मंगळवेढा टाईम्स न्युज नेटवर्क।
केंद्र सरकारच्या चुकीच्या धोरणांमुळे देशातील ऊस शेतकरी अडचणीत आल्याचा आरोप विठ्ठल सहकारी साखर कारखान्याचे अध्यक्ष अभिजित पाटील यांनी केला.
विठ्ठल सहकारी साखर कारखान्याच्या वतीने रविवारी वाखरी येथे ऊस उत्पादक शेतकरी मेळावा घेण्यात आला होता. यावेळी शेतकऱ्यांना मार्गदर्शन करताना श्री. पाटील यांनी सध्याच्या केंद्र सरकारच्या साखर धोरणावर टीका केली.
अभिजित पाटील म्हणाले, केंद्र सरकारच्या निर्यात बंदीच्या धोरणामुळे साखर कारखानदार आणि ऊस उत्पादक शेतकरी अडचणीत आले आहेत.
जागतिक मार्केटमध्ये सध्या साखर ८० रुपये किलोने विकली जात आहे, तर भारतात आणि महाराष्ट्रात मात्र ३५ रुपये किलोने विकली जात आहे. निम्या भावाने साखर विक्री करावी लागत असल्याने अनेक साखर कारखान्यांना याचा मोठा आर्थिक फटका बसला आहे. परिणामी एफआरपीची रक्कम देण्यास अडचणी निर्माण झाल्या आहेत. केंद्र सरकारने साखर निर्यातीला परवानगी द्यावी.
त्यामुळे यंदा राज्यात साखरेचे उत्पन्नही कमी होईल. साखरेचे उत्पन्न कमी झाले तर दिवाळीपर्यंत साखरेचा भाव पन्नास रुपये प्रतिकिलो जाईल, असा अंदाजही पाटील यांनी जून व्यक्त केला. यावेळी संजीव पाटील यांनी एकरी शंभर टन उत्पन्न या विषयी शेतकऱ्यांना मार्गदर्शन केले. शेतकरी मेळाव्यास कारखान्याचे सर्व संचालक व सभासद, शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
पश्चिम महाराष्ट्रात ऑगस्ट–सप्टेंबरमध्ये पाऊस
■ सध्या महाराष्ट्रात सर्वत्र पाऊस सुरू आहे. परंतु पश्चिम महाराष्ट्रात पावसाचे प्रमाण कमी आहे. त्यामुळे शेतकरी सध्या चिंतेत आहेत. तथापि काळजीचे कारण नाही, ऑगस्ट-सप्टेंबरमध्ये पश्चिम महाराष्ट्रात चांगला पाऊस पडेल, सर्व धरणे कमी वेळात भरून निघतील, असे हवामान तज्ज्ञ पंजाबराव डख यांनी सांगितले.
महाराष्ट्रात सरासरी महिन्यामध्ये मोठा पाऊस पडतो. परंतु यावेळेस पश्चिम महाराष्ट्रात पावसाचे प्रमाण कमी असल्यामुळे ऊस उत्पादन कमी होवून साखर उताऱ्यामध्येही घट होऊ शकते.
अशाच महत्वपूर्ण बातम्या आणि माहीती मनोरंजन मिळवा तुमच्या व्हॉट्सअँप ग्रूपमध्ये, त्यासाठी पुढील नंबर तुमच्या ग्रुपमध्ये समाविष्ट करा – 9970766262
“मंगळवेढा टाईम्स”च्या बातम्या मिळविण्यासाठी 9970766262 हा नंबर तुमच्या व्हॉट्सऍपवर ग्रुपवर ऍड करून फक्त एक मेसेज करा.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी Mangalwedha Times वर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट मंगळवेढा टाईम्स.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज