टीम मंगळवेढा टाईम्स।
एका शिक्षकाने आपल्या राहत्या घरी साडीच्या साहाय्याने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना मंगळवेढा शहरात घडली आहे.
रामचंद्र शेऊ राठोड (वय 47 रा.बनशंकरी कॉलनी, मंगळवेढा) असे आत्महत्या केलेल्या शिक्षकाचे नाव आहे.
याची फिर्याद मताचा भाऊ लिंबाजी शिवाजी राठोड (वय 52) यांनी मंगळवेढा पोलीस ठाण्यात दिली आहे.
याबाबत पोलीस सूत्रांकडून मिळालेली अधिक माहिती अशी की, आज दि.28 मार्च रोजी सकाळी 10.30 वाजण्याच्या पुर्वी फिर्यादीचा लहान भाऊ रामचंद्र शेऊ राठोड याने बनशंकरी कॉलनी येथे
कोणत्यातरी अज्ञात कारणाने त्याचे रहाते घरातील बेडरुम मधील फँनला आकाशी रंगाचे साडीच्या साहाय्याने गळफास घेवुन आत्महत्या केल्याचे दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे.
मयत रामचंद्र राठोड हे मंगळवेढा नगरपालिकेच्या शाळेमध्ये शिक्षक म्हणून कार्यरत होते. त्यांनी कोणत्या कारणासाठी आत्महत्या केली? यासंदर्भात अधिक तपास मंगळवेढा पोलीस करीत आहेत.
ही बातमी आताच ब्रेक झाली आहे. या बातमीला आम्ही अजुनही अपडेट करत आहोत. तुम्हाला सर्वात आधी माहिती पोहोचवण्याचा आमचा प्रयत्न आहे. त्यामुळे ह्या पेजला रिफ्रेश करत चला. तसेच आमच्या इतर स्टोरीज वाचण्यासाठी इथं क्लिक करा.
अशाच महत्वपूर्ण बातम्या आणि माहीती मनोरंजन मिळवा तुमच्या व्हॉट्सअँप ग्रूपमध्ये, त्यासाठी पुढील नंबर तुमच्या ग्रुपमध्ये समाविष्ट करा – 9970766262
“मंगळवेढा टाईम्स”च्या बातम्या मिळविण्यासाठी 9970766262 हा नंबर तुमच्या व्हॉट्सऍपवर ग्रुपवर ऍड करून फक्त एक मेसेज करा.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज