीत मोडनिंबमधील युवकांबरोबर परप्रांतीयांना सेवा देण्याबरोबर शांतता व सलोखा राखण्यासाठी प्रयत्न केले.
Kumar Vitthal Waghmare Suspicious death of RPI West Maharashtra vice president on mangalwedha
राज्यातील व देशातील ब्रेकिंग बातम्या आणि माहिती सर्वात प्रथम तुमच्या पर्यंत .आजच Add करा तुमच्या Whatsapp ग्रुपवर 9561617373 हा आमचा नंबर.
ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 9561617373 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Mangalwedha Times News”
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज