टीम मंगळवेढा टाईम्स । सोलापुरातील श्री.छत्रपती शिवाजी महाराज सर्वोपचार रुग्णालय म्हणजेच सिव्हिल हॉस्पिटल मधील एका तरूण डॉक्टरने आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना आज सायंकाळच्या सुमारास उजेडात आली आहे. Suicide of a doctor at a government hospital in Solapur
चैतन्य अरूण धायफुले (वय.27, रा. तेलंगी पाच्छा पेठ सोलापूर) असे आत्महत्या केलेल्या डॉक्टरचे नाव आहे.चैतन्य धायफुले हा सिव्हिल हॉस्पिटल मधील कोरोना वॉडत काम करीत होता.
मुलांचे वसतिगृहात असलेल्या रूममधील स्लॅबच्या लोखंडी फॅनला नायलॉन दोरीच्या सहाय्याने गळफास घेतल्याने त्याचा मृत्यू झाल्याचे प्रथमदर्शनी दिसून येत आहे.त्याचा भाऊ देवल अरूण धायफुले यांनी त्यास उपचारासाठी दाखल केले.उपचारापूर्वीच तो मयत असल्याचे संबंधित डॉक्टरांनी तपासून सांगितले आहे.
पोलीस घटनास्थळी हजर झाले असून त्याचा मृतदेह शवविच्छेदनासाठी शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आला आहे. या आत्महत्या पाठीमागचे कारण अजून स्पष्ट झाले नाही.या घटनेमुळे वैद्यकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे.
—————————
???? राज्यातील व देशातील ब्रेकिंग बातम्या आणि माहिती सर्वात प्रथम तुमच्या पर्यंत .आजच Add करा तुमच्या Whatsapp ग्रुपवर 95 6161 7373 हा आमचा नंबर.
ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 95 6161 7373 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Mangalwedha Times News”
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज